तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा…

नुकताच ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिवस’ साजरा झाला. सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या लाडक्या झाडाबरोबर फोटो काढले सोशल मिडीयावर पोस्ट केले.

सगळ्यांच्या फोटो कॅप्शनचा अर्थ साधारण एकच ‘आमचं पर्यावरणावर खूप प्रेम आहे’. पण हा झाला फक्त एक दिवस साजरा करण्यापुरता सोहळा.

खरंतर पर्यावरण ही आपली जबाबदारी आहे याचं भान कायमच असायला हवं. एखादा कार्यक्रम म्हणून झाड लावलं की आपलं काम झालं असं नाही.

त्या झाडाची निगा राखली पाहिजे, ते जगवलं पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल याची आठवण करून देणारा हा दिवस.

झाडं लावली की त्याची निगा राखली पाहिजे. काही कारणांमुळे परगावी जावं लागलं, घरात कोणीच नसेल तर झाडांची सोय कशी करणार हा प्रश्न असतोच.

झाडांना पुरेसं पाणी, खत, अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची सोय, कापणी अशा बऱ्याच गोष्टी असतात.

झाडांची हेळसांड होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. पण ती झालीच तर झाडांचं नुकसान तर होतंच शिवाय आपल्यालाही त्याचं वाईट वाटतं.

या सगळ्या समस्यांवर ठाण्यातल्या एका तरुणीने नामी उपाय शोधून काढले आहेत. ३७ वर्षांची गार्डनिंग एक्सपर्ट एनेट मॅथ्यू हिच्या मते आपण घरापासून लांब असलो तरी घरातल्या झाडांची निगा राखू शकतो.

गेल्या सात आठ वर्षांपासून मॅथ्यू यांनी स्वतःच्या घरची बाग खूप छान सांभाळली आहे. त्यांच्याकडे जवळपास तीनशे प्रकारची वेगवेगळी छोटी मोठी झाडं आहेत.

केवळ त्या एकट्याच नाही तर परिवारातील इतर सदस्य सुद्धा त्यांना बागकामात मदत करतात. बागकामासंदर्भात त्यांचा ‘गीक्स ऑफ ग्रीन’ नावाचा युट्यूब चॅनलसुद्धा आहे.

मॅथ्यू सांगतात की, त्यांच्या आई आणि सासूबाईंना बागकामाची खूप आवड आहे. पूर्वी त्यांना स्वतःला ही आवड विशेष नव्हती. सात आठ वर्षांपूर्वी मसूरीला त्यांच्या एका नातेवाईकांकडे गेल्या असताना त्या घरच्या बागेने त्यांना प्रचंड भूरळ घातली.

अशीच सुंदर बाग आपल्याही घरी असावी म्हणून त्यांनी येताना चाळीस प्रकारची सेक्युलंट रोपं आणली. अशी रोप शोभेची रोपं असतात. तसेच ती कमी पाण्यावर आणि कोरड्या हवेतही जगू शकतात.

सुरूवातीला त्यांनी आवडतील ती सगळी झाडं आपल्या बागेत लावायला सुरुवात केली. पण बागकामाचं ज्ञान जसं वाढत गेलं तसं आपल्या घराचं आवार पाहून निवडक झाडं लावायला सुरुवात केली.

त्यामुळे झाडांना एकमेकांचा त्रास होत नाही आणि ती चांगली टिकतात. त्यांनी आपल्या घरच्या बागेत भाज्या लावायला सुरुवात केली.

पण भाज्या चांगल्या लागल्या नाहीत. त्यांना लक्षात आलं की भाज्यांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश चांगला लागतो आणि त्यांच्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता.

२०१८ ला त्यांनी बागकामासंदर्भात स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू केला. मोजकेच व्हिडिओ त्यांनी चॅनलवर पोस्ट केले. नंतर त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एक दिवस त्यांनी पाहिलं की त्यांच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या चॅनलचे जवळपास साठ हजार सबस्काराइबर झाले.

मॅथ्यू सांगतात की, जर तुम्ही छान बाग तुमच्या घराच्या आवारात तयार केली आहे आणि काही कारणांमुळे तुम्हाला जास्त दिवस परगावी जावं लागणार असेल तर तुमच्या बागेची निगा राखण्याची जबाबदारी शक्यतो तुमच्या शेजारच्यांना द्या. अर्थात त्यांनाही बागकामाची आवड असेल तर तुमच्या बागेची चिंता मिटली.

१. एखादा वृक्षप्रेमी तुमचा मित्र असू द्या :

तुमचे शेजारी किंवा झाडांची निगा राखणारी तुमची जवळची व्यक्ती तुमच्या गैरहजेरीत तुमची बाग सांभाळणार असतील तर त्यांचं काम सोप होण्यासाठी काही योजना करा.

ज्या झाडांना कमी पाणी लागतं ती एका बाजूला घ्या, आठवड्यातून दोन तीन वेळा पाणी लागणारी झाडं एकीकडे आणि रोज पाणी द्यावं लागणारी झाडं वेगळ्या बाजूला ठेवायची. त्यावर गरजेनुसार एखादी खूण करावी.

रोपं अशा ठिकाणी ठेवावी जिथे त्यांना सूर्यप्रकाश भरपूर मिळेल पण खूप उन्हामुळे मातीतील आर्द्रता कमी होणार नाही. रोपांची निगा राखणारं साहित्य एका बाजूला एकत्र करून ठेवावं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सहज ते मिळेल आणि त्यांचं काम सोपं होईल.

२. डाय वॉटरिंग सिस्टिम :

परगावी जाताना रोपांना उजेड भरपूर मिळेल आणि मातीतील आर्द्रता दीर्घकाळ टिकून राहील अशा ठिकाणी रोपांची व्यवस्था करावी. एक आठवडा आधीपासूनच डाय वॉटरिंग पद्धत सुरू करावी.

एका प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून घ्यावं. बाटलीच्या झाकणाला बारीक चीर पाडावी. झाकणाची बाजू खाली करून उलटी बाटली कुंडीत रोपाजवळ ठेवावी. त्यामुळे रोपाला पाणी हळूहळू आणि दीर्घकाळ मिळत राहील.

रोपाला मातीची कुंडी असेल तर एका मोठ्या टबमध्ये पाणी भरून त्यात ठेवावी. पण त्यामुळे डास होण्याची शक्यता असते. म्हणून कपभर पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साईड आणि तीन चार थेंब डिशवॉश लिक्विड एकत्र करून ते मिश्रण टबमधल्या पाण्यावर फवारावं. त्यामुळे डास होणार नाहीत.

एखादी दोरी घ्यावी किंवा जुनं सुती कापड फाडून त्याची दोरी बनवावी. एका भांड्यात पाणी भरून दोरीचं एक टोक पाण्यात आणि दुसरं टोक रोपाच्या मुळाशी ठेवावं. त्यामुळे रोपाला सतत आणि पुरेसं पाणी मिळतं.

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा

३. पॉटिंग मिक्समध्ये बदल करावा :

आर्द्रता लवकर कमी होणारी माती असेल तर मातीच्या मिश्रणात बदल करावा लागेल. त्यासाठी सगळ्या कुंड्यांमध्ये मातीच्या खालच्या बाजूला कोकोपीट भरावं.

अशा कुंड्या थोड्या सावलीत ठेवाव्या. त्यामुळे मातीची आर्द्रता दीर्घकाळ टिकेल.

यासाठी मल्चिंगची पद्धतही वापरता येऊ शकते. कुंडीत पुरेसं पाणी घातल्यावर कुंडीभोवती एखादं सुती कापड ओलं करून लावावं. त्यामुळे कुंडीतील माती ओलसर राहील. आणि रोपाला सतत पाणी द्यावं लागणार नाही.

४. ड्रिप इरिगेशन सिस्टिम्स :

ड्रिप इरिगेशनचं साहित्य बाजारात मिळतं. आपल्या बागेतील रोपांचा अंदाज घेऊन त्याचं सेटिंग करता येतं.

या पद्धतीत टायमरची सोय असल्यामुळे ठराविक वेळाने आपोआप झाडांना पाणी मिळतं. एकदा पुरेसं पाणी भरून ठेवलं की सतत लक्ष द्यावं लागत नाही.

अशा प्रकारे घरच्या घरी काही उपकरणं वापरून आपण आपल्या रोपांची छान काळजी घेऊ शकतो. तुमच्या घरच्या बागेसाठीसुद्धा हे प्रयोग नक्की करून बघा आणि आपल्या बागेचं सौंदर्य वाढवा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा…”

    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।