सध्या पेट्रोलचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक लोक आता पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक/स्कूटर बदलून आधुनिक पद्धतीच्या ई-बाईक घेत आहेत.
ई बाईक म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक, बॅटरीवर चालणारी बाईक. ह्या बाईकची बॅटरी चार्ज केली की बाईक चालते. पेट्रोलची गरज पडत नाही.
त्यामुळे अर्थातच ह्या बाईक लोकप्रिय होत आहेत. पण ई बाईक खरेदी करताना ग्राहकांना प्रमुख अडचण येते ती म्हणजे आधी असणाऱ्या जुन्या स्कूटर/ बाईकचं काय करायचं?
जुनी बाईक विकल्याशिवाय नवी ई बाईक कशी घेणार?
अशा एखाद्या कारणाशिवाय सुध्दा बरेचदा आपल्याला आपली जुनी बाईक विकून नवीन घ्यायची असते.
पण जुन्या बाईकला चांगली किम्मत मिळवणं आपल्यासाठी तेवढं सोपं नसतं.
पण हा प्रश्न आता बंगलोरमधील एका कंपनीने सोडवला आहे. CredR नावाची बंगलोरमधील कंपनी अशी ऑफर घेऊन आली आहे ज्यात ग्राहकांना त्यांच्या जुन्या स्कूटर/ बाईकच्या बदल्यात (एक्स्चेंजमध्ये) नवीन ई बाईक घेता येणार आहे.
ह्यासाठी ह्या कंपनीने दिल्लीतील क्रेयॉन मोटर्स ह्या ई बाईक विकणाऱ्या एजन्सीशी टाय अप केला आहे.
ह्या स्कीमनुसार कोणताही ग्राहक आपली जुनी पेट्रोलवाली बाईक/स्कूटर देऊन नवीन ई बाईक खरेदी करू शकणार आहे ते देखील घरबसल्या ऑनलाइन.
जुन्या बाईकची मिळू शकणारी रक्कम नवीन बाईकच्या किमतीतून ताबडतोब वजा होऊन फक्त उरलेली रक्कम भरून ग्राहकाच्या हातात नवीकोरी बाईक येऊ शकते.
२०१४ मध्ये निखिल जैन आणि शशिधर नंदीगम ह्यांनी मिळून CredR ह्या कंपनीची स्थापना केली. त्यांचा मुळ उद्देश ग्राहकांना त्यांच्या सोयीने सहजपणे बाईकची खरेदी विक्री करता यावी हा होता.
करोना पॅनडेमीक सुरु झाल्यावर त्यांनी ग्राहकांना ही खरेदी विक्री ऑनलाइन देखील कशी करता येईल ह्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कंपनीची वेबसाइट डेवलप केली.
त्यांनी सांगितले की CredR कंपनीच्या वेबसाइटवरुन जुन्या पेट्रोल बाईकच्या बदल्यात नवी ई बाईक घेणे अतिशय सोपे आहे.
१. प्रथम ग्राहकाने कंपनीची वेबसाइट विजिट करावी.
२. तिथे ‘एक्स्चेंज यॉर बाईक’ हा पर्याय निवडावा.
३. मग आपले शहर निवडावे.
४. त्यानंतर जी ई बाईक खरेदी करायची आहे त्याचा ब्रॅंड दिलेल्या पर्यायांमधून निवडावा.
५. त्यानंतर आपले पर्सनल डिटेल्स जसं की नाव, पत्ता, पिन कोड, फोन नंबर इत्यादि भरावे.
६. मग फोन वर आलेला ओटीपी देऊन आपली ऑर्डर कन्फर्म करावी.
७. त्यानंतर आपण दुसऱ्या पेज वर जातो.
८. तिथे आपल्या जुन्या बाईकचे सर्व डिटेल्स जसं की जुन्या बाईकचे मॉडेल, खरेदी केलेले वर्ष ही माहिती भरायची आहे.
९. त्यानंतर ताबडतोब आपल्याला आपल्या जुन्या बाईकची किती किंमत होईल हे वेबसाइट वर लगेच कळवले जाते.
१०. जर तुम्ही मिळणाऱ्या रकमेवर संतुष्ट असाल तर तेवढी रक्कम नवीन ई बाईकच्या किमतीतून वजा करून उरलेली रक्कम ताबडतोब भरुन लगेच तुम्ही नवीन ई बाईक खरेदी करू शकता.
११. तसेच जर तुम्हाला ती रक्कम मान्य नसेल तर तुम्ही CredR कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता.
१२. हयानंतर तुमची जुनी गाडी तपासण्यासाठी कंपनीकडून एक दिवस व वेळ निश्चित केला जातो आणि त्या वेळी जुन्या गाडीची तपासणी होऊन नवीन गाडीची ऑर्डर कन्फर्म होते तसेच डिलीवरीची निश्चित तारीख सांगितली जाते.
तर इतक्या सोप्या प्रकारे आता आपण आपण आपली जुनी पेट्रोल बाईक विकून नवी ई बाईक घेऊ शकतो.
सध्या हि सेवा दिल्ली, जयपूर, पुणे, हैद्राबाद, कोटा, बंगलोर, मुंबई अशा काही निवडक शहरात उपलब्ध आहे, पण लवकरच याची व्याप्ती वाढवण्याचा कम्पनीचा मानस आहे.
तर मित्रांनो, आहे की नाही हा एक फायद्याचा सौदा? त्याचा जरूर लाभ घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.