ऐतिहासिक पण अप्रसिद्ध अशी पुण्याची हँडमेड पेपर फॅक्टरी ज्यावर लिहिली गेली भारताची राज्यघटना
“के. बी. जोशी हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट” (HMPI) ने १०० वर्षांपर्यंत टिकणारा कागद तयार करण्यासाठी कापसाच्या चिंध्या वापरून इको-फ्रेंडली हँडमेड पेपर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला .
ही फॅक्टरी१९४० ला मध्ये स्थापन झाली.
कित्येक पुणेकरांना माहीत नसेल की शहराच्या मध्यभागी शिवाजीनगरला एक हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट (HMPI) नावाचा छोटा कारखाना वर्षानुवर्षे लाकूड न वापरता कागद बनवतो.
विशेष म्हणजे हाताने तयार केलेला हा कागद पर्यावरणपूरक पद्धती वापरून बनवला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला हा पहिलाच, हातानं तयार होणाऱ्या कागदाचा कारखाना आहे.
या छोट्याशा कारखान्याचं ऐतिहासिक महत्त्व मोठं आहे कारण इथं हातानं तयार झालेल्या कागदावर भारतीय राज्यघटना लिहिली गेली होती.
ब्रिटिशांसह सर्व सरकारी विभागांसाठी इथून कागद पुरवठा झाला आहे.
“भारतात ‘स्वदेशी’ चळवळ सुरू झाल्यानंतर महात्मा गांधींच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी या कारखान्याची निर्मिती झाली.
हा कारखाना के बी जोशी रोडवर अँग्रीकल्चर कॉलेजजवळ आहे, के बी जोशी हे पुण्यातले एक शास्त्रज्ञ होते, जे १९३० मध्ये भारतात हस्तनिर्मित कागद तयार करण्याचं काम करत होते.
सरकारी मालकीच्या असणाऱ्या या कारखान्याचे व्यवस्थापन आज स्टुडिओमार्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे केले जातं.
१९३६ मध्ये के. बी. जोशींनी महात्मा गांधींना कागदाचे काही नमुने दाखवले, त्यावर त्यांना वर्धा इथल्या पेपर सेंटरमध्ये हाताने तयार होणारा कागद तयार करण्यासाठी पाठवण्यात आलं.
वर्ध्याच्या स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा उद्देश जरी होता, तरी के. बी. जोशी तिथं काम करून समाधानी नव्हते.
शेवटी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या जवळ हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट (HMPI) उभारण्यात आली.
“भारत की एक विरासत” या माहितीपटात असं सांगण्यात आलं आहे की १ ऑगस्ट १९४० ला या कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं.
ही हँडमेड पेपर फॅक्टरी भारतातील पहिली फॅक्टरी होती, त्यानंतर इतरांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्येही अशी फॅक्टरी सुरू केली.
या फॅक्टरीच्या स्थापनेपासून, कारखान्यानं कधीही लाकूड वापरले नाही आणि शाश्वत पद्धत वापरून टाकाऊ कापसापासून कागद तयार केला आहे.
कागदाची निर्मिती
हाताने पेपर तयार करताना तो कागद, १००% कॉटन रॅग्स, कापड उद्योगातील टाकाऊ वस्तू आणि फार्मा इंडस्ट्रीजमधून न वापरलेला कापूस यापासून तयार केला जातो.
कापसाच्या चिंध्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि कारखान्यांमधून येतात.
त्या गोळा करून क्रमवारीनं लावल्या जातात, अंदाजे एकसमान आकारात कापून साफ केल्या जातात.
एकदा साफ केल्यावर, कापसाच्या चिंध्याचे लहान लहान तुकडे होतात.
हे तुकडे नंतर पाण्यात मिसळून बीटरमध्ये मिसळले जातात.
मशीनमध्ये २०% टक्के कापूस आणि ८०% टक्के पाण्याचं प्रमाण फॉलो केलं जातं.
बीटरमधले ब्लेड कापसाचे तुकडे चिरतात आणि त्यांचे आकार कमी करतात आणि त्यांना लगद्यामध्ये बदलण्यासाठी पाण्यात मिसळतात. संपूर्ण प्रक्रिया जवळजवळ 18 तास चालू राहते.
त्यानंतर लगदा स्टोरेज टँकमध्ये ओतला जातो आणि आवश्यकतेनुसार कागद तयार करण्यासाठी काढला जातो.
कागद तयार करण्यासाठी, हा लगदा जाळीच्या लाकडी चौकटीवर ओतला जातो आणि समान रीतीने पसरला जातो.
त्यानंतर पाणी काढून टाकण्यासाठी लगदा थंड करून दाबतात आणि सेट होण्याची वाट बघतात.
सेट झाल्यानंतर लोकरीच्या पेल्ट्सवर हायड्रॉलिक प्रेसमध्ये त्याला संकुचित केले जाते, त्यात पाणी शिल्लक असेल तर ते काढून टाकले जाते.
ओलसर, हातानं तयार केलेले कागदाचे पत्रे उन्हात वाळवले जातात.
वाळलेल्या कागदाच्या शीटमध्ये क्रिझ असतात.
त्याला बाहेर काढण्यासाठी आणि सरळ एकसमान आकार देण्यासाठी, वाळलेल्या कागदाच्या शीटला रोलर मशीनवर दाबले जाते.
आता कागद जवळपास तयार असतो.
पण काही वेळेला या शीट्समध्ये कीटक, डाग किंवा काही कण अडकलेले असतात ज्यांना काढण्याची गरज असते.
त्यासाठी शीट्स साफ करण्यासाठी दुसरी मॅन्युअल प्रक्रिया केली जाते.
त्यानंतर हव्या त्या आकारात कागद कापले जातात.
या कारखान्यात कागद आणि पुठ्ठा यांचा पुनर्वापर करुनही अशाच पद्धतीने कागद तयार केला जातो.
हँडमेड पेपरमध्ये किती ताकद असते याचा तुम्ही अंदाजच करू शकत नाही.
कारण हा कागद कॉटन फायबरचे गुणधर्म टिकवून ठेवतो.
हे कागद टिकाऊ, क्लोरीन-मुक्त असतात, त्यांच्यावर डाग पडत नाही आणि ते छपाईसाठी वापरता येतात.
या पेपरचे शेल्फ-लाइफ १०० वर्षांपेक्षा जास्त असतं!
हवामानाचा परिणाम होऊन हातानं तयार केलेला कागद पिवळसर होऊ शकतो, पण तो खराब होत नाही.
हा कारखाना हर्बेरियम पेपर तयार करण्यातही माहिर आहे. या पेपर्सचे pH मूल्य ४ आहे.
महत्त्वाची कागदपत्रं जतन करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे कागद आवश्यक असतात.
भारतात फक्त पुण्यातल्या के. बी. जोशी कारखान्यात हा उत्तम प्रतीचा हातानं तयार केला जाणारा कागद तयार होतो.
ही कागद बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया हातानं केली जाते.
मात्र तंत्रज्ञानाच्या विकासानंतर श्रेडींग, बीटिंग आणि रोलिंग सारख्या प्रक्रियेचं यांत्रिकीकरण केलं गेलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करताना आणि भारताचे संविधान लिहिताना याच कारखान्यात तयार झालेल्या हर्बेरियम पेपरचा वापर केला.
राज्यघटनेच्या पानांवर असणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या काळापासूनची देशाच्या इतिहासाची कला चित्रे कृपाल सिंग शेखावत, नंदलाल बोस आणि राममनोहर सिन्हा या कलाकारांनी याच कारखान्यातल्या हातानं तयार केलेल्या कागदावर रेखाटली आहेत.
संविधान आता संसदेच्या लायब्ररीत हेलियम केसमध्ये जतन करून ठेवलेलं आहे.
इंदिरा गांधींनी सुद्धा २६ फेब्रुवारी १९६८ ला नवी दिल्लीत झालेल्या राजीव आणि सोनिया गांधी यांच्या रिसेप्शनसाठी आमंत्रण पत्रिका छापण्यासाठी याच कारखान्यातला हँडमेड पेपर वापरला होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडसाठी हाताने तयार केलेला हाच कागद वापरायला प्राधान्य दिलं.
आज ही या कारखान्यातून सरकारी कामकाजासाठी कागद वापरला जातो.
त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यां आणि परदेशातील व्यावसायिक यांच्या कडून ही या के. बी. जोशी HMPI कारखान्यातल्या कागदाला मागणी आहे
आज, कंपनी दिवे, कंदील, पेंटिंग पेपर, पत्रकं, नोटपॅड्स, लिफाफे आणि अशा ब-याच वस्तू विकते, ज्या सगळ्या हातानं तयार होणाऱ्या कागदापासून तयार केल्या जातात.
फॅक्टरी सुरुवातीला सरकारतर्फे चालवली जायची , पण गेल्या ३० वर्षांपासून, खाजगी कंपन्यांना व्यवस्थापन अधिकार दिले जातात.
कारखान्याचा इतिहास समृद्ध आहे, पण खूप कमी जणांना याची माहिती आहे.
नव्या जगाशी जोडून घेताना या कारखान्यात दुकान सुरू केले आहे.
हाताने तयार होणारं पेपरमेकिंग, कला कार्यक्रम आणि सांस्कृतिक महोत्सवांवर आधारित कार्यशाळा इथं आयोजित केल्या जातात.
कारखान्याला व्यावसायिक आव्हानांचा ही सामना करावा लागतो.
मशीनमेड कागद आणि वस्तू या, हातानं तयार होणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत जवळजवळ 1/3 किमतीत मिळतात.
पण हे मशीनमेड पेपर बर्याचदा टिकाऊ नसतात आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाला हानिकारक असतात.
हँन्डमेड कारखाना जास्तीत जास्त कर्मचारी वापरून आणि तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर करून किमान ५० लोकांसाठी उपजीविका निर्माण करतो, पण त्यामुळे निर्मिती खर्च. वाढून पेपरची किंमत वाढते.
हँडमेड पेपर विकत घेऊन पर्यावरण पूरक कागदनिर्मीताला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांची गरज आहे.
आज कंपनी तोट्यातून बाहेर येण्यासाठी मेहनत करते आहे.
केवळ नफा हा या कारखान्याचा हेतू नाही. पण कारखान्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आणि भारतीय इतिहास जिवंत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांची गरज आहे.
हँडमेड पेपर खरेदी करण्यासाठी किंवा हँडमेड पेपर मेकिंग वर्कशॉप करण्यासाठी तुम्ही कार्तिक जोशींशी +91 7888003171 यानंबरवर संपर्क साधू शकता किंवा
kartik.studiomars@gmail.com वर ईमेल पाठवू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.