काळाच्या पटावर ज्या शरीराच्या सहाय्याने मोठमोठी संकटं टोलावून लावली आज त्याच शरीराचं हळूहळू खच्चीकरण होताना कसं वाटतं असेल ना? ज्या सोबत्यांबरोबर जीवनाचा ऐन उमेदीचा काळ घालवला त्यातील काही मृत्यूचं अमृत प्याले तर काही आजही त्याच्याशी लढतायेत पण ही आजारांची जळमटं शरीराला लटकली आहेत त्याचं काय करायचं? तारुण्यावस्थेत कधीही आपण आपल्या उतारवयाचा विचार केलेला नसतो आणि वयस्कर असणाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवलेली नसते पण काळाचा टिकटिकणारा काटा कधी तरी आपल्या दारात येऊन उभा राहतोच राहतो. त्यावेळी काय उत्तर असणार आपल्याकडे?…. काहीच नाही. इतरांसारखं आपणही आपलं दुःख भोगायचं, आपल्या दुःखांना वाटेकरी नसतोच कोणी हे ज्याने त्याने लक्षात घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. या पुस्तकाचे लेखक अतुल गवांदे हे एक प्रख्यात सर्जन आहेत.
आपण कितीही ताकतवर असलो, श्रीमंत असलो, प्रसिद्ध असलो तरी आपण हे विसरून चालणार नाही की आपण मरणार आहोत. निसर्गाचा नियम सगळ्यांनाच लागू आहे. माणूस मर्त्य आहे! आरोग्याच्या क्षेत्रात कितीही क्रांती झाली तरी आपलं मरण आपल्याला अनुभवावं लागणार. आपल्या शरीराला होणाऱ्या पीडा, दाह आपल्यालाच सहन करायला लागणार. ज्यावेळी शरीर थकत त्यावेळी आपण मान्य करायला हव्यात आपल्या शरीराच्या मर्यादा. कितीही पैसे खर्च करून आणि तज्ञ डॉक्टरांना दाखवूनही हरवलेलं आरोग्य परत मिळवता येत नाही. वय वाढत जाईल तसा होणारा शारीरिक बदल मान्य केला तर जीवन सुखासुखी जगता येऊ शकतं. गरजेपेक्षा जास्त काही थकलेल्या शरीराला उपचार केल्याने काहीही परिणाम होणार नसतो, माणूस मर्त्य आहे हे मानून जगलं तर कदाचित कमी दुःख पदरात पडतील इतका साधा आणि सोप्पा अर्थ असलेलं हे पुस्तक.
माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटणारी गोष्ट कोणती असेल तर स्वतःच्या मरणाची भीती. ही भीती टाळण्यासाठी तो काय काय काय उपाय करतो. उतारवयाच्या पायथ्याला हरवत जाणारा विश्वास, “आपलं काय होईल”? याबद्दल मनात असणारी असुरक्षितता आणि आपल्याच शरीराने आपली सोडलेली साथ माणसाला आतून बाहेर हेलावून टाकते. दुसऱ्यावर वाढत जाणारं अवलंबित्व आणि त्या ओघाने आलेली हेटाळणी ही तर भळभळत्या जखमेवर मीठ चोळाव असं काही. अस म्हटलं जातं की ‘Old age is a continuous series of losses’
Being Mortal: Medicine and What Matters in the End
अतुल गवांदे यांची इतर मराठी पुस्तके –
जीव तिथे गुंतलेला
यशप्राप्तीचा जाहीरनामा
पुस्तकाचा पूर्ण परिचय….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.