फोटोच्या निगेटिव्हकडे टक लावून पाहिल्यास दिसते रंगीत चित्र! कसा घडतो हा चमत्कार?

मित्रांनो, नुकतेच आम्ही पेजवर एक फोटोच्या निगेटिव्हसारखे दिसणारे चित्र प्रसिद्ध केले.

त्या चित्राकडे एकटक पाहून शेजारी असणाऱ्या पांढऱ्या चौकोनात पाहिले की चक्क एक रंगीत फोटो दिसतो. कसा घडतो हा चमत्कार?

पेजच्या अनेक फॉलोअर्सना हा प्रश्न पडला आहे.

पण मित्रांनो, हा काही चमत्कार नव्हे, हे आहे ‘ऑप्टिकल फोटो ईल्युजन’ म्हणजेच दृष्टीसातत्य.

एखाद्या फोटोच्या निगेटिव्हवरुन रंगीत प्रिंट काढायची असेल तर डार्क रूमची गरज लागते परंतु आपल्या डोळ्यांना मात्र डार्क रूम शिवायच अशी रंगीत इमेज दिसु शकते.

आपला मेंदू आणि दृष्टी ह्यांच्या एकत्रित काम करण्याने हा चमत्कार घडतो. कसे ते आपण जाणून घेऊया.

ऑप्टिकल फोटो ईल्युजनकडे कसे पहावे?

१. दिलेल्या निगेटिव्ह फोटोच्या मध्यभागी असणाऱ्या डॉटकडे एकटक सलग ३० सेकंद ते १ मिनिट पहा.

२. मग ताबडतोब बाजूच्या पांढऱ्या चौकटीकडे पहा.

३. आपल्या पापण्या भराभर मिचकवा.

४. पांढऱ्या चौकटीत तुम्हाला रंगीत चित्र दिसेल.

(जर चित्र दिसले नाही तर दिलेल्या सूचना नीट पाळून पुन्हा प्रयत्न करा. स्क्रीन पासून तुमचे अंतर नीट ऍडजस्ट करा. निगेटिव्ह कडे एकटक पाहण्याची वेळ वाढवा. तुम्हाला रंगीत चित्र नक्कीच दिसेल. )

नक्की कसे घडते ऑप्टिकल ईल्युजन?

निगेटिव्ह इमेजची रंगीत इमेज दिसण्याचा हा चमत्कार म्हणजे ‘फोटोची आफ्टरइमेज’ आहे.

एखाद्या निगेटिव्ह चित्राकडे आपण सलग एकटक पाहिले की आपल्या डोळ्यातील फोटोरिसेप्टर्स आणि कॉन सेल्स मोठ्या प्रमाणात उत्तेजित होतात. त्यामुळे त्यांच्यातील सेंसेशन कमी होते.

एरवी आपल्याला हे जाणवत नाही कारण आपल्या नकळत आपल्या पापण्यांची हालचाल सुरु असते.

पापणी न हलवता एकटक पाहिल्यामुळे कॉन सेल्सची सेनसीटीविटी कमी होऊन आपल्याला शेजारी रंगीत चित्र दिसून येते.

म्हणजेच आपण काळ्या चित्राकडे एकटक पाहत असताना अचानक जर पांढऱ्या भागाकडे नजर फिरवली तर काळ्या रंगाच्या विरुद्ध असणारे रंग आपला मेंदू आपल्याला दाखवतो. म्हणून आपल्याला रंगीत चित्र दिसते.

मोठे चित्र पहात असताना असे घडते.

आणखी उदाहरण घ्यायचे झाले तर जांभळ्या रंगाच्या विरुद्ध असणारा रंग हिरवा आहे. जर आपण मोठ्या जांभळ्या रंगाच्या चित्राकडे एकटक पाहिले आणि आपली नजर एकदम वळवून पांढऱ्या भागाकडे नेली तर आपल्याला हिरव्या रंगाचे चित्र दिसेल. ही जांभळ्या रंगाची आफ्टरइमेज आहे.

अशा प्रकारे सर्व रंगांच्या विरुद्ध रंग आपल्याला दिसतात. हा फक्त आपल्या दृष्टी आणि मेंदूच्या संयोगाने होणारा एक शास्त्रीय प्रयोग आहे.

त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह फोटोची रंगीत इमेज दिसते.

चला तर मग मित्रांनो, आधी निगेटिव्ह इमेज शेअर करून तुमच्या सर्व मित्रमंडळींना आश्चर्यचकित करा आणि मग त्यामागचे हे शास्त्रीय सत्य सांगून त्यांना इम्प्रेस करा.

आणि अशा इंटरेस्टिंग पण अचंभित करणाऱ्या तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी कमेंटबॉक्स मध्ये कमेंट करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।