Author: किरण कृष्णा बोरकर
“चार ते पाच तास रांगेत उभे राहून… गणपतीच्या समोर गेल्यावर चार सेकंद ही समोर उभे राहू शकत नाही. डोळे भरून त्याला पाहू शकत नाही. उलट धक्के खाऊन बाहेर पडावे लागते. त्या देवाचे दर्शन घेण्यात काय अर्थ आहे…..? मी हा प्रश्न विक्रमला विचारला. तर त्याने “तुझे काय जाते रे भाऊ ….?? देवाचे दर्शन घेणे ही तुझी संकल्पना वेगळी आहे तशीच प्रत्येकाची असावी का…. ??
“आहो कमीतकमी एकहाती निर्णय तरी घेईल. एखादा कायदा आणला तर त्यावर वाद … चर्चा …. खटला तर भरणार नाही. आता नवीन गाड्या घेताना काही अटी ठेवल्या तर?? भरमसाठ गाड्या रस्त्यावर येणार नाहीत. सरकारी वाहतूक नफा तोट्याची पर्वा न करता चालवली तर ?? भीतीने का होईना लोक सरकारी गाड्यातून प्रवास करतील. शाळेचा दर्जा सगळीकडे एकच ठेवला … एकच पद्धती वापरली …एकच बोर्ड आणले तर ….??
“चल आता आपण नाश्ता करू ….. मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला. तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला. आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली. हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली. अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली. बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती.
“अगं….आता नको .. बाहेरच झालेय. मित्रांबरोबर बसलेलो. नाही म्हणता आले नाही. गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले. तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली. थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले.
बाहेर पडताना लिफ्टमधून खाली उतरतो तेव्हा सिक्युरिटी डोळे चोळत उठतो. च्यायला …..!! हा आपल्याला बघून घड्याळ लावतो का …? अशीही शंका मनात येते आणि दूधवाला सायकलची घंटी वाजवत आत शिरतो. चला… अजूनही राईट टायमावर आहोत.
पण मला गोळी घातल्यावर तुम्ही नक्की स्वतः ला गोळी मारणार ना…?? नाहीतर जाल दुसरीच्या मागे…… तुम्हा पुरुषांचा काही भरोसा नाही…..” शेवटी तिने मनातले बोलूनच टाकले……त्याने हताश होऊन पिस्तुल खाली टाकले आणि कोपरापासून हात जोडले.
“तरीही मला विचारायचा हक्क आहे …” मी मोठ्याने ओरडलो. तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला “दे टाळी ….!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या. माझ्या दोन्ही अपत्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी “
“अरे…. हे पोरांनी काहीतरी नवीन काढले बघ. सकाळपासून मागे लागलीत. आजोबांना शिकार घेऊन जा. आज फादर्स डे आहे म्हणे….. आजोबांना विश करून या. च्यायला……मी पहिली शिकार केल्याबरोबर म्हातारा मला यापुढे तुझे तूच बघ म्हणून दुसरीकडे निघून गेला. पुढे मीच माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो. आता म्हातारा झालाय पण मस्ती कमी नाही झालीय. म्हटले घरी चल तर ऐकत नाही.
यावर उपाय काय तुमच्याकडे …??? आत्महत्या की कुमारी माता..? बरे माता झाल्यावर पुढे काय.. ?? नोकरी आहे का ??? घर आहे का ..?? की आजचा दिवस माझा या तत्वाने जगणार …” आता तिलाही त्याचे बोलणे हवेहवेसे वाटू लागले. खरेच पुढे काय ते तिला माहीत नव्हते. आत्महत्या करायची तिच्यात हिम्मत नव्हती. घरातून या जन्मात तरी माफ करणार नव्हतेच.
हल्ली सगळीकडे पॅकेज घेतले जाते ना.. ?? लग्नाचे … बारश्याचे….. कार्यक्रमाचे….. इतकेच काय ..?? अंत्यसंस्काराचे ही.. . पण आपण त्याच्या आधीचे पॅकेज घेऊ”. डोळे मिचकावत प्रमोद म्हणाला. “हल्ली आई वडिलांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय ..?? लहानपणी पाळणाघरात, नंतर इंटरनॅशनल स्कूल, मग पुढील शिक्षणासाठी कॉलेज/क्लास या सर्वांचे एकत्र पॅकेज आपण घ्यायचे….. अर्थात आपले ग्राहक अतिश्रीमंत असणार”.