ऑक्टोबर महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होतात. ह्या ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बँका तब्बल २१ दिवस बंद असणार आहेत.
देशाच्या निरनिराळ्या भागात साजरे केले जाणाऱ्या सणांमुळे त्या त्या ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँका २१ दिवस बंद असणार आहेत. त्यापैकी १४ दिवस असणाऱ्या सुट्ट्या ह्या रिझर्व बँकेने जाहीर केल्या आहेत आणि सात दिवस आठवडी सुट्टीचे (शनिवार/ रविवार) आहेत.
आपल्या पेजचे वाचक देशभरात सगळीकडे आहेत. त्यामुळे सर्वांच्या सोयीसाठी ऑक्टोबर महिन्यात देशात बँकांना कधी व कशा सुट्ट्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१ ऑक्टोबर – सहामाही क्लोजिंग. ३० सप्टेंबरला होणाऱ्या सहामाही क्लोजिंगमुळे बँकेतील अकाउंटिंग चे काम खूप वाढलेले असते. त्यामुळे १ ऑक्टोबरला अशा बँकांना सुट्टी आहे.
२ ऑक्टोबर – गांधी जयंती. गांधी जयंती निमित्त संपूर्ण भारतभरात सर्व बँका आणि सरकारी आणि निमसरकारी कार्यालये ह्यांना सुट्टी असते.
३ ऑक्टोबर- रविवार. सर्व ठिकाणच्या बँकांना सुट्टी आहे.
६ ऑक्टोबर – महालया अमावस्या. ही सुट्टी अगरताला, कलकत्ता आणि बंगलोर येथील बँकांना आहे.
७ ऑक्टोबर – महाराज अग्रसेन जयंती. यानिमित्त हरियाणा आणि मणिपूर येथील बँकांना सुट्टी आहे.
९ ऑक्टोबर – सेकंड सॅटर्डे. दुसरा शनिवार असल्यामुळे देशातील सर्व बँकांना सुट्टी.
१० ऑक्टोबर – रविवार. देशातील सर्व बँकांना सुट्टी
१२ ऑक्टोबर – दुर्गा पूजा सप्तमी निमित्त अगरताला आणि कलकत्ता येथील सर्व बँका बंद.
१३ ऑक्टोबर – दुर्गा पुजा अष्टमी निमित्त अगरताला, भुवनेश्वर, कलकत्ता, गोवाहाटी, गंगटोक, पटना आणि रांची येथील सर्व बँकांना सुट्टी.
१४ ऑक्टोबर – दुर्गा पूजा महानवमी निमित्त अगरताला, भुवनेश्वर, कलकत्ता, गंगटोक, गोवाहाटी, कानपूर, लखनऊ, शिलॉंग, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, पाटणा आणि रांची येथील सर्व बँकांना सुट्टी
१५ ऑक्टोबर – दसरा. दसऱ्यानिमित्त देशभरातील सर्व बँकांना सुट्टी. परंतु या दिवशी इम्फाळ आणि शिमला येथील बँकांमध्ये कामकाज सुरू राहील.
१६ ऑक्टोबर – गंगटोक येथे दुर्गा पूजन निमित्त बँकांना सुट्टी.
१७ ऑक्टोबर – रविवार. देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी
१८ ऑक्टोबर – काटी बिहू निमित्त गोवाहाटी मध्ये बँकांना सुट्टी.
१९ ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मु, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपुर, रांची, श्रीनगर आणि तिरूवनंतपुरम येथील बँकांना सुट्टी.
२० ऑक्टोबर- महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त अगरताला, बंगलोर, चंदिगड, कलकत्ता आणि सिमला येथील बँकांना सुट्टी
२२ ऑक्टोबर – ईद नंतरचा प्रथम शुक्रवार असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथील बँकांना सुट्टी
२३ ऑक्टोबर- फोर्थ सॅटर्डे. चौथा शनिवार असल्यामुळे देशातील सर्व बँकांना सुट्टी
२४ ऑक्टोबर- रविवार. देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी
२६ ऑक्टोबर – जम्मू आणि श्रीनगर येथील बँकांना सुट्टी
३१ ऑक्टोबर – रविवार. देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी
तर या आहेत ऑक्टोबर महिन्यात बँकांना मिळणाऱ्या सुट्ट्या. बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली आर्थिक कामे वेळेत करून घ्या. ही माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.