तुमच्या होम लोनचा इ. एम. आय. जास्त आहे का? दर महिन्याला असा जास्त इ. एम. आय. भरणे तुम्हाला अवघड जात आहे का? असे असेल तर हा लेख तुमच्या साठी महत्वाचा आहे.
सध्या आपण मनाचे Talks वर होम लोन आणि त्यावर भरावे लागणारे ई. एम. आय. या संदर्भातील वेगवेगळे लेख वाचत आहोत. जिज्ञासूंना वाचण्यासाठी त्या सर्व लेखांची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
आज आम्ही अशाच प्रकारचा वाचकांना इ. एम. आय. कमी करण्यास मदत करेल असा लेख घेऊन आलो आहोत. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपले स्वतःचे घर असावे असे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते आणि सध्याच्या काळातील घरांच्या वाढत्या किमती पाहता बँकेकडून होम लोन घेतल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणे जवळपास अशक्य आहे.
त्यामुळे आपल्यापैकी बहुतेकांनी होम लोन घेतलेले असते आणि दर महिन्याला ते फेडण्यासाठी हप्ता म्हणजेच ई. एम. आय. भरणे ही गोष्ट देखील आपल्यापैकी बहुतेकांना करावी लागते.
वेगवेगळ्या कारणांमुळे आपण भरत असलेला इ. एम. आय. जास्त आहे असे आपल्याला वाटू शकते. म्हणून आम्ही आज तुम्हाला होम लोन वरील इ. एम. आय. कसा कमी करायचा ते सांगणार आहोत.
१. इ एम आय कमी करण्याचा विचार सर्वप्रथम होम लोन घेतानाच केला पाहिजे. घराच्या किमती पैकी जास्तीत जास्त रक्कम स्वतः डाऊन पेमेंट म्हणून भरण्याचा प्रयत्न करा.
असे केल्यामुळे तुमची होम लोनची रक्कम म्हणजेच घ्यावे लागणारे कर्ज कमी होईल आणि अर्थातच त्यामुळे त्यावर भरावे लागणारे व्याज आणि त्याचा येणारा मासिक हप्ता (ई. एम. आय.) देखील कमी होईल.
२. होम लोन घेतानाच ई एम आय कमी होण्यासाठी विचारात घेण्याचा दुसरा पर्याय म्हणजे लोन फेडण्याची मुदत.
लोन फेडण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवून घ्या. असे केल्यामुळे कर्जफेडीची मुदत जास्त असल्यामुळे येणारा हप्ता कमी असेल. परंतु यासाठी तुम्हाला भरावी लागणारी व्याजाची रक्कम वाढेल. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय चांगला आहे कारण छोटा ई एम आय भरून स्वतःच्या मालकीचे घर घेणे शक्य होऊ शकेल.
किती मुद्दलाच्या रकमेवर किती मुदतीसाठी किती ई एम आय भरावा लागेल ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ई एम आय कॅल्क्युलेटरचा वापर करा. यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. (येथे क्लिक करा)
३. होम लोन घेतल्यानंतर सुरू असणारा ई एम आय कमी करण्यासाठी प्री पेमेंट म्हणजेच कर्जाच्या मुद्दलातील काही रक्कम एकरकमी भरण्याचा विचार करा.
तुमच्याकडे बोनस किंवा इतर काही कारणाने जर एखादी मोठी रक्कम उपलब्ध झाली असेल तर त्या रकमेतून होम लोनचे प्री पेमेंट अवश्य करा. असे करण्यामुळे एक तर तुम्ही कर्ज फेडण्याची मुदत कमी करून घेऊ शकता किंवा भराव्या लागणाऱ्या ई एम आय ची रक्कम कमी करून घेऊ शकता.
४. जर तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरत असाल आणि ज्या वित्तीय संस्थेकडून तुम्ही कर्ज घेतले आहे त्यांचे तुम्ही जुने कस्टमर असाल तर तेथील अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला भरावा लागणाऱ्या व्याजाचा दर कमी करून घेऊ शकता.
व्याजाचा दर कमी झाल्यामुळे अर्थातच भरावा लागणारा ई.एम.आय. देखील कमी होऊ शकेल.
अर्थात ही सुविधा सरकारी आणि निमसरकारी बँकांमध्ये उपलब्ध नाही. त्यांचा व्याजाचा दर नियमानुसार ठरलेला असतो. खाजगी वित्तीय संस्थांकडून अशा पद्धतीची सुविधा मिळू शकते.
५. तुमच्या होम लोनवर तुम्ही भरत असलेल्या व्याजाच्या दराची इतर बँका आणि वित्तीय संस्था आकारत असलेल्या व्याजदराशी तुलना करून पहा.
जर इतर बँका आणि वित्तीय संस्था आकारत असलेल्या व्याजदरापेक्षा खूप जास्त व्याजदराने तुम्ही कर्जफेड करत असाल तर तुमचे गृह कर्ज (होम लोन) अशा बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ट्रान्सफर करा.
तसे केल्यामुळे कमी व्याजदर लागून तुम्हाला भरावा लागणारा ईएमआय कमी होऊ शकेल. अर्थात, असे गृहकर्ज ट्रान्सफर करताना त्या बँक किंवा वित्तीय संस्थेची संपूर्ण माहिती घेऊन खात्री पटल्यावरच असा व्यवहार करावा.
तर मित्र मैत्रिणींनो, हे आहेत असे पाच उपाय ज्यामुळे आपल्या गृहकर्जावर भरावा लागणारा इ एम आय कमी करून घेता येईल.
या उपायांचा वापर अवश्य करा आणि तुमचा ई एम आय कमी करून घ्या. सध्याच्या काळात जेव्हा नोकरी, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे अशा वेळी ईएमआयची रक्कम कमी झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकेल.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका.
तुमचे होम लोनचे हप्ते थकले आहेत का? घाबरून जाऊ नका
मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे
जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) यातील फरक?
घर खरेदी करताय? होम लोन घेण्याचा विचार करताय? ह्या ६ गोष्टींचा विचार जरूर करा
गृहकर्जाची / होमलोनची परतफेड केल्यानंतर या ८ गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.