हे वाचा, ऎका म्हणजे सुखाचा शोध घेणं तुम्हाला सोपं वाटेल
जशी बाह्य गुलामगिरी आपल्याला सहन होत नाही तर आपला आनंद आपण दुसऱ्यावर अवलंबून का ठेवावा? मग हि आंतरिक म्हणजे मानसिक गुलामगिरीच तर झाली. आणि आपल्या आत काय होणार ते दुसऱ्याने ठरवणं हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकार आहे. तुमच्या आजूबाजूचं जीवन १००% तुम्हाला हवं तसं कधीच असू शकत नाही. तर अशा परिस्थिती तुमचं सुख तुमच्या आजूबाजूला काय घडतं यावर अवलंबून न ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे.