सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर – केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना. मिळवा रु. १००००/- प्रति महिना स्टायपेंड.
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( DPIIT ) या खात्याने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इंटर्नशीप योजना आणली आहे. त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
अर्ज कसा करायचा याविषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत.
त्याआधी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री बद्दल अधिक माहिती घेऊया.
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या खात्यातून देशभरातील औद्योगिक क्षेत्रांमधील विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. या खात्याअंतर्गत एक विभाग ‘ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’ म्हणजे देशांतर्गत उद्योगांच्या विकासासाठी काम करणारा आहे. या विभागातील काम शिकण्यासाठी या खात्याने देशभरातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
काय आहे ही संधी ?
देशभरातील सर्व पात्र ठरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रशिक्षणाची एक उत्तम संधी आहे. द डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हे खाते देशभरातील अंडर ग्रॅज्युएट / ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट किंवा संशोधन करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून घेऊन सदर खात्याचे काम शिकवू इच्छिते. या खात्यात काम करून या शिकाऊ विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री या खात्यातील कामकाजाचे ज्ञान मिळू शकते. त्याचप्रमाणे पुढे हे काम सुरू ठेवण्याची संधी सुद्धा मिळू शकते.
पात्रतेचे निकष –
देशातील किंवा जगभरातील कुठल्याही नावाजलेल्या विद्यापीठातून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या तसेच संशोधन करीत असणाऱ्या खालील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे.
१. इंजीनियरिंग
२. मॅनेजमेंट
३. लॉ
४. इकॉनॉमिक्स
५. फायनान्स
६. कॉम्प्युटर सायन्स
७. लायब्ररी मॅनेजमेंट
इंटर्नशिपचा कालावधी –
१. या इंटर्नशिपचा कालावधी कमीत कमी एक महिना ते जास्तीत जास्त तीन महिने इतका असू शकतो. आपण कोणत्या कालावधीत काम करू शकतो हे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना सांगायचे आहे.
२. सदर प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टीफिकीट तसेच रुपये दहा हजार प्रति महिना इतका स्टायपेंड मिळणार आहे.
३. इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टीफिकीट अथवा स्टायपेंड मिळू शकणार नाही.
स्टायपेंड (शिष्यवृत्ती ) –
या प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना योग्य कालावधीत यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यास रुपये दहा हजार प्रती महिना इतका स्टायपेंड केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
सर्टिफिकेट –
हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट कडून सर्टिफिकेट मिळू शकेल. ज्या ऑफिसरच्या हाताखाली हे विद्यार्थी काम करतील त्यांच्याकडून हे सर्टिफिकेट दिले जाईल.
ह्या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा –
https://dpiit.gov.in/internship-scheme-0
अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इथे दिलेल्या डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रि अँड इंटरनल ट्रेड च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी भरावयाचे आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी किती कालावधीसाठी प्रशिक्षण घेऊ शकतात आणि तो कालावधी कोणता हेदेखील सांगायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात प्रशिक्षण घेण्यात रस आहे हे देखील भरून द्यायचे आहे.
अर्ज भरल्यानंतर डिपार्टमेंट कडून सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जानुसार तसेच विभागाकडे असलेल्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणाचा विषय आणि कालावधी ठरवला जाईल. पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याना विभागाकडून थेट संपर्क केला जाईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा जरूर लाभ घ्या आणि थेट केंद्र सरकारशी निगडीत असणाऱ्या या विभागात शिकाऊ प्रशिक्षण मिळवा. महत्त्वाचे म्हणजे या प्रशिक्षणाबरोबरच स्टायपेंड देखील मिळणार आहे ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या सुरू असणाऱ्या शिक्षणात करू शकता. त्याच बरोबर मिळणारा अनुभव आणि सर्टिफिकेट देखील अतिशय महत्त्वाचे असेल.
या संधीचा जरूर लाभ घ्या आणि इतरांनाही ही संधी मिळावी म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Yas
Bsc pcm vale aapply nhi kr shkte kya
Yes
Excellent
Yes
Please share the link for filling the form.
All the details with link are given in the article.
I’m a pharmacy student … I’m actually pursuing the course ….so am i eligible for applying this internship
Yes
12 v pass and FY BA appyrcomputr cors in complited