३६० लहान मोठी शिवमंदिरं असलेलं महाराष्ट्रातलं हे गाव – चारठाणा
तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधेसे खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.(ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)