कमीत कमी रिस्कमध्ये मासिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार करा.
कमी धोका आणि नियमित मासिक उत्पन्न याची प्रत्येकाला गरज वाटते.
विशेषतः सेवा निवृत्त झालेल्या व्यक्ती किंवा नवीन उद्योजक ज्यांना व्यवसाय स्थिर होईपर्यंत नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते त्यांना दरमहा उत्पन्न मिळणंं गरजेचं असतं.
तसं पाहीलं तर प्रत्येकाला काही ठराविक रक्कम नियमितपणे मिळाली तर सुरक्षित वाटतं.
पण नेमकं काय करायचं की आपल्याला नियमित उत्पन्न मिळू शकेल?
त्यासाठी आहे ही 11 सर्वोत्तम गुंतवणूकींची यादी.
१) बँकेकडून मासिक उत्पन्न योजना मिळवा.
फिक्स डिपॉझिट स्कीम मधून बँकेत नियमित मासिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार करता येईल. हा गुंतवणूकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.
मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक अंतराने व्याज देण्याचे वेळापत्रक बँकेंकडून ठरवून घेऊन नियमित उत्पन्न मिळवता येते.
2) पोस्ट ऑफिस मासिक प्राप्ती योजना.
पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवून तुम्हाला नियमित व्याज मिळू शकतं.
यात गुंतवणुकीचा कालावधी फक्त 5 वर्षांचा असतो.
3) ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असल्यामुळे लोकप्रिय आहे.
योग्य गुंतवणूक करून व्याज, बँक खात्यात दर तीन महिन्याच्या अंतराने मिळवता येतं.
4) प्रधानमंत्री वय वंदना योजना
ही एक पेन्शन योजना आहे जी भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मे 2017 मध्ये सुरू केली आहे
यामध्ये LIC द्वारे रक्कम गुंतवून एखादी व्यक्ती एकरकमी प्रधानमंत्री वय वंदना योजना खरेदी करू शकतो आणि 10 वर्षांसाठी नियमित उत्पन्न ही मिळवू शकते.
5) कंपनी बाँड
काही खाजगी कंपन्या वेळोवेळी बॉण्ड उपलब्ध करुन देत असतात.
डीमॅट खातं काढून हे बॉण्ड आपल्याला खरेदी करता येतात.
याचं व्याज थेट बँकेत जमा होतं.
6) कंपनी मुदत ठेव.
सरकारी आणि खाजगी कंपनीतून मासिक/त्रैमासिक किंवा वार्षिक व्याजासह मुदत ठेवी योजना दिल्या जातात.
यात गुंतवणूक करता येऊ शकते. ज्यातून नियमित उत्पन्न मिळवता येऊ शकतं.
7) म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याची योजना नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी प्रभावीपणे वापरली जाऊ शकते.
या फंडांचे बँक एफडी सारखेच परतावे असतात.
8) रिअल इस्टेटमधून नियमित भाडे.
रिअल इस्टेटमधून भाडयाच्या रूपात उत्पन्न मिळवणे हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
रहाण्यासाठी फ्लॅट किंवा व्यावसायिक तत्वावर गाळे भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळवता येते.
9) उलट गहाणखत
रिव्हर्स मॉर्टगेज हे एक विशेष प्रकारचे कर्ज आहे.
जिथे घरावर कर्ज मिळू शकतं.
या कर्जाची भरपाई हप्त्यांमध्ये केली जाते.
त्याचा रिव्हर्स ईएमआय म्हणून विचार केला जातो .
बर्याच बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या हे कर्ज देतात.
10) सरकारी सिक्युरिटीज/बॉण्ड्स (G-Secs)
G-Secs हे भारत सरकारच्या वतीने RBI ने उपलब्ध करून दिलेले सरकारी रोखे आहेत.
एखाद्या संस्थेसाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून मात्र खूप कमी प्रमाणात यात गुंतवणूक केली जाते.
या बाँडचा कालावधी 30 वर्षांपर्यंत असतो.
या शिवाय करदात्यांसाठी करमुक्त बॉण्ड योजना ही नियमित उत्पन्नाचं साधन आहे.
डीमॅट खात्याद्वारे याची खरेदी करता येतात.
तर 10 प्रकारच्या गुंतवणूक योजना आज आपण जाणून घेतल्या.
अशा अनेक गुंतवणूक योजना नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरु शकतात.
तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने ही गुंतवणूक करून आपण नक्कीच नियमित उत्पन्न मिळवू शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
CHAN LEKH…