हा सगळा चुकिचा रतिब कमी करत, बंद करायला सांगितला, त्यामागील कारणही समजावले. तर रूग्णा म्हणाली, हे सगळं बंद करायचं मग खायच काय? मी म्हटले उपमा, पोहे, धिरडे, थालिपिठ हे खाऊ शकता.
आज २१ व्या शतकात सर्व संपत्तीच्या मागे धाव घेत आहेत. आरोग्यास दुय्यम स्थान दिले जाते.
“माणुस आज सवयींचा गुलाम झाला आहे”…. आरोग्यप्राप्तीसाठी एखादी सवय सोडा म्हटले तर रुग्ण तो डाॅक्टर सोडतो.
एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.
एखाद्या व्यसनाप्रमाणे आज माणूस वाईट सवयीत पुरता अडकून गेलाय.
“जान जाए पर वचन न जाए” या म्हणी प्रमाणे “जान जाए पर आदत न जाए” असे जणू काही अभिमानाने मिरवल्याप्रमाणे काही जणांची बाॅडी लॅंग्वेज झाली आहे.
मोडेन पण बदलणार नाही, अशा वागणूकीने आपण स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारत आहोत हे सुद्धा कसे यांना कळत नाही.
हे म्हणजे बुडत्याला ओंडक्याचा आधार द्यावा, तर त्याने हातच पुढे न करण्यासारखे झाले आहे.
बरेच रुग्ण सांगेल त्याप्रमाणे सर्व काही करतात व अप्रतिम गुण ही पहायला मिळतात. पण या लेखात उत्तम क्षमता असूनही नापास होणार्यांबद्दल मुद्दाम चर्चा करतोय.
आरोग्यासाठी सुचवलेले सोपे बदलही न करता यांना मुळापासून कसे बरे करणार.
आयुर्वेद सुखी व निरोगी आयुष्य जगायला शिकवते. पण आजकाल लोकांना औषधांवर जगणे नि औषधांसह मरणे. हेच जणू आवडू लागले आहे.
टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, तसेच आरोग्य केवळ डाॅक्टरांनी उत्तम निदान करुन, चांगले समुपदेशन करुन व प्रभावी उपचार करून मिळत नाही.
सर्व शारीरीक, मानसिक व आगंतुक (कृमिसंसर्ग, आघात इ.बाह्य कारणांनी उत्पन्न होणारे) आजारही बहुतांशी प्रज्ञापराधामुळेच निर्माण होतात.
प्रज्ञापराध म्हणजे एखादी गोष्ट आरोग्यास हानिकारक आहे हे माहीत असूनही ती करण्याचा मोह टाळता न येणे.
चांगल्या गोष्टि शिकवायला गेलं तर आयुर्वेदात खूप पथ्य असतात म्हणून आयुर्वेदालाच बदनाम केलं जात.
अहो पण लोक हेच समजून घेत नाहीत, कि ज्यांना जास्त पथ्य सांगितली जातात, त्यांच्या बर्याच गोष्टि चुकत होत्या, म्हणून जास्त पथ्य सुचवावी लागली.
ज्यांना कमी पथ्य सांगितले जाते, त्यांच्या बर्याच गोष्टि बरोबर असतात, म्हणून कमी पथ्य सांगितले जाते.
नि अजून एक गोष्ट फक्त पैसाच कमवायचा उद्देश असता, तर आजाराच्या मूळाशी जाऊन त्याचे कारण शोधने त्यानुसार जीवनशैलीतले बदल सुचवणे, एवढा खटाटोप कशाला केला असता वैद्यांनी. कायम फेर्या मारायला लावल्या, तर नुकसान कोणाचे ? जरा डोळसपणे विचार करा.
हा लेख रुग्णांविषयी तक्रारीचा सुर ओढण्यासाठी लिहीलेला नाही, तर स्वतःच्या आरोग्याची सूत्र थोडीफार स्वतःच्याही हातात घ्यायला हवीत हेच सांगायचे आहे. कारण एखादा रुग्ण आपण बरा करु शकत असूनही, केवळ त्याच्या असहकार्याने ते यश हुलकावणी देते, हे पाहवत नाही.
एका रुग्णाला जीवनशैलीतले बदल सुचवले व आयुर्वेदिक औषधांनी बी.पी.ची गोळी २१ दिवसात बंद झाली. युरीक ऍसीड वाढले होते, ती गोळी १ महिन्यात बंद झाली.
अतिरीक्त वजन ५ किलोने कमी झाले, पण व्यायाम न केल्यास व दुपारी जेवल्या जेवल्या झोपल्यास बी.पी. वाढणे, हे लक्षण अजून शिल्लक होते. पण रिपोर्ट नाॅर्मल आल्यामुळे व लवकर रिझल्ट मिळायला लागल्याने, पुन्हा आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष सुरु झाले.
पथ्य नकोसे वाटू लागले, पूर्वी मांसाहार व डाळींचे प्रमाण आहारात अधिक होते, व्यायाम कमी व आहार जास्त होता. स्वतःच्या आरोग्यासाठी काही नियम पाळणे, हे नंतर त्रासदायक वाटू लागले.
व्यायाम, वेळेवर जेवण यामुळे व्यवसायाचे नुकसान होते, असे वाटू लागले, व काळजीवाहू बायकोशी चिडचिड व वादविवाद सुरु झाले. यांसारखी काही ईतरही उदाहरणे पाहीली म्हणून या लेखाचा प्रपंच.
नियम न पाळता १-२ वर्षात गाडी गॅरेजला लागली, तर कमवलेल्यापेक्षा जास्त पैसा व वेळ वाया जातो, शिवाय जीवनाची पण शाश्वती नाही, त्यापेक्षा नियम पाळून लाईफटाईम गाडी चांगली राहीली तर जास्त पैसा व सुख कमवू शकाल त्याचं काय?
सिर सलामत तो पगडी पचास, हे आधी समजायला हवं.
आरोग्यम धनसंपदा हे उगीच म्हटलेले नाही.
सर्व भौतिक गोष्टि पैशाने विकत घेता येतात, पण आरोग्य नुसत्या पैशाने विकत घेता येत नाही. जसा पैसा गमवायला वेळ लागत नाही, पण कमवायला वेळ व परीश्रम लागतात. तसेच आरोग्याचे आहे.
आता दुसऱ्या एका रुग्णेचा वृत्तांत ऐकूयात.
एक स्त्री रुग्णा… मानसिक आघातामुळे तिचे मूड स्विंग होऊ लागले, रात्रीची झोप नाहीशी झाली, बायपोलर डिसऑर्डर असे निदान झाले. त्यासाठी अलोपॅथिक औषधे सुरु केली, त्यानंतर भूक वाढली, वजन खूप वाढले. डायबिटिज सुद्धा झाला. रोज जेवणानंतर गोड खायची सवय होती.
संध्याकाळचा नाष्टा सूजी रस्क, नमकिन बिस्किट, पापड, तळलेली भजी, चकली, मैद्याचा वाटाणा आणि ईतर बरेच अद्भूत व अतुल्य असे कधीही न ऐकलेले पण अपथ्यकर पदार्थ.
हा सगळा चुकिचा रतिब कमी करत, बंद करायला सांगितला, त्यामागील कारणही समजावले. तर रूग्णा म्हणाली, हे सगळं बंद करायचं मग खायच काय? मी म्हटले उपमा, पोहे, धिरडे, थालिपिठ हे खाऊ शकता. रुग्णेने लगेच तोंड वाकडे केले.
आता आमचा संवाद ऐका…
रुग्णा : रात्री झोपच येत नाही.
मी : किती वाजता झोपायला अंथरुणावर जाता?
रुग्णा : रात्री १०.४५ वाजता
रुग्णेचा पति : टि.व्ही. बघत बसते मग झोप उडणारच ना.
मी : सकाळी उठता किती वाजता?
रूग्णा : ८.०० / ९.०० वाजता उठते.
मी : दिवसा झोपता का?
रुग्णा : झोपत नाही, फक्त पडते थोडा वेळ.
मी : साधारण किती वाजता?
रुग्णेचा पति : नाही, ओ…. दिवसा झोपते सकाळी व दुपारी.
रुग्णेचा पति : सकाळचा नाष्टा खाल्ल्यावर ९.३० – १०.३० वाजता झोपते. मग नंतर दुपारच्या जेवणानंतर २.०० – ५.००
मी : बापरे! दिवसाच ४ तास झोप झाली. अहो दिवसाची ४ तास झोप ही रात्रीच्या ८ तास झोपेप्रमाणे असते. मग कशी येणार तुम्हाला पुन्हा झोप. २४ तासात ८ तास झोप भरपूर झाली. नि दिवसा असे जेवल्यावर तुम्ही ताणून देणार असाल तर, तुमचा स्थूलपणा, मधुमेह व रात्रीचा निद्रानाश ब्रह्मदेव सुद्धा बरे करू शकणार नाही.
रुग्णा : दिवसा मी फक्त पडते झोपलेली नसते.
रुग्णेचा पति : हो का ? चांगली घोरत असतेस की!😂😂😂
अक्षरश: तारक महता का उलटा चष्मा मध्ये हि स्क्रिप्ट द्यावी, असा आमचा हा कन्सल्टिंगचा संवाद झाला.
आता फार काय बोलायचे ? म्हणूनच म्हणतो, “सवयी बदला, आरोग्य सुधरेल”!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Would like to know more about health tips…
Plz allergic rhynitis war upchar sanga