इस्रायल, या पृथ्वीवरचा एकुलता एक यहुदी देश!! भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर हा देश एवढा छोटा आहे की अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये असे २० इस्रायल समावतील.
आणि लोकसंख्या एवढी कमी की आपल्या मौनी अमावस्येला जो कुंभमेळा भरतो त्यात चार-पाच इस्रायल तर आपण दोन तासात आंघोळ घालून पाठवून देऊ.
पण हाच इस्रायल जगातला आठवा शक्तिशाली देश आहे. हा देश तंत्रज्ञान आणि उभे राहणारे स्टार्टअप्सच्या बाबतीत मोठमोठ्या देशांना मागे टाकत आहे. चला तर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या देशाबद्दल माहिती करून घेऊ या लेखात…
छोटी लोकसंख्या आणि अफाट ताकद या जोरावर आज कोणताच देश इस्रायल वर हल्ला करण्याचा विचार करू शकत नाही. इस्रायलचा एखादा शत्रू देश असेल तर इस्रायल त्याला सहज सोडणार नाही, त्या राष्ट्राला नेस्तनाबूत करेल हे त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला कि कळतं….
इथल्या नारीकांना जर कुठल्याही देशाकडून काही हानी झाली, तर शत्रू राष्ट्रात घुसून आपल्या नागरिकांना ते सुरक्षित सोडवून आणतात. इस्रायल जगातला सर्वात सुरक्षित देश आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. यांच्या सुरक्षेमागचं कारण म्हणजे यांची सुरक्षा एजन्सी ‘मोसाद’….
१९७२ साली म्युनिक ओलम्पियड मध्ये फिलिस्तीनि दहशतवाद्यांनी यांच्या ११ खेळाडूंना म्युनिकध्ये मारले होते. त्या वेळी तिथल्या पंतप्रधानांनी या खेळाडूंच्या घरी जाऊन वचन दिलं होतं की या हत्यांचा बदला घेतला जाईल.
आणि मग पुढच्या दोन दिवसांत एक ते दीड हजार दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलं. एवढंच नाही तर पुढच्या सोळा वर्षात. त्यांनी हा दहशतवाद उखडून टाकण्यात आपली शक्ती पणाला लावली.
१९७६ साली काही आतांकवाद्यांनी युगंडामध्ये यांच्या ५४ नागरिकांना बंधक बनवले होते. पण ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की इस्रायलने यावर काहीही नेगोसिएशन नाही केले. या नागरिकांच्या घरच्यांनीही देशावर कुठलाच दबाव नाही टाकला की आंदोलने नाही केली.
पण लोकांनी आंदोलने नाही केली म्हणून सरकार मूग गिळून बसले असेही नाही. तर यांनी शांतपणे काय केले, तर युगांडा देशात घुसले आणि रातोरात आपल्या नागरिकांना सोडवून आणले.
ही ताकद आहे यांची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि त्यांच्या सरकार म्हणजे एकूणच त्यांच्या राज्यकर्त्यांची!!
यांच्या ८५ लाख लोकसंख्या असलेल्या देशात ३५ लाख लोक तर आर्मीतच आहेत. यांच्या देशात प्रत्येकाला आर्मीचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.
पुरुषांना तीन आणि महिलांना कमीत कमी दोन वर्षे असे आर्मीचे प्रशिक्षण घ्यावे लागले. इथले लोक आपल्याकडे सहज बंदुकांसारखी हत्यारे बाळगतात पण त्यांचा वापर मात्र देशात अंदाधुंदी माजवण्यासाठी करत नाहीत हे नमूद करण्यासारखे आहे.
खरंतर या सगळ्याचं मूळ समजण्यासाठी इस्रायलच्या जन्माची कहाणी माहीत असली पाहिजे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात हिटलरने ६० लाख यहुद्यांना जीवे मारले.
आणि तेव्हापासूनच यहुद्यांनी आपल्या स्वतंत्र देशाची मागणी करायला सुरूवात केली. त्यावेळीच हा देश फिलिस्टीनहून वेगळा झाला.
पुढे इजिप्त आणि जॉर्डन यात समझोता झाला, की इस्रायल कडून या देशांवर हल्ला झाला तर ते देश एकमेकांची साथ देतील. पुढे १९६७ साली मध्ये इस्रायल आणि इजिप्तच्या सीमेवर युद्ध सुरू झाले.
आणि पहाता पहाता आजूबाजूचे देशही यात उतरले. इस्रायलच्या विरोधात इराक, कुवेत, सुदान, सौदी अरेबिया सारे एकत्र आले. इस्रायल वर हल्ले करण्यासाठी यांनी जॉर्डनला आपले युद्धतळ बनवले.
जॉर्डनमध्ये आर्मीचा तळ बनला आणि या युद्धाला ‘जून वॉर’ असे नाव दिले. पण यांनी इस्रायल वरती हल्ला करण्याआधीच इस्रायल ने ५ जूनला इजिप्तच्या जवळ जवळ चार हजार फायटर जेट्सला जमिनीवरच उडवले.
यामुळे एकत्र आलेले सारे शत्रूराष्ट्र घाबरले आणि पूर्ण युद्ध सहा दिवसातच संपले. एवढेच नाही तर गाझा पट्टी सुद्धा त्यांनी आपल्या कक्षेत घेतली.
इस्रायल देश जेव्हा बनला होता त्यापेक्षा आता त्याचे क्षेत्रफळ जास्त आहे. दुसऱ्या देशांकडून मात खात खात यांनी यांची आर्मी मजबूत बनविली.
हत्यार एक्सपोर्ट करण्यात इस्रायल आज जगातला आघाडीचा देश बनला आहे. इस्रायल अँटी बॅलेस्टिक मिसाइल सिस्टीमने संरक्षित असलेला जगातला एकमात्र देश आहे.
म्हणजे कुठलीही मिसाईल या देशाला उध्वस्थ करू शकणार नाही. युद्ध झालेच तर जागोजागी असलेले बंकर लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात.
इथल्या हॉटेलच्या रुम्सला पण कमालीची सुरक्षा आहे. यातले काही रुम्स असे आहेत की यावर हल्ला झाला तर आतमध्ये काहीही होणार नाही. नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांसारखे त्यांचे पाहुणे या ठिकाणांमध्ये राहिल्याचे आपण यापूर्वी सुद्धा ऐकले असेल.
इतक्या अस्थिर वातावरणात उभा राहून सुद्धा हा देश स्वतःची जागा मजबूत बनवू शकला. आजूबाजूच्या शेजाऱ्यांपासून मुख्यतः शत्रूराष्ष्ट्रांपासून स्थैर्य नसलं तरी यांचं अंतर्गत स्थैर्य वाखाणण्याजोगं होतं.
जगात सर्वात जास्त शरणार्थ्यांना आश्रय देणारा देश कोणता तर उत्तर आहे… इस्रायल!! वॉरेन बफे, बिल गेट्स सुध्दा सांगतात की गुंतवणुकीसाठी इस्रायल हा जगात सर्वात चांगला देश आहे. शेती म्हणा, पर्यटन म्हणा की माहिती तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात इस्रायल आपले पाय रोवून उभा आहे.
अशा या छोट्याशा देशाकडून आपल्या राज्यकर्त्यांनीच नाही तर आपण सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. शेवटी देश कसा यावरूनच तिथल्या नागरिकांचे जीवनमान सुद्धा ठरते.
वर्ष २०२१ च्या वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स मध्ये इस्रायलचं स्थान बाराव्या क्रमांकावर आहे आणि आपल्या भारताचे १३९ व्या क्रमांकावर…
Credit : Vivek Bindra YouTube
इस्रायलची मराठी ऐतिहासिक आणि प्रवासवर्णनपर पुस्तके
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.