जेवताना मूळात जेवणावर लक्ष असावे.
तन्मना भुञ्जीत – म्हणजे जेवताना शरीर व मन🤔 ठिकाण्यावर असावे.
आपणास कोणत्याही विषयाचे ज्ञान होण्यासाठी खालील श्रुंखला आवश्यक असते.
आत्मा मनसा संयुज्यते, मन इंद्रियेण, इंद्रियं अर्थेन तद् ज्ञानं!
प्रथम आत्म्याचा मनाशी संयोग होतो, नंतर मन इंद्रियाशी एकरूप होते, इंद्रिय त्याच्या अर्थाशी (विषयाशी) एकरूप झाल्यावर अर्थज्ञान होते.
आपण कधीकधी विचार करता करता हरवून जातो नि त्यावेळी आपले 👁👁डोळे ऊघडे असूनही आपल्याला समोरील व्यक्ति दिसत नाही, तीच्या हाकेचा आवाज🗣👂 ही येत नाही, डोळ्यासमोरून हात फिरवल्यावर, चुटकि वाजवल्यावर किंवा मोठ्याने हाक 🗣मारल्यावर आपण जागेवर येतो.
म्हणजे इंद्रिय ज्या अर्थाशी किंवा विचाराशी तादात्म्य पावेल तो विषय सोडून त्यावेळेला इतर विषयाचे सम्यक ज्ञान होत नाही.
म्हणजेच काय इंद्रियाचा काल्पनिक किंवा 😇वैचारीक प्रतिमेशी संयोग झाल्यास त्याला वास्तविक विषयाचे ज्ञान होत नाही किंवा नजर एखाद्या वस्तूकडे असूनही मन भरकटलेले असेल तर ती वस्तू आपल्याला दिसत नाही.
डोक्यावर 🤓चष्मा असून चष्मा शोधणे, खिशात ✍पेन असून पेन शोधणे, घरातून🏠 निघाल्यावर पुन्हा 🔑🚪🔓लाॅक व्यवस्थित लावले का पहायला जाणे,हि सर्व अयोग्य संन्निकर्षाची लक्षणे आहेत.
ऐव्हाना सुज्ञांना सांगायला नको नजर, कान 🤳मोबाईल मधे गुंतलेले असताना जेवण नुसते आत ढकलायचे काम होत असेल तर आपली शरीर यंत्रणाही असाच हलगर्जीपणा करून अन्न पचवायचे सोडून नुसते पुढे ढकलायचे काम करेल. “असेच वाईट सवयीचे सातत्य तुम्ही नेटाने सहज निभवलेत तर तुम्हाला अपचनाचे फळ हमखास मिळणार. शेवटी प्रत्येकाला त्याच्या परिश्रमाचा मोबदला मिळायलाच हवा ना”!😜😜😜
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.