Being Mortal – By Atul Gawande (Book Review)
ज्या सोबत्यांबरोबर जीवनाचा ऐन उमेदीचा काळ घालवला त्यातील काही मृत्यूचं अमृत प्याले तर काही आजही त्याच्याशी लढतायेत पण ही आजारांची जळमटं शरीराला लटकली आहेत त्याचं काय करायचं? तारुण्यावस्थेत कधीही आपण आपल्या उतारवयाचा विचार केलेला नसतो आणि वयस्कर असणाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवलेली नसते पण काळाचा टिकटिकणारा काटा कधी तरी आपल्या दारात येऊन उभा राहतोच राहतो. त्यावेळी काय उत्तर असणार आपल्याकडे?