सुरक्षारक्षकानेच तब्बल ७,४०,००० पाउंड किमतीचे चित्र केले खराब

शाळेत बाई शिकवत असताना, इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या स्त्रीच्या चित्राला मिश्या काढल्याचे किंवा एखाद्या पुरुषाच्या चित्रावर पेनाने केस काढल्याचे आठवत असेल!!

पण एका महागड्या पेंटिंगच्या गॅलरीमध्ये बोअर होतंय म्हणून, चक्क तिथल्या सिक्युरिटी गार्डनेच असं काही केलं तर काय होईल??

एका प्रदर्शनात ठेवलेले हे महागडे चित्र कामाच्या पहिल्याच दिवशी एका साठ वर्षीय सुरक्षारक्षकाने कंटाळा आला म्हणून, वेळ घालवायला काहीतरी करायचे असे म्हणून खराब करून ठेवले.

तीन चेहरे असणाऱ्या या चित्रात त्याने बॉल पेनचा वापर करून त्या चेहऱ्यांना चक्क डोळे काढले.

सुदैवाने चित्रांना झालेले नुकसान भरून काढण्याजोगे आहे. आपण या विषयी आणखी माहिती घेऊया.

ऍना लेपोरस्काया ह्या चित्रकर्तीच्या Tretyakov Gallery संग्रहातील ‘थ्री फिगर्स’ (१९३२-१९३४ ) नावाचे पेंटिंग पश्चिम-मध्य रशियाच्या Sverdlovsk Oblast प्रदेशातील येल्तसिन केंद्रात प्रदर्शनासाठी लावण्यात आले होते.

हे पेंटिंग ७ डिसेंबर २०२१ रोजी ”The World as Non-Objectivity, The Birth of a New Art’ या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले होते. तिथे एका साठ वर्षीय सुरक्षारक्षकाने सदर पेंटिंग बॉल पेनच्या मदतीने खराब केल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर, पोलिसांनी सदर सुरक्षारक्षकाला ताब्यात घेऊन ह्या घटनेचा तपास सुरू केला आहे. त्या सुरक्षारक्षकाला अंदाजे (रु.३९,९००) इतका दंड आणि एक वर्षाच्या सुधारात्मक मजुरीची शिक्षा होऊ शकेल. पेंटिंगचे अंदाजे (२,४९,५०० रुपये) इतके नुकसान झाले आहे.

पेंटिंगची नक्की किंमत किती आहे हे अद्याप अस्पष्ट आहे, परंतु सदर चित्राचा अल्फा विमा कंपनीकडे RUB ७४.९ दशलक्ष (७.४७ कोटी रुपये) इतक्या किमतीचा विमा उतरवला गेला होता.

चित्र खराब झाल्यामुळे आता ही कंपनी चित्राच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पैसे देत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

पेंटिंगला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी तज्ञ काम करत आहेत. तज्ञांच्या मते, पेंटिंग त्याच्या मूळ स्वरूपात दीर्घकाळ नुकसान न करता बरे होऊ शकते आणि ते त्यावर काम करत आहेत. चित्र दुरुस्त करण्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च येणार आहे.

सदर चित्र काढणाऱ्या ऍना लेपोरस्काया या चित्रकर्तीचे १९८२ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.

परंतु त्यामुळे ह्या चित्राला असलेले महत्व कमी होत नाही हे लक्षात घेऊन आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक आणि पोलिस यांनी योग्य कारवाई करून सुरक्षारक्षकाला तर पकडले आहेच शिवाय चित्र दुरुस्तीचे काम देखील सुरू केले आहे.

केवळ एखाद्या सुरक्षारक्षकाला आलेल्या कंटाळ्यापायी एवढ्या चांगल्या चित्राची नासधूस होऊ नये हे मात्र खरे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।