सुपाच्य आहाराचे गुण….
स्निग्ध आहार अन्नास एकसंघता आणतो, रूची निर्माण करणार्या बोधक कफास चालना देतो. वाताचे शमन करतो म्हणजेच (inhibits or delays degenerative changes) पेशींची उत्पत्ती व स्थिती या अवस्थांना बल देतो व पेशींचा लय म्हणजेच झीज लवकर होऊ देत नाही. त्यामुळे वातविकार व वार्धक्य यापासून संरक्षण होते.