एक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…
बाबा आमटे ह्यांच्या महारोगी सेवा समिती ह्या संस्थेने चालू केलेला लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा इथे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे तसेच इथल्या अनेक लोकांच्या परिश्रमातून बाबा आमटेंनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एका वटवृक्षात रुपांतर झालं आहे. आजही त्याच सेवाधार्मातून इथल्या आदिवासी समाजासाठी पूर्ण आमटे कुटुंब कार्यरत आहे.