युद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना!!!

मित्रांनो, चौदा फेब्रुवारीला पुलवामा घडलं, आणि सगळा देश खवळला, प्रत्येकाच्या मनात आक्रोश होता.

काल भारतीय वायुसेनेच्या वीर जवानांनी पाकिस्तानात घुसुन जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय उडवलं, आणि आज सगळीकडे युद्धाचा ज्वर चढलाय.

आता पुढे काय होणार? कोण कुणावर हल्ला करणार? सगळं इथचं थांबणार का अजुन मोठं युद्ध होणार?

टी. व्ही. चालु केलं तर तेच…. वर्तमानपत्र उघडलं तरी तेच… मोबाईल उघडलं तरी तेच.

भारत, पाकिस्तान, हल्ला, बदला, खातमा, विमान पाडलं, धडा शिकवला, धमक्या, गरळ, इशारे, हाय अलर्ट!…… युद्ध?….

हे सगळं पाहुन, वाचुन आपल्या नैसर्गिक प्रतिक्रिया काय असतात.

आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!

मनात एक द्वंद!

खरं तर मागच्या वीस वर्षात आपण प्रत्यक्ष युद्ध अनुभवलं नाहीये!

कारगिल हे तसं मर्यादित क्षेत्रामध्ये आपली जमिन वापस मिळवण्यसाठी राबवलं गेलेलं ऑपरेशन होतं!

आणि आपल्यापैकी खुपच कमी लोकांनी १९७१ किंवा १९६५ ची युद्धे आणि त्याचा थरार अनुभवला असेल.

आणि आता तर अत्याधुनिक शस्त्रांमुळे युद्धशास्त्राचे नियम खुपच बदलले आहेत.

प्रत्येक युद्धामध्ये विजय त्यालाच मिळतो, जो मानसिक डावपेचांमध्ये विजयी होतो.

It’s all mind game!

आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही रोज छोटे छोटे युद्धचं खेळत असतो की!…. जे नियम लुटुपुटीच्या युद्धात लागु पडतात, तेच नियम मोठ्या युद्धात लागु पडतात.

अनुकुलता

नियम पहिला – “युद्ध तोच जिंकतो, जो पक्ष प्रबळ असतो.”

भारताची शक्तिस्थाने –

देवाच्या कृपेने, भारत आज एक समृद्ध देश बनण्याच्या मार्गावर आहे, अगदी उंबरठ्यावर उभा आहे.

आपली अर्थव्यवस्था मजबुत आहे.

अमेरीका, रशिया असो वा इस्त्राईल, जपान सगळे दोस्त आपल्या बाजुने आहेत. फ्रान्स आपल्याला शस्त्रे पुरवतोय, इंग्लडचा जगावरचा प्रभाव कमी झालाय.

अफगाणिस्थान, सौदी आणि इराण सारखी कट्टर मुस्लीम राष्ट्रेसुद्धा आज आपली दोस्त राष्ट्रे आहेत.

कमीत कमी आपल्या विरोधात कोणतीही इतर मुस्लिम राष्ट्रे नक्कीच उभी नाहीत. त्यामुळे दुसर्‍या महयुद्धासारखी परिस्थिती अजिबात नाही.

चीन आणि सौदी अरेबिया पाकिस्तानला आतल्या बाजुने कुमक पुरवण्याची शक्यता आहे, पण उघडपणे भारताविरोधात उतरु शकणार नाहीत.

तसे करण्यात त्यांचे हित अजिबातच नाही, त्याउलट भारताशी वैर केल्यास, त्यांचे होणारे नुकसान जास्त आहे.

आपले लष्कर सज्ज आहे, तिन्ही सेनांमध्ये सुसुत्रता आहे. प्लानिंग आणि एक्झ्युक्युशन करणारे अधिकारी आपलं काम चोख करत आहेत.

सगळ्यात महत्वाचे, आज भारताकडे मोदींसारखा देशभक्त, समजदार आणि दहा घरे पुढचा विचार करणारा सेनापती आहे. जशास तसे उत्तर देणारी सेना आहे.

आणि, एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या वाटेला जाण्यापुर्वी कोणीही शंभरदा विचार करेल.

दुबळा पाकिस्तान

पाकिस्तान आजपर्यंत फडफडत होता तो अमेरीकेच्या आर्थिक मदतीवर, अमेरीकेत सत्ताबदल झाला, ट्रंम्पतात्या आले आणि त्यांनी कट्टर आतंकवाद्याविरोधात आघाडी उघडली.

पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली.

अमेरीकेने पुढाकार घेऊन, जगात वेळोवेळी पाकिस्तानला एक्स्पोज केलं, त्याला एकटं पाडलं, तिथल्या नेत्यांचं, तिथल्या दहशतवाद्यांचं मनोधैर्य खच्ची केलं.

अणुबॉम्बच्या धमक्या देत पाकिस्तान आजपर्यंत भारतीय नेतृत्वावर दबाव ठेवण्यात यशस्वी झाला,

आता ते तितकं सोपं नाही, हे पाकिस्तानलाही माहीत आहे,

अणुबॉम्बचा वापर केल्यास पाकिस्तानला त्याची जबर किंमत मोजावी लागेल. तो देश फक्त एक वाळवंट बनुन राहील.

भारताची जमेची बाजु अशी की आपल्याकडे अणुबॉम्बला नष्ट करणारी, त्याचा प्रभाव कमी करणारी, बॅलेस्टीक मिसाईल्स नष्ट करणारी ‘एस – चारशे’ यंत्रणा आहे जी अशातच आपण रशियाकडुन खरेदी केली आहे.

ह्या क्षणी जगातल्या सगळ्या प्रबळ राष्ट्रांच्या गुप्तचरर यंत्रणा, आणि त्याच्या तीक्ष्ण नजरा पाकवर रोखलेल्या आहेत, त्यांच्या सॅटेलाईट, त्यांची रडारे फक्त पाकिस्तानच्या हालचाली टिपत असतील.

पाकिस्तानबद्द्ल कुणालाच विशेष ममत्व नाही, कारण तो देश दहशतवाद्यांचा आहे, भारताबद्द्ल सर्वांनाच सहानभुती आहे.

हे युद्ध पाकिस्तानला परवडणार नाही, याची इतरही अनेक कारणे आहेत.

  • पाकिस्तान अर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
  • बलुचिस्तान, पख्तुन खैबर ह्या राज्यातली बहुसंख्य जनता तिथल्या नेत्यांच्या पाठिशी अजिबात नाही, उलट सरकारच्या विरोधात अनेक संघटना उघडपणे दंड थोपाटुन उभ्या आहेत.
  • आधीच गेले काही महिने, पाकिस्तानात महागाईने लोकांचे जगणे त्रस्त केले आहे, आता युद्ध केल्यास जनता आपल्यापेक्षा अधिक होरपळेल. त्याचा उद्रेक कसा होईल? सरकारविरोधात बंड किंवा विद्रोह!

बुद्धीभेद

नियम दुसरा – जो आपल्या शत्रुचा बुद्धीभेद करण्यात यशस्वी होतो, तोच जिंकतो!

साध्या भाषेत बोलायचे तर हे म्हणजे, बोलायचे एक आणि करायचे दुसरेच!

आपला मनसुबा, आपल्या मनात काय शिजतयं त्याचा शत्रुला थांगपत्ता लागु द्यायचा नाही.

भारताचे दोन्ही सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाले कारण हाच गनिमी कावा!

पुर्ण फिल्डींग लावुन, पुर्ण तयारीनिशी शत्रुवर एकच मजबुत वार आणि काम तमाम!

ही शिवप्रभुंची युद्धनिती आहे, इथे शंभर टक्के विजय हमखास!

आता पाकिस्तान सावध झालाय, तोही आपला बुद्धीभेद करण्याचे अनेक प्रयत्न करेल.

“आम्हाला युद्ध नको आहे, मोदी आमच्यावर युद्ध लादत आहे.”….. “निवडणुका जिंकण्यासाठी भारत सरकार युद्धखोरी करत आहे.”…… “युद्धाने विनाश होईल, कुणाचेही भले होणार नाही!”

असे मानवतेचे पाठ आपल्याला शिकवले जातील, त्यांच्या शब्दांवर दया करुन, विश्वास ठेवल्यास शत्रु एका बेसावध क्षणी पुन्हा आपल्यावर वार करेल कारण आपण एका विषारी नागाला डिवचलं आहे,

आता त्याला ठेचल्याशिवाय, आपल्याकडे पर्यायच उरत नाही.

पाठिंबा

नियम तिसरा – “युद्ध तेच लोकं जिंकतात, ज्या भुभागावरचे लोकं मनाने एक असतात.”

पानिपत आठवतयं, ट्रॉजन हॉर्स माहिती आहे का? जगजेत्ता नेपोलियन बोनापार्ट का हरला?

जाऊ द्या, एक महत्वाचं सांगतो,

  • भारतामध्ये, फुटीरतावाद्यांबद्द्ल, नक्षलवाद्यांबद्द्ल आणि पाकिस्तानबद्द्ल सहानभुती असणारी एक मोठी लॉबी कार्यरत आहे.
  • हे सरकारविरुद्ध, त्यांच्या धोरणाविरुद्ध दिवसरात्र, बोंबाबोंब करतील, हा एकच कार्यक्रम ह्यांना येतो!
  • भारतीय जवान मेल्यांचं ह्यांना सोयरसुतक नसतं, पण दहशतवादी, पत्थरबाज काश्मिरी आणि पाकिस्तानी कलावंत, पाकिस्तानी क्रिकेटर ह्यांच्याबद्द्ल मात्र ह्यांना विशेष प्रेम असतं.
  • असे अनेक लोक आपल्या आजुबाजुला आहेत, आपण त्यांना निमुटपणे सहन करतो, अशा लोकांना समाजात प्रतिष्ठेचं स्थान मिळतं, हे आपलं दुर्दैव आहे.
  • ह्यांना ओळखा, ह्यांच्या पासुन दुर रहा, ह्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाका. शक्य असेल तसा ह्यांचा विरोध करा.
  • ह्या लोकांचा विशीष्ट धर्म नाही, हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, शीख सगळ्या धर्मांमध्ये हे ट्रोजन व्हायरस भरलेले आहेत, पाकिस्तान पेक्षा जास्त धोका देशाला ह्या लोकांपासुन आहे.
  • आपण ह्या देशद्रोही लोकांना, त्यांच्याच समर्थकांमध्ये एक्स्पोज करत राहीलं पाहिजे.
  • तुम्ही कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असा, किंवा राष्ट्रवादीचे, शिवसेना मनसे वाले असा किंवा प्रकाश आंबेडकर – ओवेसी टोळीचे समर्थक असा, मायावतीचे भक्त असा किंवा समाजवादी पार्टीचे असा, लक्षात ठेवा, हा देश आहे तर तुम्ही आणि तुमचं आस्तित्व आहे.
  • मोदीविरोध करता करता देशद्रोह्यांचे समर्थक बनुन आपण जगणार आहोत का? हा प्रश्न स्वतःला रोज एकदा जरुर विचारा.
  • सरकारवर आणि सैन्यावर टिका करणारे, कोर्टावर आणि निवडणुक आयोगावर शंका घेणारे, देशात असहिष्णुता आणि असुरक्षितता आहे अशी आरोळी फोडणारे हे गद्दार लोकं आहेत.
  • मतांसाठी आपल्या धर्माच्या, आपल्या जातीच्या लोकांना भडकावणं, हा नीचपणा आहे! ह्यांच्या जाळ्यात फसु नका.
  • ह्यांना निमुटपणे सहन करु नका, मतं मागायला आले की, त्यांना मॅसेज द्या.

‘सत्ता प्राप्त करायचीच असेल तर मोदीविरोधासाठी इतक्या खालच्या थराला जाण्यापेक्षा मोंदीपेक्षा जास्त काम करुन दाखवा, आपोआप लोकं तुम्हाला मतं देतील!’

निर्भयता

नियम चौथा – “भित्यापाठी ब्रम्हराक्षस!”

अनेक वर्षांपुर्वी शोले पिक्चरमध्ये महान डाकु गब्बर बाबा सांगुन गेले आहेत, “जो डर गया, वो मर गया!”

काहीही झालं तरी घाबरायचं नाही, कारण घाबरुन काहीही फायदा होत नसतो. युद्ध हे आज ना उद्या हे होणारच होतं.

ह्याची सुरुवात १९४७ लाच सुरुवात झाली होती, पाकिस्तानला जरब बसवल्याशिवाय, पाकीस्तानचा पुर्ण बिमोड केल्याशिवाय हे युद्ध संपणार नाही.

थोडे दिवस युद्धविराम होईल, पण कागाळ्या चालुच राहतील, कधी शस्त्रसंधींच उल्लंघन, कधी बॉम्बस्फोट, कधी लष्करी तळावर हल्ले, कधी नागरिकांवर!

सुरक्षा यंत्रणा आपापलं काम करतीलच!

आपापल्या परीने प्रत्येक भारतीयाने सतत सतर्क रहायलाच हवे!…….

जे होईल त्याला हसत हसत सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे.

न्युज चॅनेल वाले टीआरपी साठी सनसनाटी बातम्या देत राहतील, त्यांच्या जाळ्यात अडकुन अजिबात घाबरुन जावु नका.

विश्वास ठेवा.

आपल्याला वाटतं त्यापेक्षा आपण कितीतरी जास्त शक्तीशाली आहोत, हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत रहा, आठवुन देत रहा.

प्रार्थना

“त्या प्रत्येक जवानाच्या सुरक्षेसाठी अंतःकरण पुर्वक प्रार्थना करा, जो आपल्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालुन आपल्या ठिकाणी तैनात आहे.”

त्यांना शक्य असेल ती प्रत्येक मदत करण्यासाठी पुढाकार घ्या.

रोज रात्री झोपताना, आपल्यावर अनेक शहिद वीर जवानांचं, त्यांच्या कुटुंबियांचं कर्ज आहे. हे विसरु नका. त्यांच्यासाठी सदभावना व्यक्त करायला आणि प्रार्थना करायला अजिबात विसरु नका, ही कळकळीची विनंती!….

मित्रांनो,

सध्या चाललेल्या घडामोडी ह्या भारताला उत्कर्षाकडे घेऊन जाणार्‍या आहेत. जगात भारत मानाचं स्थान प्राप्त करणार आहे. येणार्‍या काळात भारत जगाचं नेतृत्व करणार आहे.

भारत माता की जय!

मनःपुर्वक आभार!!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय