बालपण हा आयुष्यातला सर्वात महत्वाचा आणि तितकाच निरागसतेचा टप्पा. कितीही मोठे झालो तरी बालपण पुन्हा हवे वाटते.
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार- संत तुकाराम महाराज यांच्या, जीवनाला मार्गदर्शक अशाच या ओळी आहेत.
२१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली पण ही प्रगती खरच प्रगतीच आहे का? की केवळ भौतिक प्रगती साधता-साधता आपण आंतरिक अधोगतीचा प्रवास पूर्ण केला आहे हे म्हणण्याची वेळ आली आहे.
बालपण जगणारी आपली शेवटची पिढी असेल का?
याचे उत्तर आज तरी होय असेच द्यावे लागेल. ज्याची अनेक कारणे समोर उभी ठाकलेली दिसता आहेत.
१. बहुतेक बालकांचे आई आणि वडील दोघेही काम करतात व मूल पाळणाघरात बालपण कटवते
२. जुन्या परंपरेचे खेळ कालबाह्य झाले व त्याची जागा मोबाईल आणि व्हिडिओ गेम ने घेतली. ज्यामुळे मुलांना नवीन मित्र आणि समाज यांची नाळ जोडली जात नाही
३. मैदानी कसरत होणारे खेळ लोप पावले, ज्यामुळे अनेक बालके स्थूल आढळतात. उदा. कब्बडी,खो खो, सुरपारंबी, ठिकरी, लांबऊडी, धबाकुटी, गुलीचा असे खेळ नाममात्र उरले आहेत
४. कोरोना सारखे आजार काळानुसार बळावल्याने शाळा, मैदाने यांची जागा ऑनलाईन शिक्षणाने घेतली आहे. ज्यामुळे बालपणाची धमाल नियमांच्या कचाट्यात किती काळ असेल याचा अंदाज नाही.
५. पर्यटन स्थिरावले त्यामुळे लहान मुलांना भौतिक जगाचे ज्ञान मिळणे कमी झाले व आनंदही कमी झाला.
६. आजीच्या गोष्टी, औषधी बटवा हे लुप्त झाले
यामुळे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनात आले आहेत.
उदा. कौटुंबिक सुसंवाद कमी झाला. मुलांना बालवयात पालकांचे पुरेसे प्रेम मिळणे दुर्लभ झाले. आणि बरेच ठिकाणी पालकांचे प्रेम मिळते सुद्धा, पण या परिस्थितीत मुलांना या प्रेमाचा निखळ आनंद घेणे जमत नाही. किंवा पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद होणे कठीण होऊन जाते. अनेक मूल ही चिडखोर स्वभावाची घडतात.
उपाय-
१. कौटूंबिक सुसंवाद वाढवून पालकांनी आपल्या पाल्याला जास्त वेळ देणे.
२. बिल्डिंगच्या खाली बांधकाम करतांना मुलांना खेळण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची सक्ती असावी.
३. मुलांना अधून-मधून पर्यटनाला घेऊन जावे.
४. आपल्या शाळेच्या जीवनाचे, मित्र परिवाराचे किस्से पालकांनी मुलांशी शेअर करावे.
५. लहान मुलांसाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा अधिकाधिक आयोजित व्हाव्या.
६. ज्या मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात कोरोना काळात झालेली आहे. त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा पुन्हा शाळा सुरळीतपणे सुरु होतील तेव्हा नव्याने सुरुवातीपासून करावा.
बदलणाऱ्या समाज प्रवाहात बालपण टिकले गेले तर आयुष्य सुख आणि आनंदाने भरलेले राहील.
आपल्या कुटूंबातील व सभोवताली असलेली निरागस बालके यांचे बालपण त्यांना जगूद्या कारण भविष्यात बालके जन्माला येतीलच मात्र त्यांचे बालपण संपलेले नसावे याची काळीज आजच घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.