गूगलचे नवे पेमेंट अॅप “TEZ”
ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द, जो ‘ वेग’ या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .१८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक छोटा व्यवहार करून केले. हे वॉलेट नाही, नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती.