फेसबुक ओपन केल्यानंतर कानशिलात मारण्यासाठी भारतीय माणसाकडून अमेरिकेत महिलेला मिळतो घसघशीत पगार.
एलन मस्क सुद्धा हे पाहून हैराण!!
सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी आपण बर-याच गोष्टी करत असतो.
अगदी रोज सकाळी उठल्यावर आपण ठरवतो की छे आज काही सोशल मीडियावरती फार वेळ घालवायचा नाही. आपापली कामं करायची.
पण पाचच मिनिटं हां असं म्हणत एकदा का सोशल मीडिया सुरू झाला की वेळ कसा भराभरा उलटून गेला हे आपल्याला कळतही नाही.
यासाठी बरेच जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच प्रश्न विचारतात की तुम्ही सोशल मीडियावरचा वेळ कमी करण्यासाठी काय युक्ती करता ते मलाही सांगा!!
सोशल मीडियाचे यूजर्स ही उत्साहाने स्क्रीन टाईम कसा कमी करायचा याविषयी वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या आयडियाज शेअर ही करत असतात.
पण अमेरिकेत रहात असणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या एका माणसानं सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी जो काही मार्ग अवलंबलेला आहे तो ऐकून तुम्ही सुद्धा थक्कं व्हाल.
अहो स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी या माणसानं चक्क एका महिलेला कामावर ठेवलेलं आहे!!
आणि त्या महिलेचं काम काय तर या माणसानं सोशल मीडिया ओपन केलं की तिने त्याच्या चक्क कानफटीत द्यायचं….
आणि यासाठी तिला पगारही मिळतो हे विशेष.
सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी जेव्हा ही आयडीया ऐकली तेंव्हा त्यांनीसुद्धा डोक्याला हात लावला असेल….
मनिष सेठी असं या भारतीय वंशाच्या अमेरिकन माणसाचं नाव आहे, जे Pavlok नावाच्या डिवाइस ब्रँड चे संस्थापक आहेत.
कुठल्याही उद्योजकासाठी वेळ हा अतिशय मौल्यवान असतो आणि हाच वेळ वाचवण्यासाठी सोशल मीडियापासून दूर रहाणं अतिशय गरजेचं असतं.
आणि म्हणूनच मनीष यांनी एका महिलेला नोकरीवर ठेवलेलं आहे.
ही महिला मनीष यांनी फेसबुक ओपन केलं की चक्क त्यांच्या थोबाडीत मारते.
ज्यामुळं मनीष आपला वेळ वाया न घालवता कामाकडे लक्ष देतात.
यासाठी मनीष यांनी अमेरिकेच्या जाहिरात वेबसाईट वरती एक जाहिरातच दिलेली होती.
या जाहिरातीत त्यांनी असं म्हटलं होतं की, अशी व्यक्ती हवी आहे जी मनीष यांच्याबरोबर सतत असेल आणि जेव्हा मनीष फेसबुक ओपन करतील तेव्हा त्यांना ओरडेल किंवा गरज पडली तर चक्क कानफटीत सुद्धा देईल.
या जाहिरातीला कारा नावाच्या महिलेने प्रतिसाद दिला.
तिला या कामाचे एका तासाचे आठ डॉलर म्हणजे साधारण 595 रुपये मिळतात.
घर हॉटेल किंवा मीटिंग कुठेही मनीष गेले तरी ही महिला त्यांच्या सोबत असते त्यांच्या वर लक्ष ठेवते.
मनीष यांनी आपला एका ब्लॉगमध्ये असं म्हटलं आहे की इतर वेळेला माझी प्रॉटडक्टिविटी दिवसाला 35 ते 40 % असते.
पण काराचं जेंव्हा माझ्यावरती लक्ष असतं तेव्हा माझी ही प्रॉटडक्टिविटी 98 % वाढलेली असते.
आणि ही काही एक दोन दिवसातली किंवा एक दोन महिन्यातली घटना नाही बरं का तर मनिष सेठी साधारण 2012 पासून असा प्रयोग करताहेत.
आजतागायत हा प्रयोग चालू आहे म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी फायदा असणार.
हा प्रयोग उजेडात आला तो एलन मस्क यांचं जेव्हा या प्रयोगाकडे लक्ष गेलं आणि त्यांनी एक ट्विट केलं….
🔥🔥
— Elon Musk (@elonmusk) November 10, 2021
सगळ्या जगाचं लक्ष या एका ट्विटमुळे मनिष यांच्या प्रयोगाकडे वेधलं गेलं.
एका व्यक्तीनं मनीष सेठी यांच्या या प्रयोगाविषयी ट्विट केलं होतं आणि या ट्विटला एका ईमोजी द्वारे एलन मस्क यांनी प्रतिसाद दिला होता.
एलन मस्क यांच्या प्रतिसादावरती खुद्द मनीष सेठी यांनी रिप्लाय केला ते म्हणाले “मीच ती व्यक्ती आहे ,आणि ऍलन मस्क यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिल्यावर मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचेन”.
तर मित्रांनो सोशल मीडियावर वाया जाणारा वेळ हा खरच एक चिंतेचा विषय आहे.
मात्र सोशल मीडिया ही आजच्या काळाची गरज आहे.
त्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने मर्यादित वेळेत करता?
यासाठी तुमची स्वतः ची खास अशी काही आयडिया असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये आम्हांला नक्की सांगा. यासाठी मी काय केलं तर, शॉर्ट व्हिडीओला हाईड केलं… कारण ते शॉर्ट व्हिडीओ दिसले तर कमीत-कमी १५ मिनिटांना तरी चुना लागायचाच लागायचा!!
पण हो मनाचेTalks वाचण्या-बघण्यासाठी मात्र न चुकता फेसबुकवर यायचं बरंका!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.