जिXहाXद हा एक अरेबिक शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो की कोणाच्या तरी वाईट प्रवृत्तीवर मात करून समाजाच्या चांगल्यासाठी पुकारलेलं युद्ध.
ह्या शब्दाचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावून काही मुस्लीम धर्मवेड्यांनी अतिरेकी कारवायांना ह्या शब्दाची जोड दिली. ह्या शब्दाचा आधार घेत जगभर अतिरेकी कारवाया सुरु केल्या.
जिXहाXद ह्या शब्दाला त्यांनी रक्तरंजित छुप्या युद्धाची जोड देऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी दिले.
जिXहाXद ह्या शब्दाला भारत पण अनेकवेळा बळी पडलेला आहे आणि पडतो आहे.
भारताच्या शेजारील मुस्लीम राष्ट्र पाकिस्तान ह्याच शब्दाचा वापर करतं.
भारताच्या जम्मू – काश्मीर भागात छुपं युद्ध आजही सुरु आहे. ह्याचाच परिणाम म्हणून ह्या प्रदेशातील कित्येक लोक आज भितीच्या सावटाखाली जगत आहेत.
रुक्साना कौसर ही ह्याच जम्मू काश्मीर इथल्या रेजौरी जिल्ह्यात राहणारी एक साधी पहाडी गुज्जर कुटुंबातली एक मुलगी.
तिचं घर हे जम्मू काश्मीर मधल्या अतिशय संवेदनशील भागात होतं.
अवघ्या ३२ किलोमीटर वर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा त्यामुळे गोळ्यांचे आवाज, जिXहाXद च्या नावाखाली सुरु असलेली अतिरेकी कारस्थानं हे लहानपणापासून पचनी पडलेल्या गोष्टी. पण एक दिवस तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
२७ डिसेंबर २००९ च्या रात्री ९.३० च्या सुमारास तीन अतिरेक्यांनी तिच्या घराच्या बाजूला असलेल्या काकांच्या घरात प्रवेश केला. तिकडून त्यांनी मोर्चा रुक्साना च्या घराकडे वळवला.
दरवाजा उघडायला नकार दिल्यावर त्यांनी घराच्या खिडकीतून रुक्साना च्या घरात प्रवेश मिळवला.
अतिरेकी आपल्या घरात घुसत आहेत आणि त्यांची वाकडी नजर आपल्या मुलीवर म्हणजेच रुक्साना वर आहे हे लक्षात आल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला घरातील एका कॉटखाली लपवलं.
घरात शिरल्यावर अतिरेक्यांनी रुक्साना च्या कुटुंबाकडे तिला आपल्या हवाली करण्याची मागणी केली.
पण आपल्या मुलीला त्यांच्या हवाली करण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. एजाझ ह्या रुखसानाच्या लहान भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी अतिरेक्यांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही.
ह्या सगळ्या गडबडीत कॉटखाली लपून बसलेल्या २० वर्षाच्या रुक्सानाची भीती खूप वाढली होती.
अतिरेक्यांच्या हवाली झाल्यावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराची पुसटशी कल्पना पण तिला नकोशी होत होती.
कुठेतरी भीतीची जागा आता संतापाने घेतली होती. आपल्याला लुटायला आलेल्या नराधमांना जशास तसं उत्तर देण्याचं तिच्या मनानं ठरवलं.
घरात अतिरेकी आणि तिचे आई, वडील, भाऊ ह्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असताना रुक्साना ने आपल्या बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीला आपलं अस्त्र बनवत गनिमी काव्यासारखा हल्ला अतिरेक्यांच्या मोहरक्यावर केला.
काय होते आहे हे अतिरेक्यांना कळायच्या आधीच विजेच्या वेगाने तिच्या हातातल्या कुऱ्हाडीने अतिरेक्याच्या डोक्याचा वेध घेतला.
रुक्सानाचा हा अवतार पाहून बाकीचे अतिरेकी बिथरले. त्यांनी तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या दिशेने गोळीबार करायला सुरवात केली.
ह्यातली एक गोळी रुक्साना च्या वडिलांच्या खांद्यात घुसली. त्याच वेळी रुक्साना ने तिच्या वारामुळे घायाळ झालेल्या त्या अतिरेक्याच्या हातातली एXके X४७ घेत त्याला मारून टाकलं.
मग तिने एXके X४७ ने अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. ह्यात अजून एक बंदूक तिने मिळवली. ती आपल्या भावाकडे देत त्या दोघांनी अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. अचानक झालेल्या ह्या नाट्याने अतिरेक्यांनी काढता पाय घेतला.
आपण मारलेला अतिरेकी कोणीतरी महत्वाचा कमांडर होता हे लक्षात आल्यावर पुन्हा होणाऱ्या संभाव्य हमल्यातून वाचण्यासाठी तिने आपल्या कुटुंबासह ‘शाहदरा शरीएफ’ पोलीस पोस्ट कडे कूच केलं.
अतिरेकी आपल्या मागावर असतील ह्या भीतीने त्यांनी रस्त्यातून जाताना आपल्या एXके X४७ मधून हवेत गोळीबार ही केला. जेणेकरून आपल्याकडे अजूनही बंदूक असून जवळ येण्याची हिंमत त्यांनी करू नये.
पोलीस स्टेशनला पोहचताच अतिरेक्यांकडून मिळवलेली सगळी शXस्त्राXस्त्र त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली.
२० वर्षीय रुक्साना ने मारलेला अतिरेकी हा कुख्यात अतिरेकी संघटना लXष्कXर-ए-तXय्यXबा चा कमांडर अबू ओसामा होता.
रुक्साना ने आपल्या बहादुरीने एका मोठ्ठ्या अतिरेक्याचा खात्मा केला होता. रुक्साना ने मारलेला कमांडर हा अतिरेक्यांच्या टीम चा खूप मोठा कमांडर होता त्याच्या हत्येचा चा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी २००९ मधे २ वेळा तिच्या घरावर हल्ला केला.
तिच्या घरावर ग्रेXनेXड ते Xआय.ई.डी.X चे हल्ले झाले पण ह्या सर्वातून ती बचावली.
रुक्सानाच्या ह्या बहादुरी बद्दल तिला २००९ साली राष्ट्रीय बहादुरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
२०१० साली रुक्साना आणि तिचा भाऊ एजाझ ह्या दोघांना त्यांच्या बहादुरीसाठी किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं.
किर्ती चक्र हा शांती काळात देण्यात येणारा दुसरा सगळ्यात मोठा शौर्य पुरस्कार आहे. राजोरी इथल्या जामिया मशीदचे धर्मगुरू मौलाना अमिर मोह्हमद शामसी ह्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना म्हटलं,
रुक्साना ने आज जिXहाXद चा खरा अर्थ जगापुढे मांडला.
धर्मगुरू मौलाना अमिर मोह्हमद शामसी
अतिरेक्यांना त्यांच्याच शब्दात जिXहाXद शिकवणाऱ्या रुक्साना ने खूप मोठा आदर्श जम्मू काश्मीर मधल्या जनतेपुढे, विशेष करून, तिथल्या मुस्लीम स्त्रियांपुढे ठेवला.
बंदुकीच्या गोळ्यांना न घाबरता हिमतीने परिस्थितीला बदलवता येऊ शकते हे तिने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं. आज ती दोन मुलींची आई असून तिच्या गावातील पोलीस दलात कार्यरत आहे. तिच्या ह्या कर्तृत्वाला माझा सलाम!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.