तुमचं जीवन बदलू शकणारी ५२ सूत्रं

मित्रांनो, तुमची सकाळ एकदा का उत्तम पद्धतीने साजरी झाली की पुढचा संपूर्ण दिवस उत्साहाचा धबधबा होऊन जातो.

आज आम्ही तुम्हाला अशी ५२ सूत्र सांगणार आहोत की ज्या सूत्रांमुळे तुमची सकाळ, तुमचा दिवस, तुमचं आयुष्यं, आनंदी आणि उत्साही होऊन जाईल.

ही ५२ सूत्रं संपूर्ण वर्षासाठी आहेत. ती स्टेप-बाय-स्टेप काम करतील.

प्रत्येक आठवड्याला एक सूत्र तुम्ही स्वतःमध्ये रुजवायचं आहे.

त्यासाठी एखादा रविवार तुम्ही निवडू शकता.

रविवारी एखादं सूत्र मनात घेऊन शांत बसा, आणि ध्यान करा. पुढे शक्य तितका हा मंत्र तुमच्या डोळ्यासमोर आठवडाभर राहील याची काळजी घ्या.

पुढच्या रविवारी दुसरं सूत्र आत्मसात करायचा प्रयत्न करा.

या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक अद्भुत शांती अनुभवू शकता, अनावश्यक ताण कमी करू शकता.

वर्षभरात कधीही तुम्ही हा वर्षाचा प्लॅन सुरू करू शकता.

चला तर मग जाणून घेऊया ही ५२ सूत्रं आहेत तरी कोणती ?

1) कृतज्ञ राहणं आता नवीन राहिलेलं नाही. आपल्याला मिळालेल्या सर्वच गोष्टींसाठी जाणून बुजून कृतज्ञ राहा. कृतज्ञता व्यक्त करा, अगदी रोज. कधी विसरलात तर जेंव्हा पुन्हा आठवेल तिथून लगेच सुरुवात करा.

2) “जर” “तर” मध्ये गुंतून पडाल तर आयुष्याचा आनंद गमवाल. “असं झालं नसतं तर?” “तसं झालं असतं असं चित्र असतं” हा विचार करत बसणं म्हणजे स्वतःला नैराश्याच्या दरीत ढकलून देण्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा.

3) भविष्यात काय घडेल आपल्याला माहिती नसतं. पण त्यामुळे भविष्यामध्ये रमू नका तर आजच्या वर्तमान क्षणाचा उत्तम आणि सकारात्मक वापर करा. आयुष्य जगण्यासाठी तुम्ही आखलेली ही सगळ्यात बेस्ट रणनीती ठरेल

4) दोन गोष्टी आयुष्यात फार निर्णायक ठरतात. एकतर संघर्षाच्या काळातला तुमचा संयम आणि तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याआधीची तुमची वृत्ती.

5) संयम म्हणजे केवळ वाट पाहणं नव्हे, तर संयम म्हणजे ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता.

6) जीवनात आनंद उपभोगणे हा स्वार्थीपणा ठरत नाही, तर स्वार्थीपणा म्हणजे उपलब्ध असलेल्या सकारात्मक गोष्टींवरती नकारात्मकतेचा सूर लावून धरणं.

7) राग, लोभ, द्वेष आणि मत्सर या भावनांमध्ये गुंतून पडण्याआधी तुमचा आत्ताचा वेळ मौल्यवान आहे आणि या चुकीच्या गोष्टीत जर वेळ वाया घालवला तर या वेळेची भरपाई कधीच होणार नाही याचा विचार करा.

8) आयुष्याच्या कोणत्याही वळणावरती जर तुम्ही थकला असाल, निराश असाल तर कदाचित अस्वस्थ होऊ शकता. पण लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक पाऊल उचलणं हेच योग्य ठरतं.

9) बरेच वेळा, बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत, आतून सकारात्मकतेची भावना रुजून येत नाही. हीच ती वेळ आहे जेव्हां जाणीवपूर्वक सकारात्मकतेची निवड करा आणि बदल अनुभवा.

10) जेव्हा तुम्हाला वाटतं एखादी गोष्ट तुम्हाला अजिबात जमणार नाही, तेव्हा ती गोष्ट तशीच अपुरी राहून जाते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्यादा ठरवल्या तर त्याचा पिंजरा तयार होऊ शकतो.

11) तुम्हाला तुमचा आत्मविश्वास, स्वाभिमान स्वतःचं मूल्य वाढवायचं असेल तर त्यासाठी इतरांना जबाबदार धरणं लगेचच थांबवा.

12) तुम्ही जिथे पोहोचला आहात, इथपर्यंत पोहोचताना अवघड काळातलं तुमचं काम 100% उत्तम ठरलेलं आहे. बरोबर ना?

13) जेव्हा तुमच्या मनासारखं घडत नाही तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त काही तरी चांगलं घडणार आहे.

14) तुमचा आजचा संघर्ष आणि निराशा यामुळे हताश होऊ नका तर त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जात राहा. पेला अर्धा सरला आहे की पेला अर्धा भरला आहे म्हणायचं हे ठरवायचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे.

15) एखादा अनपेक्षित धक्का खरं तर एक संधी आहे,नवीन शिकण्याची, घडण्याची, त्याचबरोबर परफेक्ट रणनीती तयार करण्याची.

16) पुन्हा, पुन्हा स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही एक सक्षम व्यक्ती आहात. कुठल्याही वातावरणात कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करायला तुम्ही समर्थ आहात.

17) दृढनिश्चय ठेवा. महत्त्वाकांक्षी बना. पण गरज म्हणून नाही, तर तुमच्या आनंदासाठी. आणि आयुष्याचा हा प्रवास मनापासून एन्जॉय करा.

18) कुणी तुमच्या कामाची दखल घेवो न घेवो तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, आणि जे काम तुम्ही करणार नाही ते काम तुम्ही टाळणार नाही, तर त्याचा योग्य पर्याय निवडणार आहात हे फक्त लक्षात ठेवा.

19) दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करणं सोडून द्या. जे तुमच्या हातात आहे, तुम्ही जिथं आहात तिथून नवी सुरुवात करा.

20) काळजी करू नका. काळजीत बुडून जाण्यापेक्षा काळजीपूर्वक काम करणं केव्हाही चांगलं.

21) कितीही मोठी अडचण, विचार करत बसून सुटणार नाही, तर छोटीशी कृती या अडचणींच्या भल्यामोठ्या डोंगरावरती मात करू शकते.

22) जोपर्यंत तुम्ही नकोशा गोष्टींना मागे टाकून स्वतःला माफ करून परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी सज्ज होत नाही, तोपर्यंत दुष्टचक्रातून तुमची सुटका होणार नाही

23) खूपशा माणसांच्या दुःखाचं कारण ते स्वतः ठरतात. कारण आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायला ते तयार नसतात.

24) वादळाला थोपवण्याची शक्ती तुमच्यात नाही म्हणून उदास होऊ नका. शांत राहा वादळाला त्याच्या वाटेने पुढे जाऊदे.

25) कुठलीही परिस्थिती शाश्वत नसते ती बदलते. तुम्ही तिला तुमच्या मनासारखे घडवू शकता हे लक्षात आलं की तुम्ही कुठल्याही गोष्टींचा अट्टाहास धरणार नाही.

26) तुमच्या हातात जी गोष्ट नाही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्हाला जे शक्य आहे त्यावर नियंत्रण ठेवा आणि अफाट बदल अनुभवा.

27) जी परिस्थिती आपल्या भोवती आहे ती तुमच्यामुळे आहे, हे न स्वीकारता तुम्ही परिस्थितीला शरण जाता आणि म्हणूनच बदल घडत नाहीत.

28) स्वतःमध्ये बदल करा परिस्थितीत नक्की बदल होईल.

29) आनंदी आणि कृतज्ञ भाव म्हणजे “ऑल इज वेल” परिस्थिती नाही, तर तुमच्याकडे आलेली ही सजग दृष्टी आहे.

30) छोट्या संधींचा वापर करून यश मिळवा सगळ्यात पहिली आणि कठीण संधी म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं.

31) तुम्ही स्वतः इतरांना स्वतः विषयी जे ओरडून सांगत असतात, ते प्रत्यक्षात घडत नाही, तर जे तुम्ही स्वतःशी कुजबूजता तिथेच बदल घडतो.

32) सजग असणं म्हणजे काय? तर आजूबाजूला काय चाललेलं आहे यापेक्षा तुमच्या अंतर्मनात काय घडत आहे याचा अंदाज ठेवणं.

33) तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला देत आहात याची खात्री करून घ्या. मोठ्या आवाजाला भुलू नका तर सत्याचा क्षीण आवाज ऐकायला, ओळखायला शिका

34) तुम्हांला समजावून घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही त्यांना तुमच्या स्वप्नांविषयी सांगू नका.

35) तुमचं यश, तुमचा आनंद, इतरांच्या मताप्रमाणे ठरवू नका.

36) अधूनमधून स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिका.

37) अनोळखी वाटांवर प्रवास करायला घाबरू नका. मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक अनुभवाचा आनंद घ्या.

38) स्वतःला शोधा. हृदयाचं खरं रूप आणि हसण्याचं खरं कारण तिथेच सापडेल.

39) एखाद्या गोष्टीचा शेवट कसा होईल याचा अंदाज बांधू नका. अनिश्चिततेनंतरच जादुई क्षणांचा अनुभव घेता येतो.

40) तुम्ही काही वेळा स्पष्ट बोलायला घाबरता. पण लक्षात ठेवा की योग्य संवाद घडणं महत्त्वाचं ठरतं.

41) परिस्थिती कशीही असो चांगुलपणा मात्र सोडू नका.

42) जग बदलण्यासाठी भूकंप घडवण्याची गरज नाही तर छोट्या छोट्या प्रेमळ गोष्टींनी बदल घडतो.

43) तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर आंधळेपणाने प्रेम करणे, विश्वास ठेवणे टाळा.

44) दुसऱ्यांच्या चुकांचा तुम्ही न्यायनिवाडा करू नका.

45) जेव्हा इतरांमधल्या चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करता तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये चांगले बदल घडताना दिसतील.

46) एक उत्तम आदर्श निर्माण करा. सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण तुम्ही चांगले आहात.

47) आयुष्यात भेटलेल्या सगळ्या अप्रिय लोकांविषयी कृतज्ञ राहा, कारण कसं वागू नये याचा पाठ त्यांनी तुम्हाला शिकवलेला आहे.

48) या जगात कोणीच कायमचं आलेल नाही. पण प्रत्येकाकडून शिकण्यासारखं खूप आहे. नम्रपणे वेळेचा चांगला उपयोगही करायला शिका

49) स्वयंपूर्ण कोणीही नसतं, कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवून संधी आणि प्रोत्साहन दिलेले असतं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा. आणि दुसऱ्यांना मदत करायला विसरू नका.

50) जे आहे त्याचा स्वीकार करा. जे घडलेलं आहे ते विसरून जा आणि तुमच्या चालू असलेला प्रवासावरती विश्वास ठेवा.

51) प्रत्येक नवा दिवस नवी संधी असते. काय झालं? यापेक्षा काय व्हायला हवं? याचा विचार करा.

52) आत्ता या क्षणापासून नवी सुरुवात करा संधी अनंत आहेत. नकोशा गोष्टी सोडायला खंबीर व्हा, पुरेसे शहाणे व्हा, कठोर परिश्रम करून जे मिळणार आहे त्याची प्रतीक्षा करायला धैर्य बाळगा.

तर मित्रांनो वर्षाचे ५२ आठवडे तुम्ही एक एक सूत्र अभ्यासत गेलात तर वर्षभरात तुमचं आयुष्य बदलून नक्की चांगल्या पद्धतीने बदलून जाईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “तुमचं जीवन बदलू शकणारी ५२ सूत्रं”

  1. मनाचे Talks टीमने हा जो अनोखा उपक्रम सुरु केला आहे त्यातील सर्व लेख हे स्वतःमध्ये बदल घडवून एक छान व्यक्तिमत्व घडवून स्वतःच जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी मंत्र आहेतच परंतु आज त्यांचे विशेष आभार आणि कौतुक यासाठी कि आजच्या लेखात त्यांनी जी बावन्न सूत्र आपल्याला सांगितली आहेत ती नुसती बावन्न सूत्र नसून खरं म्हणजे जीवनरूपी सागरातील अनमोल असे मोती आहेत आणि हो नुसतेच मोती दिलेले नसुन आपल्या जीवनात ते प्रत्यक्ष अंमलात कसे आणायचे या साठी पद्धत पण सांगितली आहे आता आपण त्या प्रमाणे प्रत्यक्ष अंमलात आणायला हळू हळू सुरवात केली तर आपल्या सगळ्यांच्या जीवनात बदल घडून येईल असे मला वाटते.
    मनापासून धन्यवाद, शुक्रिया, थँक्स आणि खुप साऱ्या शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।