दूरसंचार कंपन्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया लाइफटाइम फ्री इन्कमिंग सुविधा बंद करणार आहे. अशात एखाद्या नंबराला सक्रिय ठेवण्यासाठी ग्राहकांना प्रत्येक महिन्यात एक निश्चित राशीचे रिचार्ज करण्याची गरज राहील.
सप्टेंबर २०१६ मध्ये जियो आल्यानंतर सर्व दूरसंचार कंपन्यांना आपला व्यवसाय करणे कठीण जाऊ लागले आणि सर्वांनीच आपले डेटा आणि कॉलिंग चे रेट जिओच्या जवळपास आणण्यासाठी निम्म्यावर आणले. आणि यापूर्वी आपली किती अक्षम्य लूट होत होती हे ग्राहकांच्या लक्षात आले.
२००५ -२००६ च्या आसपास आयडिया आणि नन्तर इतर सर्व्हिस प्रोव्हायडर्सनि आपल्या ग्राहकांना मोफत इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलची सुविधा दिली होती. पण आता टेलिकॉम मार्केटमध्ये आलेला हा बदल साधारण या सर्वच कंपन्यांसाठी डोईजड झाला. आणि त्यांच्या कमाईवर वाईट परिणाम होऊ लागला. म्हणून कंपन्यांनी टॅरिफ प्लानची समीक्षा केली आहे. पूर्वी दिलेल्या सुविधा बंद करण्याचे नवे नियम या कम्पन्यांनी आणले. पण या सुविधा चालू करण्यासाठी केलेल्या रुपये ५०० ते १००० च्या रिचार्जचे काय याचे उत्तर मात्र ग्राहकांना दिले जात नाही. याचबद्दल एका ग्राहकाचे टेलिकॉम ऑपरेटर च्या कस्टमर केअर एक्सेक्युटीव्ह बरोबर झालेले हे संभाषण खालील व्हिडिओमध्ये ऎका.
एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ने आता कुठलेही प्री पेड नंबर सक्रिय ठेवण्यासाठी निश्चित अवधीचे न्यूनतम टॅरिफ आणले आहे. जसे की एअरटेल ने ३५, ६५ आणि ९५ रुपयांचा मिनिमम रिचार्ज प्लान पेश केला आहे, यात टॉकटाइम, डाटासोबत २८ दिवसांची वैधता मिळेल. वोडाफोन देखील ३० रुपये प्रतिमाहचे मिनिमम रिचार्ज आणणार आहे, हा रिचार्ज एखाद्या नंबरला सक्रिय ठेवण्यासाठी जरूरी राहील.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.