तुम्ही चोखंदळ खवय्ये आहात का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे 10 टेबल मॅनर्स तुम्ही फॉलो करता का?
सध्याच्या जीवनशैलीमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी निमित्तं शोधलं जातं.
सेलिब्रेशनची एकही संधी सोडली जात नाही.
एखादा छोटा मोठा उत्सव असू दे, एखाद्याला नोकरी लागलेली असुदे एखाद्याचा पहिला पगार हातात येऊ दे, लोकांना बाहेर जाऊन सेलिब्रेट करण्यासाठी एवढं निमित्तं ही पुरतं.
बर्थडे सुद्धा एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये सेलिब्रेट करण्याचा आग्रह धरला जातो.
बरं होतं काय एखाद्या उच्चभ्रू हॉटेलमध्ये जाताना बरेच लोक अनकम्फर्टेबल असतात.
एक तर त्या हॉटेलला शोभतील असे कपडे हवेत आणि दुसरं असं की काही चूक झालीच तर आजूबाजूचे लोक आपली खिल्ली उडवणार नाहीत ना? याचं सतत टेंशन राहतं.
तुम्हाला असं टेन्शन येत असेल तर आता टेन्शन विसरा, निर्धास्त राहा आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कारण ह्या लेखामध्ये तुम्हाला १० टिप्स मिळणार आहेत.
तुम्ही चांगल्या हॉटेल मध्ये कसं वागायचं ?एटीकेट्स कसे पाळायचे? याचं प्रशिक्षणच तुम्हाला मिळेल.
1) नेहमी BMW चा क्रम लक्षात ठेवा.
आता तुम्ही म्हणाल हॉटेलमध्ये BMW कुठं आली तर मित्रांनो ही त्रिसूत्री गाडीची किंवा कारची नाही तर टेबलावरच्या नियमांची आहे.
BMW म्हणजे Bread, Meal & Water
जेवताना कायम डाव्या बाजूला ब्रेड आणि बटर ची डिश हवी, तर जेवण सेंटरला असलं पाहिजे आणि उजव्या बाजूला पाण्याचा ग्लास असावा.
2) खायला सुरुवात करण्यापूर्वी नॅपकिन मांडीवर ठेवा.
जेव्हा तुम्ही खायला सुरुवात कराल तेव्हा नॅपकिन अर्धा फोल्ड करून मांडीवरती ठेवा.
काही कारणांमुळे तुम्हाला टेबलावरून उठावं लागलं तर नॅपकिन टेबलावर ठेवा म्हणजे हा सिग्नल आहे की तुम्ही जेवण करण्यासाठी थोड्याच वेळात पुन्हा येणार आहात.
3) तुमची पर्स, मोबाईल किंवा किल्ल्या टेबलावरती अजिबात ठेवू नका.
या सगळ्या वस्तू टेबलावर ठेवल्या तर मग टेबल भरगच्च होऊन जातं, पसारा दिसतो आणि समोरच्या व्यक्तीचं मनही विचलित होतं.
पर्स सारख्या वस्तू शक्यतो तुमच्या खुर्चीच्या बाजूला ठेवा किंवा शेजारी रिकामी खुर्ची असेल तर त्यावरती सामान ठेवा.
4) टेबलावरची एखादी वस्तू हवी असेल तर शेजारच्या किंवा समोरच्या व्यक्तीला विनंती करा.
स्वतःला अडचणीत आणत टेबलावरती वाकून एखादी वस्तू घेण्यापेक्षा शेजारच्या किंवा समोरच्या व्यक्तीला ती वस्तू सरकवण्याविषयी विनंती करावी.
स्वतःच ती वस्तू घेण्याची धडपड केली तर तुम्ही अडचणीत येता आणि समोरच्यालाही अनकम्फर्टेबल करता.
5) जेवताना मचमच आवाज करू नका.
समोरच्या पदार्थांचे छोटे-छोटे घास करा आणि अगदी सावकाश खा.
तोंडात पदार्थ भरून घेऊ नका. प्रत्येक घास खाऊन झाला की सुरी आणि काटा बाजूला ठेवा आणि या दोन्हींची टोक खालच्या बाजूला झुकलेली असावीत.
तोंडात घास असताना बोलायचा प्रयत्न करू नका, त्याच बरोबर मचमच आवाज ही करू नका.
6) खाताना चेहरा प्लेट जवळ आणू नका
समोरच्या प्लेट वर वाकून खाण्याची पद्धत अतिशय चुकीचे आहे आणि ही पद्धत पूर्णपणे टाळा.
ताठ बसून खा आणि चमचा किंवा काट्याने एखादाच घास घ्या.
सूप सारख्या पदार्थांचा बाउल थेट तोंडाला लावू नका.
7) वेटरला हाक मारण्याऐवजी काहीतरी सिग्नल देण्याचा प्रयत्न करा.
नेहमी हे लक्षात ठेवा कि वेटरला कधीही हाक मारू नका.
एखादा सिग्नल जर तुम्ही पोहोचवू शकलात तर उत्तमच.
पण वेटर तुमच्याकडे बघत नसेल तर हात हलवून लक्ष वेधून घ्या, मात्र हाक मारू नका. कारण त्यामुळे आजूबाजूचे लोक विचलित होतात
8) नेहमी ब्रेड सारखे पदार्थ हाताने तोडा
ब्रेड रोल किंवा यासारखे पदार्थ कापण्यासाठी कधीही सुरी चा वापर करू नका.
हा रोल आधी अर्धा करून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा एका वेळेला एखादाच तुकडा पाडा.
9) “फिनिश” आणि “रेस्ट पोझिशन” चा अर्थ लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही जेवत असता आणि मध्येच थांबावं लागतं त्याला रेस्ट पोझिशन म्हणतात.
यावेळी तुमची सुरी प्लेट वरती आणि काटा चमचा प्लेटच्या मध्ये असला पाहिजे यामुळे वेटरच्या लक्षात येतं की तुमचं जेवण अजून संपलं नाही.
जर तुमचं जेवण पूर्ण झालेलं असेल तर काट्याला सुरीच्या खाली तिरप्या पद्धतीने ठेवा की वेटरच्या लक्षात येईल की तुमचं जेवण झालेलं आहे.
10) नेहमी होस्टला बिल भरू द्या
हॉटेलच्या टेबलावर कधीही भांडण करू नका बिल कोण भरणार?
जर तुम्ही ही पार्टी दिली असेल तर बिल तुम्हीच भरलं पाहिजे.
जर तुम्ही रियुनियन साठी एकत्र आलेला असाल तर बिल सर्वांनी मिळून भरा.
मात्र हॉटेलमध्ये पैसे भरताना एकाच व्यक्तीला पूर्ण पैसे भरू द्या. जेवायच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन जमा करू शकता.
तर एखाद्या पॉश हॉटेलमध्ये तुम्ही जाल तेंव्हा हे 10 रुल लक्षात ठेवा आणि त्या वातावरणात आत्मविश्वासाने वावरा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.