अवघ्या काही मिनिटात तयार करा हीटर
थंडीत घर ठेवा उबदार कमीत कमी खर्चात !
गुलाबी, शिरशिरी आणणारी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.
पण जसजसा हिवाळा वाढत जातो तसतशी थंडी बोचरी होते. सहन होत नाही.
त्वचा कोरडी पडते. हातपाय आखडतात. अशा वेळी रुममध्ये हिटर असता तर किती बरं झालं असतं असं वाटतं.
पण एक हीटर बसवायचा म्हणजे केवढा खर्च, त्याशिवाय गॅसचा किंवा लाईटचा खर्च वेगळाच असं जर तुम्हाला वाटत असेल तर, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कमीत कमी खर्चात घरी तयार करता येणाऱ्या इको फ्रेंडली हीटर विषयी… 🔥🔥
हा हिटर तयार करायला फार वेळ लागत नाही, वस्तू ही जास्तही लागत नाहीत आणि खर्चही फार नाही.
चला तर मग जाणून घेऊया रूम उबदार करणारा हीटर घरच्या घरी अगदी काही मिनिटात कसा तयार करायचा.
यासाठी ज्या वस्तू तुम्हाला लागणार आहे त्या कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होतील .
तुम्हांला लागणार आहेत टेराकोटाच्या दोन कुंड्या, यातली एक लहान आणि दुसरी त्याच्यापेक्षा थोडी मोठी.
त्याचबरोबर दिवाळीच्या पत्र्याच्या गोल पणत्या असतात त्या पणत्या लागतील.
एक धातूचा कंटेनर, लोफ टिन म्हणजे थोडक्यात खोलगट ट्रे, जो ब्रेड वगैरे बेक करण्यासाठी वापरला जातो.
आता यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो धातूचा कंटेनर घेणार आहात त्याच्यामध्ये चार पणत्या व्यवस्थित बसल्या पाहिजेत.
कंटेनर वरती एक छोटी कुंडी पालथी घातल्यावर थोडी जागा शिल्लक राहिली पाहिजे.
त्यावर दुसरी कुंडी पालथी घातल्यानंतर कंटेनर झाकला गेला पाहिजे.
तर या मापानं सगळी खरेदी तुम्हांला करायची आहे.
एवढ्याच वस्तू घेऊन तुम्ही तुमच्या घरी एक छान हीटर तयार करू शकता जो तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये एक छान ऊबदार अनुभव देईल.
आता हीटर नेमका कसा तयार करायचा?
अगदी सोपं आहे. पहिल्यांदा धातूच्या कंटेनर मध्ये चार पणत्या ठेवून त्या पेटवा त्यावर छोटी कुंडी पालथी घाला.
जर टेराकोटाच्या या कुंडीला छिद्र असेल तर त्यावर एक पणती ठेवा आणि छिद्र झाकून घ्या ही पणती पेटवण्याची गरज नाही.
आता त्यावर मोठी कुंडी पालथी घालायची आहे आणि जराशी वाट बघायची.
थोड्या वेळात ही रचना हळूहळू गरम व्हायला लागेल आणि त्याबरोबर तुमची सगळी खोली उबदार होईल.
रोज रात्री फक्त चार पणत्या पेटवून तुम्ही तुमचा हिटर वापरू शकता.
याला विज बिल नाही, की गॅसचा खर्चही नाही.
अगदी बाहेर गावीही हा हीटर तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता.
या पणत्यांमध्ये किंचित अरोमा ऑईल घालून तुम्ही वातावरण आणखी आनंदी, सुंगंधी करू शकता.
तर कमीत कमी खर्चात घरांमध्ये सहज तयार होणारा हा हिटर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप सुंदर कल्पना आहे