मुंबईसाठीची म्हाडा लॉटरी : जाणून घ्या ह्या बाबतची सर्व माहिती.

 

मुंबईकर लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लॉटरीच्या ऍप्लिकेशनची मुदत आता वाढवली आहे. ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता वाढवून १० जुलै २०२३ करण्यात आली आहे.

म्हाडा/ MHADA म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी. ह्या संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना सवलतीच्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जातात.

आज आपण ह्यावर्षीच्या मुंबईच्या म्हाडाच्या लॉटरी बद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत.

housing.mhada.gov.in ह्या वेबसाइटवर म्हाडाच्या लॉटरीची आणि इतर सर्व माहिती असते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात म्हाडा तर्फे दिली जाणारी घरे आणि घेतल्या जाणाऱ्या लॉटरी यांची संपूर्ण माहिती ह्या वेबसाइटवर आहे.

ह्या वर्षी मुंबई आणि कोकण विभागाची म्हाडा लॉटरी काढली जाणार आहे.

ह्यावर्षीच्या म्हाडा लॉटरी ऍप्लिकेशनची मुदत वाढवून ती आता १० जुलै २०२३ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १० जुलै पर्यन्त ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर म्हाडा तर्फे १७ आणि २४ जुलैला फायनल ऍप्लिकेशन ड्राफ्ट पब्लिश केला जाईल.

सर्व प्रोसीजर पूर्ण झाल्यानंतर म्हाडा तर्फे लॉटरी काढण्याचा दिवस निश्चित केला जाईल. म्हाडामध्ये घर घेताना उपलब्ध असणारे आरक्षण

म्हाडा ही सरकारी संस्था असल्यामुळे येथे लॉटरी काढताना आरक्षण पद्धत वापरली जाते. एकूण उपलब्ध घरांच्या काही टक्के भाग आरक्षित असून त्या त्या लाभार्थी लोकांना मिळतो.

आरक्षणांचे प्रमाण खालील प्रमाणे आहे.

एकूण घरांच्या संख्येच्या ११ % घरे अनुसूचित जाती (SC) तर ६ % घरे अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव आहेत.

१.५ % घरे भटक्या विमुक्त जमातींसाठी असून प्रत्येकी २.५ % घरे पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी राखीव आहेत.

३ % घरे दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असून २ ते ५ % घरे माजी आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, सैनिक, जखमी अथवा मृत सैनिकांचे कुटुंबिय यांच्यासाठी राखीव आहेत.

सुमारे ५० % घरे open कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी देखील आरक्षण उपलब्ध आहे. मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी योग्य ती कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. उदा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी

म्हाडा तर्फे घर मिळवण्यासाठी अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे –

1) आधार कार्ड 

2) पॅन कार्ड 

3) उत्पन्नाचा दाखला 

4) जातीचा दाखला 

5) वयाचा दाखला 

रहिवासी असल्याचा दाखला ( domicile certificate) 

ही सर्व घरे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने allot केली जातात. म्हाडा मध्ये सध्या उपलब्ध असणारी घरे, त्यांची लोकेशन आणि घरांची रचना वगैरे असे सर्व तपशील म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

तसेच म्हाडाचे app देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या लोकांना म्हाडा तर्फे घर मिळवण्याची इच्छा आहे असे सर्व लोक म्हाडाचे app वापरुन अथवा अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करून घर मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

याशिवाय म्हाडाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन देखील माहिती मिळवता येऊ शकेल.

म्हाडा लॉटरी २०२३ माहिती कक्ष पत्ता खालील प्रमाणे 

म्हाडा लॉटरी हेल्प सेंटर
मित्र कक्ष जवळ,
गेट नंबर ३, गृहनिर्माण भवन,
वांद्रे पूर्व, मुंबई

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर म्हाडा तर्फे घर घेण्याचे स्वप्न साकारायचे असेल तर असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आवश्यक ती कागदपत्रे आणि पेमेंट याची पूर्तता करा आणि येत्या गुढीपाड्व्यापर्यंत आपले स्वप्नातले घर मिळवा. तसेच हा लेख जास्तीत जास्त शेयर करून इतरांना ह्या माहितीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

 

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।