बापलेक
नव्वद टक्के मार्क मिळाले. अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते…. आता ते काय माझे होते का…. ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले. आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नव्वद टक्के मार्क मिळाले. अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते…. आता ते काय माझे होते का…. ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले. आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील.
“कसला ताप ..?? घरच्यांनी काय कमी ताप दिला नाही त्याला. रिटायर्ड झाल्यावर त्याची सर्व सर्व्हिस मुलांनी, जावयानी खाल्ली. बायकोबरोबर भारत फिरू ही त्याची इच्छा. पण नातवंडांना सांभाळायची जबाबदारी खांदयावर पडली. आयुष्यभर फक्त जबाबदारीच घ्यायची का?? अडकले परत मुलांच्या मोहपाशात. ह्याला कधी कधी दारू पियाची सवय. पण तीही नशिबात नाही.
“भाऊ ….तुम्हाला माहितीय ..?? हल्ली लग्नसंस्थेवर कोणाचा विश्वास राहिला नाही. लग्न करून आपले स्वातंत्र्य गमावतोय अशी भावना होतेय. बहुतेकजण लिव्ह इन मध्ये विश्वास ठेवतायत. माझ्या अँपमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल.
अरे हो …. मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता. प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम. चिता उभारणे, अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम. दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.
नेहमीसारखी विंडोसीट मिळाली त्याला. ताबडतोब खिश्यातून मोबाईल काढून कॅंडी क्रॅश खेळू लागला. बराच वेळ त्यातच गुंग होऊन गेला तो. अचानक त्याच्या लक्षात आले शेजारून कोणतरी मोबाईलमध्ये डोकावून बघतय. सहा वर्षाचा तो छोटू कुतूहलाने त्याचा गेम पाहत होता.
त्याने नेहमीची काव काव आरोळी ठोकत हवेत सूर मारला. एका इमारतीच्या गच्चीवर राजासारखा उतरला. समोर दोन पाने होती. एक बहुतेक म्हातारा असावा. कारण पानात पालेभाज्यांच जास्त दिसत होता. दुसरा मात्र दारू पिऊन गेला असावा. शेजारी वाटीत थोडी दारू दिसत होती. “काय साली माणसे आहेत. निदान एक क्वार्टर तरी ठेवायची” तो चिडला आणि निषेध म्हणून म्हाताऱ्यांच्या पानातले वरण भात खाऊन उडाला.
पाऊस….. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपून कधी एकदाचा पाऊस पडतो याची आपण वाट तर बघतो पण अचानक कधीतरी पहिला पाऊस पडतो तुमच्याकडे न छत्री असते ना रेनकोट….
कावळे आणि पिंड यांचे काहीतरी अजब रिलेशन आहे असे मला वाटते. एरवी नको तिथे दिसणारे आणि रस्त्यावरील घाणीतली घाण खाणारे हे कावळे नेमका पिंड ठेवला कि गायब होतात आणि जे काही दोनतीन डोक्यावर उडत असतील त्यांचा रुबाब तर काय वर्णावा….?
हीचा मुलगा आणि सून परदेशात. तेव्हा घरात ही नवरा आणि सासू अशी तीनच माणसे. त्यातही दिवसभर सासूची बडबड चालू असायची. हातपाय हलवता येत नाही मग तोंडाचा पट्टा चालूच. हिलाही तिची सवय झालेली तेव्हडे घर तिच्या बडबडीने भरलेले वाटायचे.
थँक्स आई ….आज तुझ्यामुळे मी वर्गात बोलू शकले. सर्वांना धक्का बसला तुझ्याबद्दल ऐकून. पण नंतर टीचरने माझे अभिनंदन केले इतके धाडस दाखविल्याबद्दल. काहीजणी आता मला पाहून नाक मुरडू लागल्या तर काहीजणी अजून जवळ आल्या. आज तुझ्यामुळे मला माणसांची खरी किंमत कळली. खूप हलके वाटले बघ मला. हॅपी मदर्स डे आई ..