महिना १ लाखा वरून ५००० रुपयांपर्यंत वीजबिल कमी करण्यासाठी लढवली ही शक्कल!!

वाढत्या वीजबिलाची टांगती तलवार डोक्यावर असताना आणि ब-याच ठिकाणी लोडशेडिंग होत असताना पुण्यातल्या एका सोसायटीनं मात्र वीजबिलं कमीत कमी यावं यासाठी पुढाकार घेतला.

कुठली सोसायटी? काय केलं या सोसायटीनं चला जाणून घेऊया.

पुण्यातल्या दत्तनगर चौक, आंबेगाव इथल्या ऑलिव्ह गृहनिर्माण सोसायटीने ‘ऑलिव्ह’ या शब्दाचा अर्थ ‘ऑल कॅन लिव्ह हॅपीली’ असा घेत, वीजबिलाची रक्कम कमी करण्यासाठी मेहनत घेतली.

या त्यांच्या प्रयत्नाला भरघोस यशही लाभलं आहे.

ऑलिव्ह को-ऑप हाऊसिंग सोसायटीने २०१६ मध्ये 80KW क्षमतेचे सौर पॅनेल बसवलं, ज्यामुळे त्यांच्या विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला.

या सोसायटीमध्ये २१६ सदनिका आहेत जवळपास ८०० रहिवासी इथं राहतात.

ऑलीव्ह सोसायटीनं ५४ लाख रुपये खर्च करून ८० किलो वॅट वीज निर्मिती चा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे.

यातून सार्वजनिक वापरासाठीची वीज वापरली जाते आणि त्यामुळे वीज बिलात १ लाख रुपयांची बचत होते.

पिण्याचं पाणी प्रत्येक मजल्यावर चढवण्यासाठी, लिफ्टसाठी – प्रत्येक विंगमध्ये तसंच आवारातले लाईट आणि इतर विविध वापरासाठी सोसायटीला वीज गरजेची असतेच.

तशी ती ऑलीव्ह सोसायटीला ही गरजेची होती. मात्र यासाठी भलंमोठं वीज बिल ही यायचं .

महाराष्ट्र सरकारने एका योजनेअंतर्गत सौर उर्जेचे ऑनलाइन ग्रीडिंग जाहीर केले.

त्यात 30% सबसिडी आणि अतिरिक्त वीजेला परवानगी मिळाली.

२०१६ मध्ये, ऑलिव्ह को-ऑप हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या टेरेसवर ५० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी सुमारे ३१ लाख रुपये खर्च केले.

त्यावेळी विजेचे दर सुमारे ११ रुपये प्रति युनिट होते, आणि त्यामुळे पहिल्या वर्षात सोसायटीने 10.80 लाख रुपयांची बचत केली.

या बचतीने समाधानी होऊन ऑलिव्ह सोसायटीने विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ३० किलोवॅटचे अतिरिक्त सौर ऊर्जा युनिट उभं करण्यासाठी आणखी १५ लाख रुपये खर्च केले.

निवासी सोसायटीने ही रक्कम ९% व्याजदराने घेतली होती.

सौर उर्जा पॅनेलने वर्षाला ७०,०००० KWh वीज निर्माण केली, आणि सोसायटीच्या सर्व विजेच्या गरजा भागवल्या.

सोसायटीचं महिन्याचं वीज बिल ४००० रुपये प्रति महिना इतकं कमी आलं.

निवासी सोसायटीने पुढच्या तीनच वर्षांत सौर पॅनेल बसवण्यासाठी गुंतवलेले पैसे वसूल केले.

सौर पॅनेलच्या मेंटेनन्स खर्चासह गुंतवणूक वसूल झाली, ज्यासाठी वर्षाला २ लाख रुपये खर्च आला.

MSR-Olive Co-Op Housing Society Ltd

इतकंच नाही तर यापुढची २२ वर्षे मोफत वीज सोसायटीला मिळेल, ही बचत सौर पॅनेलमुळे शक्य झाली.

पैशांची बचत म्हणाल तर या पूर्ण काळासाठी १६.०४ कोटी, रुपयांची बचत तर होईलच आणि १,५१७ टन CO2 उत्सर्जन रोखल्यामुळे प्रदूषण ही कमी होईल.

वर्षानुवर्षे विजेचे दर वाढतातच पण सौर ऊर्जा स्थिर असते.

वाढत्या विजेचे दर आणि १० % वार्षिक वाढीचा अंदाज पाहता आतापर्यंत सोसायटीचं वीजबिलं साधारण २ लाख रुपयांपर्यंत नक्की गेलं असतं.

पण ऑलीव्ह सोसायटीने मात्र वीजबिलासाठी दरमहा मोठी बचत करणे शक्य करून दाखवले.

वीजनिर्मिती करत ऑलीव्ह सोसायटीने स्वयंपुर्णतेचा एक आदर्श घालून दिला आहे.

पर्यावरणचा विचार करत ऑलीव्ह हौसिंग सोसायटीने जांभुळ, फणस, वड, पिंपळ, नारळ, कडुलिंब, आंबा अशा देशी प्रजातींची ४०० पेक्षा जास्त झाडं ही लावली आहेत.

सोसायटीतला कचरा, गांडूळखत प्रकल्पात जिरवला जातो.

निर्माण झालेले खत बागेसाठी वापरले जाते.

पावसाचे पडणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने टाकीमध्ये जमा करून बागेसाठी वापरलं जातं.

मित्र हो, पर्यावरण पूरक जीवनशैली ही आजची गरज आहे.

ऑलीव्ह सोसायटीने एकत्र येऊन पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे.

Image courtesy : The Better India

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।