मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे.
सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे.
संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.
यावर्षी 2023 ला संक्रांत देवतेचे वाहन आहे वराह आणि उपवाहन आहे वृषभ म्हणजे बैल!!
हिरवं वस्त्र परिधान केलेली संक्रात देवता हातात खड्ग घेऊन चंदनाचे लेपन लावून बसलेली वृद्धा आहे.
बकुळीचे फुल हुंगत, खीर खाणारी ही संक्रात देवता मोत्यांच्या माळा धारण केलेली आहे.
यावर्षी संक्रात देवतेचं, वार नाव मिश्रा आणि नक्षत्र नाव नंदा आहे.
पश्चिमेकडून उत्तरेला निघालेल्या या देवतेला एक शीर नऊ हात आहे.
खरं तर मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात येतो.
असं मानतात की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते.
मकर संक्रांतीच्या दिवशी दान केलं, सूर्य नवग्रह आणि देवदेवतांची पूजा केली तर नेहमीपेक्षा जास्त पुण्य मिळतं, अशी मान्यता आहे.
सूर्याने शनिदेवाला वरदान दिले आहे की वर्षातून एकदा ते मकर राशीत, शनिदेवाच्या राशीत येतील आणि शनिदेवांचं घर समृद्ध करतील.
मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, धान्य, तीळ, गूळ, नवं भांड, तूप, जमीन, सोनं, घोडा, गाय यातल्या वस्तू ऐपतीप्रमाणे गरजूंना दान करा.
मकरसंक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून, सूर्य नवग्रहांची आणि भगवान विष्णूंची पूजा करा.
पुण्यकाळात दात घासू नका, कठोर बोलू नका, गवत कापू नका, जनावरांच्या धारा काढू नका.
14 जानेवारीच्या रात्री सुर्याचा मकर राशीत प्रवेश आणि दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल.
या संक्रांतीचं जन्म नक्षत्राप्रमाणे फळ असं असेल.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताच वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक, मकर या 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशींना धन ऐश्वर्या चा योग जुळून येणार आहे.
कृतीका, रोहिणी, मृग, या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना प्रवास योग आहे.
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा, या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना शरीरपीडा होईल.
उत्तरा, हस्त, चित्रा या नक्षत्रांना व्यथेला सामोरं जावं लागेल.
स्वाती, विशाखा, जेष्ठा, पूर्वाषाढा अनुराधा आणि मूळ नक्षत्रांना वस्त्रप्राप्ती होईल.
श्रवण, धनिष्ठा, उत्तराषाढा यांना धननाशाची शक्यता आहे.
शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, अश्विनी, रेवती, भरणी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना भरपूर धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी मनाचेTalks देत नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. शिवाय, त्याचा कोणताही वापर करणे ही केवळ वापरकर्त्याची जबाबदारी असेल.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.