प्रसादाचा शिरा असुदे किंवा केशर घातलेलं श्रीखंड. फ्रूट सलाड किंवा खरपूस भाजलेला केक!
यात बदामाचे तुकडे घातले की अशी अप्रतिम टेस्ट लागते की व्वा!
बाजारातून तर आपण प्रत्येकजण बदाम घेऊन येतो आणि पदार्थात वापरतो.
कधी हे बदाम आरोग्यासाठी रात्री भिजवून, सोलून खातो तर कधी कच्चेही खातो.
पण समजा आपण आपल्या अंगणातच बदामाचं झाड वाढवायचं ठरवलं तर काय होईल?
तर काय भरपूर बदाम खायला मिळतील. ते ही आपण स्वतः वाढवलेले. आणि त्याचा आनंद वेगळाच असेल.
पण हे खरच शक्य आहे का ?
हो तर, आपल्या अंगणात बदामाचं झाड अगदी सहज पद्धतीने आपण वाढवू शकतो
ॲंटी ऑक्सीडेंट फायबर आणि व्हिटॅमिन यांचा प्रचंड साठा असलेले बदाम आपण आपल्या घरामध्ये कसे वाढवायचे हे आज जाणून घेऊया.
त्यासाठी आपण अंबालाच्या सरविंद धीमान यांच्या प्रयोगाची माहिती करून घेऊया.
ॲग्रो केमिकल कंपनीत काम करताना सरविंद यांनी हौस म्हणून बागकामाचा छंद जोपासला आहे.
एके दिवशी त्यांना बदामाचं झाड तयार करावंसं वाटलं.
पण मग ते तिथच थांबले नाही. अथक प्रयत्नातून बदामाचे झाड तयार केलं.
आज चार फुटापर्यंत वाढलेले झाड तयार करण्यासाठी बी रूजवण्यासाठी अनेक व्हिडिओज त्यांनी पाहिले.
अनेक लेखातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि विकत आणलेल्या बदामातून रोप तयार करण्याची पद्धत शोधून काढली.
विकत आणलेल्या बदामातून रोप तयार करण्यासाठी सरविंद यांनी चांगल्या क्वॉलिटीचे बदाम खरेदी केले.
मग त्यांना 24 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं.
बुरशी लागू नये म्हणून किंचित दालचिनीची पुड ही घातली.
चोवीस तासानंतर हे बदाम पाण्यातून काढून ओल्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून त्यांना एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवून दिलं.
फ्रीजचं तापमान 0-10 असावं हे सांगायला सरविंद विसरत नाहीत.
बदामाचे झाड वाढवण्यासाठी संयम हवा
अंगणात बदामाचं झाड लावायचं तर पी हळद हो गोरी अशी गडबड करून चालणार नाही.
साधारण पंचवीस दिवसांनी फ्रीज मध्ये ठेवलेल्या बदामांना कोंब फुटले मग ते जमिनीत पेरले.
त्यानंतर वातावरणाचा अंदाज घेत जमीन ओली राहील इतपत पाण्याचं नियोजनही केलं.
सरविंद यांनी त्यांच्या बदामाच्या झाडाला गांडूळ खत आणि शेणखत घातलं.
वाळू आणि मातीचे मिश्रण बदामाच्या झाडासाठी त्यांनी निवडलं.
बदामाच्या झाडाला रोगराई पासून वाचायला मात्र त्यांना काही विशेष प्रयास करावे लागले नाहीत.
दर महिन्याला या झाडाची प्रगती त्यांना दिसून येते.
सरविंद म्हणतात बदामाचं झाड चांगलं येण्यासाठी नोव्हेंबरच्या आत ते तयार करावं.
स्वतः सरवींद यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये आपल्या झाडाचा सोशल मीडिया वरती फोटो टाकला.
तेव्हा लोकांनी अभिनंदन तर केलंच पण हे बदामाचं झाड जोपासायची प्रक्रिया कोणती हे ही त्यांना विचारलं.
सरविंद यांच्या झाडाला बदाम लागण्यासाठी त्यांना अजून तीन ते चार वर्ष वाट पहावी लागेल अर्थात तशी त्यांची स्वतःची तयारी आहेच.
बदामाचं झाड जसं मोठे होईल तसतसं त्याला मोठ्या कुंडीची किंवा जमिनीवरच्या मोकळया जागेची गरज पडेल.
सरविंद यांनी हा, बदामाचं झाड लावण्याचा प्रयोग करून बघितला आहे तुमच्याकडे जागा असेल, तुमची इच्छा असेल तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही सुद्धा बदामाचं झाड घरच्या घरी फुलवू शकता.
तुम्हाला हा प्रयोग करून बघायला आवडेल का, हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Yes Reaqiure all information related to Almond cultivation step by step procedure
For that, you need to read the article.