गुढीपाडवा आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगळा!!

पहाटे लवकर उठायचं, मस्त नदीवर जाऊन पोहून यायचं, घराच्या दारात आज्जी मस्त शेणाने सारवून घ्यायची त्याला बाजूनं रांगोळी असायची, गुढी उभारली जायची, त्याला कडूलिंब् सहित, सगळं नवीन साडी, कळस, घरात पुरणपोळी चा सुटलेला सुगंध आणि आजूबाजूला असणाऱ्या लहान मुलांना आजच्या दिवशी शाळेत जाऊन एक नारळ देऊन घेतलेला प्रवेश, लहान असताना माझा प्रवेश देखील शाळेत असाच झाला होता, गूळ आणि कडूलिंब् दिलं होतं हातात, सोबत पाटीवर काढलेलं चित्र आणि त्यावर चिपकवलेल्या डाळी, नुसता शाळेत होत असलेला दंगा आणि हाच तो पहिला दिवस शाळेचा, आजही गावचं नवीन वर्ष आजच्या दिवशीच चालु होतंय.

आजपासून सात दिवस गावात पारायण असतं, वीणा आज जो उचलला जातो तो सात दिवसानंतर ठेवतात, ग्रंथवाचन केले जाते, खूप हौस होती वाचायला बसायची लहान असताना, पण कधी योग आला नाही आणि आता बाकीची ग्रन्थ वाचतोय म्हणून धर्म ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही…

तश्या गुढीपाडव्याच्या हॉस्टेल च्या पण आठवणी खूप आहेत, हॉस्टेलला असताना हा एक्साम चा सिजन त्यात, सगळे दूर दूर रहायला होते, जवळ असणाऱ्या मित्रांच्या घरून डबा यायचा, एक एक मावशी १५ पोळ्या आणि किटलीभर आमटी (शेक म्हणतात गावी) द्यायच्या त्यावर तूप टाकून खायला सोबत अजून तुपाचा डबा, भरपूर असं जेवण सणाला यायचं, भरपूर पोळ्या येत होत्या त्या आम्ही आठ्वडाभर पुरवून खायचो …

आता मात्र कित्येक दिवस झालं घरी सणाला जाणं होतं नाही, कितीतरी वर्षापासून आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायला मिळाल्या नाहीत सणाला, आता कधीही गेलो तरी तोच दिवस सण म्हणून घरी पोळी बनवतात, गोडधोड असतं, पण आजकाल सगळं सुटत चाललंय हातातून, एक एक पुस्तकाचं पान निघून पडावं तसं झालं आहे, वाचलेल्या पानाला परत दुमडून वाचू वाटत नाही…

कधी वृद्धाश्रम कधी अनाथ आश्रम, कधी कॅन्सर रुग्ण, तर कधी कुष्ठरोगी, कधी hivग्रस्त लोकांच्या मुलांसोबत आजकाल सण सगळे अश्याच लोकांच्या सानिध्यात जातात, तेव्हा सगळं विसरून परत तोंडावर हास्य आणून त्यांच्यात विसावून जायला लागतं, जगणं जे काही आहे ते मला खूप चांगलं शिकवतात ..

एक घास पाडव्याच्या म्हणून मघाशी एका हॉस्पिटल ला भेट द्यायला गेलो, वार्ड मध्ये एक २७ पेशन्ट होते, त्यातल्या बऱ्यापैकी जणांना मी मदत केली आहे, योजना मिळवून देण्यास, माणूस बघून सांगावा इतका अभ्यास झाला आता त्या पेशन्ट बद्दल, अवघे दोन तीन आठवडे आयुष्य उरलेलं असताना, त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मन भरून येतं, समोरच्याला देखील माहित असते आणि मला देखील, पण सगळं कंठात दाटून सण मात्र आनंदात साजरा केला त्यांनी, येणारा दिवस हा जाणारा असतो, त्याचं कौतुक ते काय असाच अविर्भाव आज त्यांनी दाखवला आणि आज परत एक शिकलो मनानं ठरवलं तर सगळं चांगलं आणि मनानं ठरवलं तर सगळं वाईटच ते आपल्यावर असतं घ्यायचं कसं गुरफुटून जायचं त्यात की सगळं ओडून अवतीभवती त्याच पसाऱ्यात खेळत बसायचं, हा खेळ सणांचा…

हे सगळं शेवटी तुमच्या माझ्या घेण्या देण्यावर आहे, गुडीपाडवा हा प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी वेगळं शिकवत असतो चालायचंच, उदाहरणार्थ भेटनाऱ्याला अनुभव वेगळं मिळतात…

हा पाडवा कडु आणि गोड दोन्ही आठवणी देऊन गेला….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।