एलोपेशिया एरियाटा | चाई पडण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय

एलोपेशिया Alopecia Areata (चाई पडणे) म्हणजे काय? काय आहेत याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय?

केस गळणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे. थोड्याफार प्रमाणात केस सर्वांचेच गळतात. असे म्हणतात की दररोज डोक्यावरचे शंभर केस गळून पडतात आणि तितकेच नवीन उगवून येतात.

त्यामुळे केस गळणे ही खरे तर फार मोठी समस्या नाही. परंतु खूप जास्त प्रमाणात केस गळणे आणि केस गळण्याच्या ठिकाणी नवीन केस न उगवणे, त्याजागी टक्कल पडणे ही मात्र गंभीर समस्या आहे.

खूप जास्त प्रमाणात केस गळणे ह्यालाच एलोपेशिया एरियाटा किंवा चाई पडणे असे म्हणतात. काही लोकांमध्ये एलोपेशिया झाल्यानंतर डोक्याबरोबरच शरीराच्या इतर भागांवरील केस देखील गळून पडतात किंवा विरळ होतात. जसे की भुवया, काखेतील केस इत्यादी.

अशा प्रकारे केस गळत असतील आणि डोक्यावर टक्कल दिसत असेल तर मात्र या समस्येवर उपाय करणे आवश्यक आहे. आज आपण या समस्येची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

एलोपेशिया म्हणजे काय?

अतिरिक्त प्रमाणात केस गळणे म्हणजेच एलोपेशिया. ही समस्या पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्ये ही आढळून येते.

पुरुषांचे समोरच्या बाजूचे आणि कडेच्या बाजूचे केस गळतात तर स्त्रियांच्या माथ्यावरील केस गळतात. या समस्येमुळे पुरुषांना संपूर्ण टक्कल पडू शकते परंतु स्त्रियांना मात्र टक्कल पडत नाही. त्यांचे केस खूप विरळ होतात. पुरुषांना मात्र संपूर्ण किंवा अर्धे टक्कल पडणे आणि डोक्याच्या कडेने केस उरणे असे होऊ शकते.

एलोपेशियाचे प्रकार

१. एलोपेशिया एरेटा – एलोपेशियाच्या या प्रकारामध्ये शरीराच्या कोणत्यातरी एका ठिकाणचे केस गळून पडतात. म्हणजेच डोक्यावरील एका ठिकाणचे केस गळून पडतात. संपूर्ण डोक्यावरील केस गळत नाहीत.

२. अँड्रॉजेनिक एलोपेशिया – एलोपेशियाच्या या प्रकारामध्ये विविक्षित पॅटर्ननुसार केस गळू लागतात. हा आजार शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे होतो.

३. टेलोजेन एफ्लुवियम – या प्रकारच्या एलोपेशियामध्ये दररोज डोक्यावरील १०० पेक्षा जास्त केस गळू लागतात. हा आजार थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन, कुपोषण, ताण तणाव किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट यामुळे होऊ शकतो.

४. ट्रॉमॅटीक एलोपेशिया – एलोपेशियाचा हा प्रकार लहान मुलांमध्ये दिसून येतो. स्वतःचेच केस वारंवार ओढल्यामुळे हातात निघून येणे असे या आजारांमध्ये घडते.

५. टिनिया कॅपॅटीस – या प्रकारामध्ये डोक्यामध्ये काळे डाग पडलेले दिसून येतात जिथले केस गळून पडतात.

एलोपेशियाची कारणे

१. ऑटोइम्युन कंडिशन ( रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या केसांची मुळे देखील नष्ट करते)

२. अनुवंशिकता

३. गरोदरपणा

४. एखादा मानसिक आघात किंवा धक्का

५. कुपोषण

६. हार्मोन्स संबंधी आजार जसे की पीसीओडी, हायपरथायरॉईड , हायपोथायरॉईड

७. डेंग्यू, मलेरियासारखे तीव्र ताप येणारे आजार

८. ताण तणाव

एलोपेशियाची लक्षणे

१. अतिरिक्त प्रमाणात केस गळणे हे एलोपेशियाचे प्रमुख लक्षण आहे.

२. त्या व्यतिरिक्त संसर्ग झालेल्या ठिकाणी खाज येणे, सूज येणे, आग होणे किंवा त्वचेचा तो भाग लाल होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

एलोपेशियावरील घरगुती उपाय

१. कांदा

एका कांद्याचा रस काढून तो केसांच्या मुळांशी लावून ठेवावा. पंधरा मिनिटानंतर शाम्पू लावून केस स्वच्छ धुऊन टाकावे. असे आठवड्यातून दोन दिवस करावे. कांद्यामध्ये असणाऱ्या झिंकमुळे केसांची मुळे मजबूत बनतात आणि केस गळणे कमी होते.

२. नारळाचे दूध 

अर्ध्या नारळाचे दूध काढून ते कोमट करावे. त्यानंतर ते केसांच्या मुळांशी लावून हलका मसाज करावा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन टाकावे. हा उपाय दर आठवड्यातून एकदा करावा. नारळाचे दूध केसांच्या वाढीसाठी पोषक असल्यामुळे या समस्येवर फायदेशीर ठरते.

३. नारळाचे तेल 

दोन चमचे नारळाचे तेल गरम करून केसांच्या मुळांशी लावावे. केसांना हलकी मालिश करून शॉवर कॅप लावुन ठेवावी. शक्यतो रात्री तेल लावून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर केस धुवावेत. नारळाच्या तेलामध्ये असणाऱ्या लोरिक ऍसिडमुळे केस गळणे कमी होते.

४. मेथी 

दोन चमचे मेथी दाण्यांची पावडर एक चमचा नारळाच्या तेलात मिसळावी. तयार झालेली पेस्ट केस गळण्यामुळे टक्कल पडलेल्या भागावर लावावी. वीस मिनिटं पर्यंत ठेवून ही पेस्ट वाळू द्यावी. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन टाकावे. दर एक दिवसाआड हा उपाय करता येऊ शकतो. मेथीदाण्यांमध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन ई , आयर्न आणि झिंक असते. त्यामुळे केस गळणे कमी होते.

५. मोहरीचे तेल 

केसांच्या मुळांशी मोहरीचे तेल लावून हलका मसाज करावा. काही तास ठेवून केस धुऊन टाकावेत. मोहरीच्या तेलामुळे केस गळणे तर थांबतेच शिवाय केसात असलेला कोंडा देखील निघून जाण्यास मदत होते.

६. जास्वंदाचे फूल

जास्वंदाचे एक फूल आणि चार-पाच पाने घेऊन ते वाटून त्याची पेस्ट तयार करावी. त्यामध्ये चार चमचे दही मिसळून ती पेस्ट केसांच्या मुळांशी लावावी. एक तासानंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करता येऊ शकतो.

७. लसूण

आठ-दहा लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून त्यामध्ये मध मिसळावा. हे मिश्रण टक्कल पडू लागलेल्या जागी लावून वीस मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर शाम्पू लावून केस धुऊन टाकावेत. हा उपाय आठवड्यातून एक वेळा करता येऊ शकतो.

८. कोरफडीचा गर

कोरफडीचा गर किंवा जेल केसांच्या मुळांशी लावून हलका मसाज करावा. वीस मिनिटानंतर केस धुऊन टाकावेत. दर एक दिवसाआड हा उपाय करता येऊ शकतो.

९. दालचिनी पावडर

दालचिनी पावडरमध्ये पाणी घालून त्याची घट्ट पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट संपूर्ण डोक्याला लावावी. अर्धा तास ठेवून नंतर केस धुऊन टाकावेत. हा उपाय दर एक दिवसाआड करता येऊ शकतो.

तर हे आहेत एलोपेशियावर करण्याचे घरगुती उपाय. याव्यतिरिक्त चांगला चौरस आहार घेणे, व्यवस्थित झोप घेणे, केसांना नियमित तेल लावणे आणि केस धुऊन स्वच्छ ठेवणे, प्रदूषणापासून केसांचा बचाव करणे, केस धुण्यासाठी चांगल्या शाम्पूचा वापर करणे यामुळे देखील ही समस्या कमी होऊ शकेल.

तर मित्र मैत्रिणींनो, या उपायांचा वापर अवश्य करा आणि तुम्हाला कसा फायदा झाला ते आम्हाला कॉमेंट करून कळवा. तसेच या उपायांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।