शॅम्पू लावला की तुमचे केस खूप गळतात का? मग हे उपाय करा

शॅम्पू लावला की तुमचे केस खूप गळतात का? असे असेल तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला शॅम्पू लावूनही केस गळू न देण्याचे काही सिक्रेटस् सांगणार आहोत.

खरं तर केस नियमित धुवून स्वच्छ ठेवणे ही अगदी आवश्यक गोष्ट आहे आणि आपण सगळेजण ते अगदी नियमितपणे करतही असतो.

पण शॅम्पू लावून केस धुताना जेव्हा भरपूर केस गळतात तेव्हा मात्र आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

इतके केस गळून जाताना पाहणे त्रासदायक तर नक्कीच असते.

परंतु आजच्या धावपळीच्या युगात शॅम्पू न वापरणे हे देखील शक्य नाही.

आपले केस स्वच्छ ठेवण्याचा तोच सर्वात सोपा आणि सहज उपलब्ध असणारा पर्याय आहे. पारंपरिक पद्धतीने केस धुण्याइतका वेळ आज आपल्याकडे नाही.

परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की आधुनिक पद्धत वापरुन आपल्या केसांचे नुकसान व्हावे.

म्हणूनच आज आपण शॅम्पू लावूनही केस गळू नयेत, ते चांगले स्वच्छ आणि निरोगी व्हावेत यासाठीच्या काही टिप्स पाहणार आहोत.

सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की केस धुतले जात असताना थोड्याफार प्रमाणात ते गळणारच.

केस धुताना बाथरूमच्या फरशीवर पडलेले केस पाहून आपण अगदी अस्वस्थ होतो.

परंतु खरे तर काही प्रमाणात केस गळणे हे नॉर्मल आहे. अगदी जास्त प्रमाणात म्हणजे केसांचे पुंजकेच्या पुंजके निघत नसतील तर काळजी करण्याचे तितके कारण नाही.

असे म्हटले जाते की दररोज डोक्यावरचे १०० केस गळून पडतात आणि तितकेच नवे उगवतात.

त्यामुळे आपण केसांच्या पोषणाची योग्य काळजी अवश्य घेतली पाहिजे परंतु थोड्याशा केसगळतीने घाबरून जाऊ नये.

१. केस धुताना गळू नयेत ह्यासाठीची पहिली टीप म्हणजे केस नियमितपणे धुणे.

जर केस धुण्यामध्ये खंड पडत असेल तर ते जास्त प्रमाणात गळतात. ह्यासाठी केस नियमित विंचरून आठवड्यातून २ वेळा तरी स्वच्छ धुवावेत.

त्यासाठी चांगल्या कंपनीचा केमिकल विरहित शॅम्पू वापरावा. दाट केस असलेल्यांनी ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी कारण जितके केस दाट तितके ते गळण्याची संख्या जास्त असते.

२. केस धुण्यासाठी चांगल्या कंपनीचा आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेला शॅम्पू वापरावा हे तर आपण पाहिलेच.

पण केसांना शॅम्पू लावण्यासाठी सुद्धा योग्य पद्धत फॉलो केली पाहिजे.

खूप शॅम्पू घेऊन तो एकदम केसांना न लावता हाताच्या बोटांच्या मदतीने थोडा थोडा शॅम्पू केसांच्या मुळांशी लावावा. शॅम्पू लावून बोटांच्या सहाय्याने डोक्याला हलक्या हाताने मसाज करावा.

असे केल्यामुळे धुतले जात असताना केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

३. चांगल्या कंपनीचा शॅम्पू निवडावा असे म्हटले तरी खरोखर आपल्या केसांना सूट होईल असा शॅम्पू निवडणे हे फार अवघड काम असते.

त्यासाठी आपले केस, त्यांचा पोत नक्की कसा आहे हे माहीत असणे आवश्यक आहे.

आपले केस कोरडे आहेत की तेलकट, ऊन आणि प्रदूषणामुळे आधीच खराब झाले आहेत का, मुलायम आहेत की राठ ह्या सर्वांचा विचार करून शॅम्पूची निवड करावी.

ह्यासाठी चांगल्या कंपन्यांच्या शॅम्पूचा नीट अभ्यास करावा आणि त्यातून आपल्या केसांना नीट सूट होईल अशा शॅम्पूचा वापर करावा.

जर आपण केसांना कलर लावत असू तर तशा प्रकारच्या शॅम्पूची निवड करावी. शॅम्पू निवडताना त्यातील घटक पदार्थ नैसर्गिक आहेत ना ह्याची आवर्जून खात्री करून घ्यावी.

तसेच थोडा शॅम्पू वापरुन आपल्याला सूट होतोय की नाही हे पहावे आणि मगच त्याचा नियमित वापर सुरू करावा.

ह्याशिवाय खाली दिलेल्या टिप्स देखील शॅम्पू लावून केस धुताना ते गळू नयेत म्हणून उपयोगी पडतात.

१. केस ओले असताना विंचरू नयेत.

केस ओले असताना जास्त कमकुवत झालेले असतात. त्यामुळे ओले केस विंचरले तर ते तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केस ओले असताना किंवा धुवून झाल्यावर लगेच कधीही विंचरू नयेत. ते टॉवेलने टिपून घ्यावे आणि तसेच सुकू द्यावे. केस पूर्ण वाळल्यावरच हलक्या हाताने विंचरावे.

२. कंडिशनरचा वापर अवश्य करावा.

शॅम्पू लावून झाल्यावर कंडिशनरची काय गरज असे आपल्याला वाटू शकते. परंतु केस कोरडे, एकमेकात अडकलेले आणि डॅमेज झालेले असू शकतात.

अशा केसांना कंडिशनर लावला की ते मऊ आणि सुटे बनतात. असे मऊ केस नंतर विंचरताना गळत नाहीत. चांगल्या प्रतीच्या कंडिशनरमुळे केस मजबूत, मृदु आणि मुलायम बनतात.

तसेच तुटत नाहीत त्यामुळे केस धुतल्यानंतर चांगल्या प्रतीच्या कंडिशनरचा वापर अवश्य करावा.

३. केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करू नये.

गरम पाण्याने आंघोळ करणे कितीही सुखकारक असले तरी खूप गरम पाणी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी मात्र चांगले नाही.

केस धुण्यासाठी खूप गरम पाणी घेतल्यामुळे केसांच्या मुळांशी असणारे नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे केसांची मुळे उघडी पडतात, कमकुवत होतात आणि त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. म्हणून केस धुण्यासाठी नेहेमी कोमट पाण्याचा वापर करावा.

४. केस धुण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करू नये.

बोरवेलचे किंवा अधिक प्रमाणात क्षार असणारे पाणी केस धुण्यासाठी वापरले की केस गळण्याचे प्रमाण वाढते.

त्यामुळे अशा पाण्याचा केस धुण्यासाठी शक्यतो वापर करू नये. आपल्या घरी क्षारयुक्त पाणीच येत असेल तर केस धुण्यासाठी उकळून कोमट केलेल्या पाण्याचा वापर करावा.

५. आपले केस मुळातच निरोगी आणि मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा.

केस जर मुळातच निरोगी आणि मजबूत असतील तर सहाजिकच ते गळण्याचे प्रमाण कमी असेल.

त्यामुळे आपले केस निरोगी राहण्यासाठी चांगले पौष्टिक अन्न खाणे, केस नियमित विंचरणे, नियमित स्वच्छ धुणे, ऊन आणि प्रदूषण ह्यापासून केसांचा बचाव करणे अशी काळजी नेहेमी घ्यावी,

तर मित्र मैत्रिणींनो, ह्या आहेत शॅम्पू करताना देखील केस गळू न देण्यासाठीच्या काही टिप्स. ह्या टिप्सचा वापर अवश्य करा. तसेच तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख जरूर शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय