एलआयसीच्या ‘सरल पेन्शन’ योजनेत एकदा पैसे गुंतवा आणि दरमहा रु. १२०००/- पेन्शन मिळवा

तरुणपणी पैसे कमावताना बहुतेकांना म्हातारपणीची चिंता सतावत असते. सहाजिकच आहे. जेव्हा हातपाय चालेनासे होतील तेव्हा आपल्याला पुरेसे पैसे कसे मिळणार ह्याचा विचार सर्वांनी तरूणपणीच केला पाहिजे.

त्यामुळेच लोक निरनिराळ्या पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

अशीच एक उत्तम परतावा देणारी योजना एलआयसी ने आणली आहे. ‘सरल पेन्शन योजना’ असे तिचे नाव आहे. ह्या योजनेत केवळ एकदा प्रीमियमची रक्कम भरुन वयाच्या साठी नंतर दरमहा रु. १२०००/- पेन्शन मिळू शकेल. ही पेन्शनची रक्कम योजना घेणाऱ्या व्यक्तीला तहाहयात मिळू शकेल.

आपण ह्या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊया.

ह्या योजनेचे २ प्रकार आहेत.

१. लाइफ ऍन्यूइटी विथ १०० पर्सेंट रिटर्न ऑफ पर्चेस प्राइस (Life Annuity with 100 percent return of purchase price)

ह्या प्रकारात सदर पेन्शन योजना फक्त एका व्यक्तीसाठी असेल. योजना घेणारी व्यक्ती हयात असेपर्यंत त्या व्यक्तीला दरमहा पेन्शन मिळेल. परंतु त्यानंतर नॉमिनीला केवळ मुळ रक्कम परत मिळेल. पेन्शन मिळणे बंद होईल.

२. पेन्शन योजना जॉइंट लाइफ 

सदर योजनेत पती व पत्नी दोघांनाही सुरक्षा मिळेल. दोघांपैकी जो जास्त दिवस हयात असेल तितके दिवस पेन्शनची रक्कम मिळेल. दोघेही मृत्यू पावल्यानंतर नॉमिनीला मुळ रक्कम परत मिळेल. ह्या प्रकारात जोडीदार गेल्यावर एकट्या राहणाऱ्या वृद्ध लोकांना पेन्शन मिळते हा फायदा आहे.

‘सरल पेन्शन’ योजनेचे फायदे 

१. पेन्शनची रक्कम आवश्यकतेप्रमाणे दरमहा, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक पद्धतीने घेता येते.

२. योजना सुरु केल्यावर लगेच पेन्शनची रक्कम जमा होणे सुरु होते.

३. सदर योजना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेता येते.

४. ह्या योजनेत कमीतकमी रु. १२०००/- गुंतवणे आवश्यक आहे. रक्कम गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाही. जास्तीतजास्त कितीही रक्कम गुंतवता येते.

५. सदर योजना ४० ते ८० वयोगटातील लोकांसाठी आहे.

६. सदर योजनेवर विमा धारकाला लोन मिळू शकते. त्यासाठी योजना सुरु होण्याच्या तारखेपासून फक्त ६ महिने हा कालावधी जावा लागतो. त्यानंतर केव्हाही लोन मिळू शकते.

तर अशी ही एलआयसीची ‘सरल पेन्शन योजना’. ह्याचा जरूर लाभ घ्या. एकदाच पैसे गुंतवा आणि तहहयात पेन्शन मिळवा.

LIC Saral Pension plan Calculator, lic saral pension plan interest rate

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।