Author: प्रगती कोलते-भारंबे

Play Date

आमची Play Date वाली खवय्येगिरी…..

आता पर्यंत इतके भारी मेनू बनविले मी. जे मी कधीच केले नव्हते ते फक्त आपल्या प्ले डेट (Play Date) साठीच केले. त्या सगळ्यवार पाणी फिरविलेस तू. 😞😞😞(Play Date म्हणजे आम्ही ३ मैत्रिणी मिळून आमच्या मुलींना घेऊन एकीच्या घरी जमतो आणि दिवस भर एकमेकींच्या हातचे केलेले खमंग मेनू चे आस्वाद घेत छान वेळ घालवितो.

मिसळ पाव

मिसळ पाव घरच्या घरी बनवण्याची पद्धत

मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…जी ताटाच्या बाजूला असलेल्या पेल्यात भरून दिली जाते. जिला पाहताच क्षणी मनात एक विचार डोकावून जाणतो एवढ्याने नाही व्हावं… एवढीशीच काय दिली…?? मग नजर पडते ती ताटातल्या फरसान आणि उसळीवर त्या सोबत जोडीला मस्त गुबगुबीत टुम्म फुगलेले जाळीदार पाव, पिवळी धमक जिलबी, पांढरा शुभ्र रायता, आणि मसाला पापड त्या शिवाय ती मिसळ कसली…

ManacheTalks

वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???

वांग्याचा हा पोस्टमोर्टेर्म बघून हिरव्या मिरच्यांनी धसका घेतला आणि त्यांनी गरम तव्यावर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हा सगळा प्रकार बघून पांढरा शुभ्र लसणाचा कांदा इकडे तिकडे बरळत होता. मी त्याला चांगला एका हाथाने धरून दुसऱ्या हाताच्या मुठीने एकाच दणक्यात मोडून काढणार तोच निसटला….

error: © Copyrights 2023. All rights reserved!