इतरांना स्वतःचे घर घेण्यासाठी होम लोन देऊ करणाऱ्या बँका स्वतः मात्र भाड्याच्या जागेत असतात. असे का?
तुमची उत्सुकता ताणली गेली ना? मग ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
खरंच, तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? भारतातील बहुतांश महत्वाच्या बँका मग त्या सरकारी असोत, निमसरकारी असोत किंवा खाजगी त्यांची स्वतःची जागा नसते.
बहुतेक सगळ्या बँक आणि त्यांच्या ब्रांचेस ह्या भाड्याने घेतलेल्या जागेतच असतात. असे का?
आपल्या सर्व ग्राहकांना चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देऊ करणाऱ्या banks स्वतः मात्र स्थावर मालमत्तेत गुंतवणूक न करता भाडेकरारावर घेतल्या जाणाऱ्या जागेत आपली कार्यालये थाटणे पसंत करतात.
काय असेल ह्याचे कारण?
खरे तर बँकेने भाड्याच्या जागेत राहून काम केले पाहिजे असा कोणताही नियम भारतात नाही. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा बँक स्थापन झाल्या तेव्हा सुरुवातीला त्या भाड्याच्या जागेत सुरू झाल्या आणि अजूनही ती परंपरा पाळली जात आहे.
परंतु ह्याचे महत्वाचे कारण परंपरा हे नसून स्थावर मालमत्तेत करावी लागणारी गुंतवणूक हे आहे.
आपण सर्वजण हे जाणतोच की ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या पैश्यांचा वापर करून बँक होम लोन किंवा इतर कोणतेही लोन देते.
त्या लोन वर बँकेकडून व्याज आकारले जाते आणि ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या पैश्यांवर बँक ग्राहकांना व्याज देते.
त्यामुळे दोन्ही व्याजाच्या दरात जो काही फरक असेल त्यानुसार त्या बँकेला उत्पन्न मिळते. अर्थात ग्राहकांची संख्या आणि कर्जे घेणाऱ्या लोकांची संख्या भरपूर मोठी असल्यामुळे ते उत्पन्न देखील भरपूर असते ह्यात शंका नाही.
पण ह्याचाच अर्थ असा की बँकांना जर स्वतःची स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यासाठी बँकेच्या खातेदारांचा बँकेत गुंतवलेला पैसाच वापरावा लागणार.
परंतु बहुतांश बँकांचा कल मिळणारे उत्पन्न स्थावर मालमत्तेत न गुंतवता तुलनेने कमी असणाऱ्या भाड्याच्या जागेत खर्च करावे असा असतो. साधारणपणे अशाच पद्धतीने काम करायचे अशीच सर्व बँकांची पद्धत असते.
अर्थात एखाद्या बँकेने स्वतःची स्थावर मालमत्ता खरेदी करू नये असा काही नियम नाही परंतु बँकांची कार्यप्रणाली पाहता बँका ग्राहकांचे, खातेदारांचे पैसे गुंतवून स्थावर मालमत्ता घेण्याचे टाळतात असेच आढळून आले आहे.
आता ह्यामध्ये काय बदल होत आहे?
आता आधुनिक भारतात अंगणवाडी पासून ग्रामपंचायतीपर्यन्त सर्व ठिकाणांसाठी स्थावर मालमत्ता उभ्या राहत असताना एक विचारप्रवाह असा देखील आहे की प्रमुख बँकांच्या प्रमुख कार्यालयांसाठी स्वतःच्या मालकीच्या इमारती असाव्यात. नजीकच्या भविष्यात असे होईलही.
तर मित्र मैत्रिणींनो, हे आहे कारण ज्यामुळे भारतातील बहुतांश प्रमुख बँकांची कार्यालये आणि शाखा भाड्याच्या जागेत आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीतजास्त लोकांना समजावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.