केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत.

लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत.

त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.

आपल्या डोक्याच्या त्वचेपाशी (स्काल्प) असणाऱ्या तैल ग्रंथिंमुळे आपल्या केसांच्या मुळांचे संरक्षण होते.

केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, स्प्लिट एण्ड्स होणे ह्या सगळ्यापासून सुरक्षा मिळते. परंतु हे टिकवून ठेवणे खूप अवघड आहे.

बदलत्या हवामानामुळे, प्रदूषणामुळे, आणि आपल्या आरोग्याच्या तक्रारींमुळे केसांचे आरोग्य देखील बिघडत जाते. जर आपल्या केसांची मुळे स्ट्रॉंग असतील तरच आपले केस निरोगी राहतील.

आज आपण ह्याच सगळ्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

केसांची मुळे कमकुवत का होतात?

१. कुपोषण

केसांना पोषक असणारे घटक जसे की लोह, कॅल्शियम, झिंक, विटामीन डी आणि प्रोटीन जर आपल्या आहारात योग्य प्रमाणात नसतील तर केसांचे कुपोषण होते आणि केसांची मुळे कमकुवत होतात. केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात.

२. केसांच्या मुळांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा न होणे 

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, हॉर्मोन्सचे तंत्र बिघडणे किंवा मधुमेह होणे ह्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

त्यामुळे केसांच्या मुळांना देखील पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि ते कमकुवत होत जातात.

३. उष्णता 

केमिकल युक्त शॅम्पू वापरण्यामुळे किंवा अति तेलकट मसालेदार अन्न खाण्यामुळे आणि सतत प्रखर सूर्यप्रकाश किंवा प्रदूषणात केस राहिल्यामुळे केसांच्या मुळांची हानी होते. ते तुटून कमकुवत होत जातात.

केसांची मुळे कमकुवत झाली आहेत हे कसे ओळखावे 

खालील लक्षणांवरून केसांची मुळे कमकुवत झाली हे ओळखता येते.

१. सहज ओढले गेले तरी केस तुटतात.

२. केस खूप कोरडे निस्तेज दिसतात.

३. केस खूप जास्त प्रमाणात गळतात.

४. केसांच्या टोकांना स्प्लिट एण्ड्स खूप प्रमाणात दिसतात.

अशी लक्षणे आढळल्यास केसांची मुळे कमकुवत झाली आहेत हे ओळखावे.

केसांची मुळे स्ट्रॉंग व निरोगी होण्यासाठीचे उपाय 

आयुर्वेदात सांगितले आहे की निरोगी केस हवे असतील तर केवळ बाह्य उपचार करून भागणार नाही.

केसांना चांगल्या प्रतीचे तेल लावणे, ते वेळेवर धुणे हयाबरोबरच केसांना पोषक असणारा आहार घेणे देखील खूप आवश्यक आहे.
कसा ते आपण पाहूया.

१. परिपूर्ण आहार घ्या

आपल्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थ असणे केसांसाठी आवश्यक आहे, तसेच आयर्न देखील योग्य प्रमाणात पोटात जाणे आवश्यक आहे.

त्याकरिता भरपूर प्रमाणात फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये खावीत.

तसेच अक्रोड आणि बदाम ह्या सुक्यामेव्याचा आहारात समावेश जरूर करावा.

तसेच योग्य प्रमाणात तेल, तूप अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन जरूर करावे.

२. फॅटी फूड खाऊ नये

अतिरिक्त प्रमाणात फॅटी फूड खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढून केसांच्या मुळांपर्यंत पोषणद्रव्ये पोचत नाहीत आणि केस कमकुवत होतात.

त्यामुळे रिफाईनड तेल, पाम तेल, साखर आणि पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

३. तेलकट पदार्थ फार खाऊ नये

फार तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

तसेच खूप जास्त प्रमाणात मीठ खालल्यामुळे देखील असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोणचे, सॉस वगैरे पदार्थ प्रमाणात खावे. तसेच अति मद्यपान देखील केसांच्या मुळाना घातक आहे.

केसांची मुळे मजबूत करण्यासाठीचे बाह्य उपचार खालीलप्रमाणे 

१. नियमित तेल लावणे

केसांच्या मुळांना नियमितपणे उत्तम प्रतीचे तेल लावणे आवश्यक आहे, अशा तेलाने केलेला मसाज केसांची मुळे मजबूत बनवतो. रात्री तेल लावून रात्रभर ते केसात मुरू देवून सकाळी केस धुणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.

२. केसांना बाहेरून लेप/ हेअर मास्क लावणे

केसांना आठवड्यातून एक दिवस लेप आगर मास्क लावल्यामुळे केसांचे आरोग्य राखले जाते. हे मास्क केसांच्या मुळांना पोषण देतात.

आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने असे मास्क आपण घरच्या घरी करू शकतो. पाहूया कसे

१. त्रिफळा हेअर मास्क

एक चमचा त्रिफळा चूर्ण, २ चमचे ऍपल सायडर विनिगर, २ चमचे मध ह्या सर्वाचे मिश्रण करून केसांच्या मुळांशी लावावे. अर्ध्या तासाने केस धुवून टाकावे. ह्यामुळे केसांची मुळे घट्ट होतात.

२. ओनिअन हेअर मास्क

४ चमचे कांद्याचा रस, १ चिमूटभर काळीमिरीची पूड, ४ चमचे मध ह्या सर्वाचे मिश्रण करून केसांच्या मुळांशी लावावे. अर्ध्या तासाने केस धुवून टाकावे. कांद्यामुळे केसांच्या मुळाशी होणारे रक्ताभिसरण सुधारते. आणि केसांच्या वाढीस मदत होते.

३. दालचीनी हेअर मास्क 

पाव चमचा दालचीनी ची पावडर, २ चमचे मध, ४ चमचे कोरफडीचे जेल ह्या सर्वाचे मिश्रण करून केसांच्या मुळांशी लावावे. अर्ध्या तासाने केस धुवून टाकावे. ह्यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केस गळणे कमी होते.

ह्याशिवाय आवळा पावडर, मेथी पावडर, जास्वंद पावडर आणि नारळाचे दूध हे केसांसाठी पोषक आहे. केसांची मुळे बळकट

करणारे काही पदार्थ

१. आवळा- आवळा हे केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. भरपूर प्रमाणात विटामीन सी आणि इतर पोषक द्रव्य असणारा आवळा हा रस काढून किंवा पावडर स्वरूपात केसांना लावता येतो. तसेच आवळ्याचा रस पोटात घेणे देखील फायदेशीर आहे.

२. नारळाचे तेल- नारळाचे तेल केसांना नियमित लावल्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांची उत्तम प्रकारे वाढ होते.

३. बदाम– रोज बदाम खाण्यामुळे केसांना आवश्यक असणारे प्रोटीन आणि स्निग्धता मिळते आणि केसांकही मुळे मजबूत होतात.

४. अक्रोड- आक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात विटामीन ई असते. त्यामुळे अक्रोडाचे नियमित सेवन केले असता केस चमकदार होऊन भरपूर वाढतात.

५. ताक– नियमित ताक पिणे केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. ताका मुळे शरीरात कॅल्शियम योग्य प्रकारे शोषले जाते आणि त्यामुळे केसांना देखील पोषण मिळते.

६. मूग, पालक, बेदाणे,मेथीदाणे हे देखील केसांना उपयुक्त आहेत.

केसांची उत्तम निगा राखण्याकरिता काय करू नये 

१. केस वारंवार विनाकारण धुणे टाळावे.

२. सतत नवनवीन हेअर स्टाइल करू नयेत.

३. केसांवर केमिकल्स चा वापर टाळावा.

४. ओले केस ड्रायर चा वापर करून न सुकवता तसेच सुकवावेत.

५. सतत नवनवीन शांपु वापरू नयेत.

६. जागरणे करू नयेत. पुरेशी झोप घ्यावी.

तर अशा प्रकारे काय करावे व काय करू नये हे जाणून घेऊन आपण घरच्या घरी उत्तम प्रकारे आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो व केसांची मुळे मजबूत बनवून सुंदर निरोगी केस मिळवू शकतो.

ह्या लेखात सांगितलेल्या उपायांचा जरूर लाभ घ्या आणि सुंदर केस मिळवा.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय”

    • नक्कीच व्हाट्सअप द्वारे शेअर करू शकता, हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहेच.

      Reply
    • नक्कीच व्हाट्सअप द्वारे शेअर करू शकता, हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहेच.

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।