कुळीथ’ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते.
खरे तर आपले भारतीय जेवण हे अतिशय परिपूर्ण आहार म्हणून मानले जाते पण हल्ली पाश्चात्य पद्धतीच्या आहाराच्या प्रभावामुळे आपण आपल्या पद्धतीचं सकस खाणं विसरत चाललो आहोत.
डाळी, कडधान्ये आणि द्विदल धान्ये हा खरंतर भारतीय जेवणाचा प्रमुख घटक आहे परंतु आपण जेवताना किती प्रमाणात हे खातो हयाकडे लक्ष देत नाही.
खरंतर आपलं जेवण हे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस, थोड्या प्रमाणात फॅट्स, विटामीनस् आणि मिनरलस् ह्यांनी परिपूर्ण असे आहे.
रोज असे ताजे, सकस अन्न घेणे हे अतिशय आरोग्यदायी आहे.
करीना कपूरला मार्गदर्शन केल्यामुळे सेलिब्रिटी आहारतज्ञ बनलेली आपली मराठमोळी ऋजुता दिवेकर हेच सांगते. Rujuta Diwekar diet plan
आहारातील कडधान्यांचे महत्व सांगताना तिने विशेष महत्व कुळीथ ह्या कडधान्याला दिले.
आपल्या फेसबुक पेजवर ऋजुता म्हणते की, “कुळीथ हे इतके पौष्टिक आहे की ते अक्षरशः सुपर फूड आहे.”
कुळीथाच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते कारण कुळीथामध्ये चरबीचा निचरा करणारे गुणधर्म असतात.
तसेच कुळीथाचे सेवन नियमितपणे केल्यास किडनी स्टोन होत नाही, तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसणे किंवा शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसणे ह्याचे प्रमाण खूप कमी होते.
ऋजुता पुढे सांगते की कुळीथ डाळीचे सूप हे सर्दी, फ्लू किंवा मायग्रेनची डोकेदुखी ह्यावर देखील गुणकारी आहे.
आहारतज्ञ असणाऱ्या पूजा मल्होत्रा सांगतात की कुळीथ प्रोटीन, लोह, कॅल्शियम, फायबर आणि फॉस्परसनी युक्त असते.
त्या पुढे सांगतात की किडनी स्टोन, मूळव्याध आणि कोणत्याही प्रकारच्या अल्सरवर देखील कुळीथ गुणकारी आहे.
अपचनाचा त्रास असणाऱ्या लोकांनी देखील नियमित कुळीथाचे सेवन करावे असे पूजा मल्होत्रा सांगतात.
बद्धकोष्ठता आणि स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर देखील कुळीथ गुणकारी आहे.
कुळथाचे इतर गुणधर्म
१. कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपले शरीर निरोगी व स्वच्छ राहण्यास मदत होते.
२. कुळीथ मधुमेही व्यक्तींना उपयुक्त आहे कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते आणि शरीरातील इंसुलिन देखील वाढते.
३. दमा, कावीळ, मूळव्याध आणि डोळे येणे ह्या आजारांवर देखील कुळीथ गुणकारी आहे.
४. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील कुळीथ मदत करते.
५. वजन कमी करण्यास हे उपयुक्त आहे कारण कुळीथामध्ये फॅट बर्निंग कपॅसिटी असते.
तर असे हे सुपर फूड असणारे कुळीथ. ह्याचे असंख्य गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्वांनी रोजच्या आहारात ह्याचे नियमित सेवन जरूर करावे.
इथे कुळीथाबाबत अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कुळीथ हे इतर डाळी आणि कडधान्यापेक्षा बरेच स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहे.
आणि त्याचे महत्वाचे कारण म्हणजे कुळीथ हे भारतात सर्व ठिकाणी पिकते.
कमी पाण्यात, कमी सूर्यप्रकाशात देखील कुळीथ उगवते.
तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. शिवाय कुळीथाच्या पिकामुळे जमिनीची होणारी धूप कमी होते.
तसेच पीक काढल्यावर उरणारा पाला देखील जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगात येतो.
असे हे सर्वार्थाने उपयुक्त असणारे गुणकारी कुळीथ. ह्याचा वापर आपण रोजच्या आहारात नियमितपणे केलाच पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.