आपल्याकडे मिळालेले किंवा कमावलेले सगळे पैसे खर्च करून न टाकता काही पैश्यांची बचत करण्याचा सल्ला अगदी आवर्जून दिला जातो. ती भविष्यासाठी केलेली तरतूदच असते.
ह्याची सुरुवात लहान बाळाच्या जन्मापासूनच होते, बाळाला बघायला आलेल्या लोकांनी दिलेले पैसे आवर्जून बाजूला ठेवले जातात, बाळाच्या नावाने बँकेत साठवले जातात, पुढे मिळालेल्या बक्षिसाच्या रकमा, स्कॉलरशिप अशी त्यात वाढच होत जाते. आणि नोकरी मिळाल्यावर तर बचत करण्याचा सल्ला अगदी मिळतोच.
अशा प्रकारे बचतीचे बाळकडू मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना मिळतच असते. साठवलेले पैसे बँकेत ठेवण्यात येतात.
बँकेत बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा इतर विविध प्रकारे ते गुंतवून जास्त व्याजदर मिळवण्याकडे अनेकांचा कल असतो.
परंतु त्यातही सर्वात सुरक्षित आणि सांगितलेल्या दराने व्याज नक्की देणारी योजना म्हणजे बँकेची मुदत ठेव पावती किंवा फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD.
FD मध्ये पैसे गुंतवणे आजही सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. त्याचे प्रमुख कारण हे की FD मध्ये गुंतवलेल्या रकमेवर शेअर बाजारातील चढउतारांचा काही परिणाम होत नाही. गुंतवणूकीची इतर माध्यमे जसे की म्युच्युअल फंड, शेअर्स ह्यापेक्षा FD सुरक्षित समजली जाते.
आज आपण FD विषयी अधिक महिती जाणून घेऊया
१. एखाद्या बँकेत ग्राहकाने काही रक्कम ठराविक मुदतीसाठी ठेवणे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अर्थात FD.
२. ही मुदत कमीतकमी ७ दिवस ते जास्तीत जास्त १० वर्षे असू शकते.
३. किती मुदतीसाठी रक्कम ठेवणार त्यानुसार व्याजाचा दर बदलत जातो.
४. प्रत्येक बँकेचा आपापला व्याजदर असतो. साधारणपणे जास्त मुदतीसाठी जास्त व्याजदर मिळतो.
५. जेष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा अधिक व्याजदर मिळतो.
६. FD वर मिळणाऱ्या व्याजाचे दर सध्या कमी झाले असले तरीही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असल्यामुळे लोकांचा अजूनही FD करण्याकडेच कल दिसून येतो.
७. एकदा FD केली की ती रक्कम गुंतवली जाते. त्यामुळे चालू FD तील रक्कम ग्राहकाला वाढवता येत नाही. नवीन FD करावी लागते.
८. FD ची मुदत संपल्यावर पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा होतात किंवा ग्राहक ती FD पुढे तशीच चालू ठेवू शकतो. (रिन्यू करणे)
९. FD चे व्याज दर महिन्याला किंवा दर ३ अथवा ६ महिन्यांनी, दर वर्षी अथवा थेट मुदतपूर्तीनंतर घेता येते.
१०. मुदतपूर्ती होण्यापूर्वी ग्राहकाला आवश्यकता असेल तर FD मोडून पैसे उपलब्ध होऊ शकतात. परंतु ह्यामध्ये व्याजाचे नुकसान होऊ शकते. तसेच काही प्रमाणात दंड ही होऊ शकतो.
११. परंतु FD बाबतची सकारात्मक गोष्ट अशी की आपली संपूर्ण रक्कम कायम बँकेत सुरक्षित असते. आपले मूळ मुद्दल आपण कधीही काढू शकतो. शेअर बाजारातील चढउतारांचा आपल्या गुंतवणुकीवर काहीही परिणाम होत नाही.
FD मध्ये गुंतवलेली रक्कम आणि इन्कम टॅक्स
FD वर मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्न आहे.
गुंतवणूकदाराच्या उत्पन्नाच्या आधारे तो ज्या टॅक्स स्लॅब मध्ये येत असेल त्यानुसार ० ते ३०% इतका टॅक्स FD वरील उत्पन्नाचा कापला जातो.
हा टॅक्स टीडीएस म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स ह्या पद्धतीने कापला जातो.
जर गुंतवणूकदाराने आपला टॅक्स स्लॅब सांगितला नसेल तर बँक सरसकट २०% टीडीएस कापते. जर गुंतवणूकदार त्यापेक्षा कमी अथवा ० टॅक्स भरणारा असेल तर तसा फॉर्म FD करतानाच बँकेत भरून द्यावा लागतो. जेणेकरून बँक टीडीएस कापणार नाही. सामान्य आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे फॉर्म असतात.
तर मित्र मैत्रिणींनो, ही आहे त्यातल्या त्यात सुरक्षित असणाऱ्या FD ह्या गुंतवणुकीची माहिती.
FD कुठल्याही राष्ट्रीयीकृत अथवा खाजगी बँकेत करता येते. परंतु लहान बँक अथवा पतपेढी इथे FD करताना त्यांच्या रेप्युटेशनची खात्री करून घ्यावी. म्हणजे आपली रक्कम सुरक्षित राहते.
तर अशा प्रकारची गुंतवणूक जरूर करा आणि आपल्या भविष्याची सोय करा.
ह्यासंबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये जरूर विचारा. तसेच हा लेख जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
गुंवणूकीबद्दल माहिती सांगणाऱ्या लेखांच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.
FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात
FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
10% स्लॅब मध्ये मोडत असेल तर तसे बँकेला कळवावे लागते का? त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल..