७ रुपयात १०० किमी चालणाऱ्या या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही

प्रवास करणं हा माणसाचा आवडता छंद आहे. फिरायला आवडत नाही असं म्हणणारी व्यक्ती जगात अगदी विरळाच.

तसंही समर्थ रामदासांनी म्हटलच आहे ना, ‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’.

कधी हौस म्हणून किंवा कधी कामानिमित्त का होईना माणूस प्रवासाला म्हणून बाहेर पडतोच. कधी चालत, कधी घोडागाडी बैलगाडी घेऊन, कधी दोनचाकी, तीनचाकी, चारचाकी घेऊन, कधी जहाजातून, कधी विमानातून.

सध्या तरी तरूणांमध्ये नवीनच ट्रेंड सुरू आहे तो म्हणजे सुट्टीच्या दिवशी हमखास बाईकवरून लॉंगड्राईव्हला जाणे.

काही जणांनी हौसेने बाईकवरून जगभ्रमंतीसुद्धा केली.

पण दरवेळी बाईकवरून फिरणं म्हणजे पेट्रोलचा खर्च आला. दरवेळी वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमती.

शिवाय एवढं पेट्रोल वापरून आपण वायूप्रदूषण वाढवतोय हा विचार घोळत असतो तो वेगळा.

मग कोणताही त्रास किंवा अपव्यय होऊ न देता मनसोक्त हौस भागवायची कशी??

जगातल्या काही कंपन्यांनी अशा हौशी लोकांची अडचण लक्षात घेतली आणि काही इलेक्ट्रिक बाईक, काही सौर ऊर्जेवर चालणारी वाहनं बाजारात आणली. मग काय झाली की सोय हौशी लोकांची…

जगात अशा बाईकच्या उत्पादनात भारतही मागे नाही.

हैदराबाद स्थित ‘Atumobile Pvt Ltd’ नावाच्या एका स्टार्ट अप कंपनीने अशीच एक आर्थिक दृष्ट्या परवडणारी आणि चांगल्या गुणवत्तेची इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे.

या कंपनीने गेल्या वर्षी Atum 1.0 ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली.

या बाईकची किंमत ५०,००० पासून सुरू होते. वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळे ही बाईक वर्षभरातच लोकप्रिय झाली.

सध्या या बाईकसाठी ४०० हून अधिक बुकिंग आहेत. सुरूवातीला केवळ दहा ग्राहकांना ही बाईक देण्यात आली.

या बाईकची मागणी आणि लोकप्रियता पाहून उत्पादनात आणखी वाढ झाली आहे. तसंच ही बाईक इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीने प्रमाणित केली आहे.

काही तासांच्या चार्जिंगने ही बाईक जवळपास १०० किलोमीटर इतका प्रवास करू शकते.

एवढ्या चार्जिंग साठी केवळ सात ते आठ रूपये खर्च येतो. म्हणजेच पेट्रोल बाईकच्या तुलनेत ही बाईक नक्कीच फायदेशीर ठरते.

ही एक लो स्पीड इलेक्ट्रिक बाईक असून तिचा ताशी वेग साधारण २५ किलोमीटर इतका आहे.

या बाईकचे वजन अंदाजे १०८ किलो असून लिथियम लॉन नावाची बॅटरी या बाईकसाठी वापरली आहे.

केशरी, निळा, करडा, पांढरा, काळा अशा रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.

पेट्रोलचा खर्च तर वाचतोच शिवाय वाहनाच्या वापरामुळे होणारं प्रदुषण टाळता येत. एवढा विचार केल्यावर ग्राहकांचा कल नक्कीच इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे असेल यात शंका नाही.

या बाईकच्या चार्जिंग साठी जेमतेम ४ ते ५ तास लागतात. त्यामुळे बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होऊन १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास सहज शक्य होतो.

या चार्जिंग साठी नेहमीच थ्री पिन सॉकेट पुरेस असतं.

याव्यतिरिक्त या बाईकसाठी एल. ई. डी. टर्न इंडिकेटर, एल. ई. डी. हेडलॅंप, एल. ई. डी. टेललाईट, कॅफे रेसर डिझाईन, आरामदायक सीट, डिजिटल डिस्प्ले यांचा वापर केला आहे.

कायद्याने सोयीची गोष्ट म्हणजे या बाईकच्या खरेदीसाठी रजिस्ट्रेशनची आणि चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. कोणत्याही वयाचे लोक ही बाईक चालवू शकतात.

पेट्रोल इंजिनची बाईक चालवण्याऐवजी इलेक्ट्रिक इंजिनची बाईक चालवणं केव्हाही फायद्याचं आहे हे लोकांना आता लक्षात आलं आहे.

त्यामुळे काही ठिकाणी असेही बेकायदेशीर प्रकार चालतात की पेट्रोल इंजिनचे इलेक्ट्रिक इंजिनमधे रूपांतर करुन बाईक चालवली जाते.

त्यामुळे काही तासांच्या चार्जिंग वर बाईक चांगली चालवता येते आणि पेट्रोलचा खर्चही बराच वाचतो.

पण बाईकच्या इंजिनचं असं रूपांतर करणं कायदेशीर गुन्हा आहे. त्यासाठी दंड किंवा कारावासही होऊ शकतो.

त्यामुळे अधिकृत कंपनीने उत्पादन केलेल्या इलेक्ट्रिक बाईकची खरेदी करणं केव्हाही योग्य ठरेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “७ रुपयात १०० किमी चालणाऱ्या या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।