Omega-3 Fatty Acids: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे होणारे आजार 

ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवतात. त्वचेची जळजळ होणं, त्वचा कोरडी पडणं, नैराश्य येणं डोळे कोरडे पडणं, सांधेदुखी, हाडात येणारा कडकपणा आणि केसांच्या समस्यात होणारी वाढ ही लक्षणं ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे दिसू शकतात.

पूरक आहारातून आपण ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरात वाढवू शकतो. ओमेगा-3 च्या कमतरतेमुळे होणारे रोग नेमके ओळखून योग्य आहाराने ते बरे करायचा प्रयत्न करता येऊ शकतो.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड म्हणजे काय?

फिटनेसच्या या जमान्यात आपल्या कानावर सतत काही शब्द पडत असतात. त्यामध्ये एक ओमेगा फॅटी ऍसिड हा शब्दसुद्धा असतो.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हे एक पोषक तत्व आहे जे ठराविक पदार्थांतून आपल्या शरीराला मिळत असतं.

जरी यात फॅट म्हणजे मेदाचा उल्लेख असला तरी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हे मेद शरीराला आवश्यक असतं, जे शरीरात तयार होत नाही, आहारातून हे शरीराला पुरवावं लागतं.

शरीराच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड फार गरजेचं आहे. पेशींच्या रचनेसाठी याचा उपयोग होतो.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीराला उर्जा ही मिळते. ह्दय, फुफ्फुसं, रक्तवाहिन्या आणि रोगप्रतिकारक शक्तीला मदत मिळते.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड तीन प्रकारचे असतात.

१)अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, २)इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड ३)डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड

अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड डाळीमधून मिळते. इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड माशांमधून मिळतं

ओमेगा ३’चे उत्तम स्रोत म्हणजे मासे, सॅल्मन, सार्डिन, हेरिंग, अ‍ॅन्कोविज, ऑयस्टर या जातीच्या माशांमधुन हे मुबलक प्रमाणात मिळतं. त्याचबरोबर माशांपासून तयार केलेले तेल, कॉर्ड लिव्हर ऑईल हे सुद्धा पूरक आहेत.

शाकाहारी मंडळींना मात्र हिरव्या पालेभाज्या, जसं की पालक त्याचबरोबर अळशीची बी, सोयाबीन, राजमा, मटकी, ब्लॅक बीन्स, अक्रोड, ब्रसेल्स स्प्राऊट यातून हे अ‍ॅसिड मिळते.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेची लक्षणं कोणती ?

१) त्वचेची आग होणं आणि त्वचा कोरडी पडणं.

शरीरात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड कमी पडायला लागलं तर सगळयात पहिल्यांदा त्वचेवर परिणाम होतो. त्वचा कोरडी निबर होण्याबरोबरच पिंपल्सच्या संख्येत वाढ व्हायला लागते.

२) डिप्रेशन

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मेंदूसाठी आवश्यक घटक आहे. अल्जाइमर, स्मृतिभ्रंश आणि मेंदूच्या अनेक विकारात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड प्रभावी ठरतं.

डिप्रेशन अणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांच्यात घनिष्ट संबंध आहे.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आहारातून घेतल्यामुळे डिप्रेशन कमी व्हायला मदत होते.

3) डोळ्यांचा कोरडेपणा

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड महत्वपूर्ण भूमिका बजावतं

डोळ्यांचा ओलावा कायम राखणे आणि अश्रूंच्या निर्मितीसाठी ही याची गरज असते.

यासाठी डॉक्टर सुध्दा डोळ्यांच्या ओलाव्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा डोस सुचवतात.

याच्या कमतरतेमुळे दृष्टीवर ही परिणाम होऊ शकतो.

4) संधीवात

वाढत्या वयात संधीवात, सांधे आखडणे अशा गोष्टी घडतात. ही ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता असू शकते.

ऑस्टियोआर्थराइटिस विकारात, ज्यामध्ये हाडे झाकलेली कूर्चा तुटते. त्यामागे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता असते.

काही संशोधनात असं आढळून आले आहे की ओमेगा -3 पूरक आहार घेतल्यास सांधेदुखी कमी होण्यास आणि शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे.

5) केसांच्या आरोग्याची हेळसांड

ओमेगा-3 फॅट त्वचेमध्ये ओलावा राखण्याबरोबर केसांचं आरोग्य जपण्यासाठी उपयोगी ठरतं. केस गळणे, केस तुटणे ही लक्षणे ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे दिसू शकतात.

6 महिने कालावधीसाठी 120 महिलांच्या केसांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की ओमेगा-3 बरोबर ओमेगा-6 फॅट आणि अ‍ॅंटिऑक्सीडेंटची मात्रा दिल्यानंतर केसगळतीत लक्षणीय फरक दिसून येतो.

वेळीच ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेविषयी जागरूक व्हा. आहारातून योग्य प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळत असल्याची खात्री करून घ्या आणि अनेक समस्यातून मुक्ती मिळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।