आज प्रमाणात जेवण्याचे महत्त्व पाहू.
मात्राशी सर्वकाल स्यान्मात्रा ह्यग्नेःप्रवर्तिका।
मात्रांद्रव्याण्यपेक्षन्ते गुरूण्यपि लघूनि च।
अर्धं गुर्वन्नमश्नीयाल्लघ्वन्नं नातितृप्तितः।
मात्राप्रमाणमादिष्टं सुखं येन विजीर्यते।।
सर्वदा मात्रापूर्वक भोजन करावे कारण मात्रापूर्वक घेतलेला आहार हा 🔥 अग्निप्रवर्तक असतो. द्रव्यांच्या गुरूत्व व लघुत्वावर मात्रा अवलंबून असते.
गुरू-लघु आहाराविषयी आधी सविस्तर वर्णन झालेच आहे. गुरू म्हणजे पचायला जड (उशीरा पचणारा), लघु म्हणजे पचायला हलका (लवकर पचणारा).
गुरू पदार्थ- 🍪🌮पिझ्झा,बर्गर किंवा रबडी, पनीर ई.दूग्धजन्य पदार्थ, आंबवलेले पदार्थ ईडली, डोसा, ढोकळा ई., मैदायुक्त पदार्थ वगैरे सर्व.
लघु पदार्थ- साळीच्या लाह्या, कुरमुरे, गहू, ज्वारी, बाजरी, मका ई.च्या लाह्या, राजगीरा लाडू, चिक्कि किंवा त्याच्या पिठाची भाकरी ई.
यातील गुरू पदार्थ भूकेच्या अर्ध प्रमाणात सेवन करावेत जे कि आपण नेमके ऊलटे करतो, ईतके खातो की रात्री पुन्हा भूकच लागत नाहि व ऊपाशीपोटि कसे झोपायचे पुन्हा रात्री भूक लागली तर काही खायला नसणार व🧖♂ झोपही लागायची नाही अशा 🤔संभ्रमावस्थेत पुन्हा गिळायचे. अशी स्वतःच्याच पोटाशी व 🔥अग्निशी नाते जुळलेले नसल्याने त्यांचे 🚨सिग्नल न ओळखणारी बरीच मंडळी व्यवहारात पहायला मिळतात.
ज्या प्रमाणात खाल्लेले अन्न सहज जिरते ती मात्रा योग्य होय.
पण दर 2 तासाला खायला हवे, असे 😴विचार मनात रूजवले गेले असल्यास, तुमचा तरी काय दोष, तुम्ही तरी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा, सर्वत्र 🤔गोंधळ निर्माण करणारी अवस्था असताना! मग अशा वेळी आपल्या शरीराचा (🔥अग्निचा/भूकेचा) आवाज ऐका तो बरोबर भूक असेल तेव्हा मागतो, नको असेल तेव्हा मागत नाही, आपले चुकते कोठे तर आपण 😋 जिभेच्या चोचल्यांच्या आहारी जातो, ते थांबवायला हवे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.