महल चित्रपटाच्या “आयेगा आनेवाला” या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळची गोष्ट. सतत पाच दिवस या गाण्याच्या तालमी चालू होत्या.
संगीतकार खेमचंद प्रकाशजी अनेक बदल गाण्याच्या चालीमधे करत होते. लतादीदी तेव्हढ्या वेळा तालमी करत होत्या.
लतादीदी वयाने लहान, उपाशीपोटी सर्व काही सहन करत होत्या. गाण्यामधे Echo Effect येण्यासाठी लतादीदी पावलांचा आवाज न करता दुरुन हळूहळू चालत येत माईकजवळ यायच्या व दुरुन आवाज येत आहे असा परिणाम मिळायचा. त्यासाठी खूप वेळा त्याना हे करावे लागले.
पाच दिवसानी अखेरीस या गाण्याचे रेकॉर्डींग झाले तेव्हा लतादीदी म्हणाल्या या गाण्याची धून माझ्या रोमारोमात भिनली होती.
प्रत्येक सुराशी आणि शब्दाशी मी एव्हढी एकरुप झाले होते की ते गाणे म्हणताना मला कसलाही त्रास न होता अतिशय सहजतेने मी म्हटले.
वादकासह सर्वांचे कठोर परिश्रम, उत्कृष्ट चाल, लतादीदींचा स्वर्गीय आवाज, योग्य शब्द आणि सुंदर अभिनयासह झालेले शूटींग यामुळे हे गाणे माईल स्टोन झाले आहे. इतक्या वर्षांनी अजूनही ते ताजे आणि सर्वाना हवेहवेसे वाटण्याचे कारण हेच आहे.
“आयेगा आनेवाला”
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.