२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

आपण गणित शिकतो, भाषा शिकतो पण संविधान कधी शिकतो का?

आता शाळेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका छापलेली आहे.

संविधानाची ओळख होण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे हे निश्चित.

भारतीय नागरिक होण्यासाठी किमान प्रशिक्षण असा त्याचा अर्थ होतो.

पण संविधान म्हणजे नेमकं काय?

व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. १८५७ ते १९४७ असा दीर्घ काळाचा स्वातंत्रलढा या देशात झाला.

कितीतरी अज्ञात लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कितीतरी जणांनी तुरुंगवास पत्करला.

पण तरीसुद्धा प्रत्येक व्यक्ती जात, पात, पंथ, धर्म हे सारे भेद विसरून एक होऊन ब्रिटिशांशी लढत होती

या सा-याचं फलीत म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.

मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची नवी राज्यघटना बनवली गेली.

कारण प्रत्येक लोकशाही राज्याला मूलभूत कायदा गरजेचा असतो.

राज्य घटनेतून आपल्या देशाची आधारभूत तत्त्वं लक्षात येतात.

न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, कार्यपालिका, नागरीक ही राज्याची प्रमुख अंगे असतात.

या सगळ्याचा विचार करुन भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.

तेच आपलं संविधान.

भारताची राज्यघटना हे भारताचं संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

भारत स्वतंत्र झाल्यावर २९ ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं राज्यघटना लिहायला सुरुवात केली.

पं. जवाहरलाल नेहरू, कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटनेच्या निर्मितीची १६५ दिवस बैठक झाली.

११४ दिवस मसुद्यावर चर्चा झाली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना मंजूर करण्यात आली. आणि २६ जानेवारी १९५० पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली.

२६ नोव्हेंबर १९४९ ला संसदेत संविधानाला मान्यता दिली.

आणि म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

भारताच्या या संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क आणि अधिकार यांचा समावेश आहे.

संविधानाच्या प्रास्ताविकेत असं नमूद करण्यात आलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य निर्माण करायचं आहे.

संविधानाचा मांडलेला हा निश्चय आणि निर्धार तेंव्हाच प्रत्यक्षात येईल जेंव्हा प्रत्येक जण आपलं नागरिक कर्तव्य पार पाडेल.

राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची निर्मिती केलेली होती.

डॉ राजेंद्र प्रसाद या संविधान सभेचे अध्यक्ष होते.

या संविधान संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

भारतीय राज्यघटना हे जगातील सगळयात मोठं लिखित असं संविधान आहे.

समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय याचबरोबर प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजं रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

भारतीय संविधान हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत हातानं लिहिलं गेलं.

बिहारी नारायण रायजादा यांनी ते कॅलिग्राफीत लिहून काढलं.

भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्कं कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे या संविधानात असल्यामुळे त्याला जागतिक स्तरावरचा एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज मानलं जातं.

भारतीय संविधान स्पष्ट आणि निसंदिग्ध आहे. शासनाच्या सर्व बाजुंचा विचार यात दिसून येतो.

भारतीय राज्यघटनेवर, या संविधानावर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रदीर्घ इतिहास, समाजजीवनाच्या प्रेरणा, समाजाचा विकासक्रम यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं.

लोकशाही हाच भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे. लोकशाही ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.

ही प्रक्रिया प्रगतीकडे नेणारी असली पाहिजे.

ही प्रगती लोकशाहीत आणण्यासाठी भारतीय जनता, त्याचबरोबर भारतीय संविधान सक्षम आहे यात शंका नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।