मला कुठलंही काम द्या… आणि बघा मी करू शकतो कि नाही!!
वयाच्या ५ व्या वर्षी राजा महेंद्र प्रताप ह्याने एक धाडस केलं. मित्रांनी प्रतापची तू विद्युत उर्जा असलेला धातूचा खांब आपल्या हाताने पकडू शकत नाही असं म्हणत खिल्ली उडवली. प्रताप च्या लहान निरागस मनाला ह्या धाडसातला धोका लक्षात आला नाही. त्याने धाडस करून एका उच्च दाबाच्या धातूच्या रॉडला पकडलं. त्या वेळी अंगातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या धक्याने ने राजा महेंद्र प्रताप चा जीव तर वाचला पण ह्या धाडसाने त्याला कायमच अधू बनवलं.