UIDAI ने दिला इशारा: सगळे १२ आकडी नंबर आधार नंबर नसतात.
जाणून घ्या सत्य….
आपले आधार कार्ड ही सध्या आपली ओळख बनले आहे. कोणत्याही सरकारी अथवा खाजगी कामासाठी आधार नंबर देणे सध्या आवश्यक झाले आहे.
अगदी कोविड लसीकरण आणि रुग्णांची नोंदणी सुद्धा आधार नंबर देऊनच केली जात आहे.
त्यामुळे अर्थातच आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे.
पण ह्याच आधार नंबरचा फ्रॉड देखील होताना दिसून येत आहे. देशभरात अनेक ठिकाणी चुकीचे १२ आकडी नंबर आधार नंबरच्या जागी देऊन फसवणूक होताना दिसून येत आहे.
ह्या बाबतीत UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ट्वीट करून लोकांना अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध केले आहे.
#BewareOfFraudsters
Any Aadhaar is verifiable online/offline. To verify offline, scan the QR code on #Aadhaar. To verify online, enter the 12-digit Aadhaar on the link: https://t.co/cEMwEa1cb4
You can also do it using the #mAadhaar app#AadhaarAwareness pic.twitter.com/5Z2enlYrTn— Aadhaar (@UIDAI) July 9, 2021
तसेच नकली आधार नंबर कसा ओळखावा ह्याच्या काही टिप्स दिल्या आहेत.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) असे म्हटले आहे की सगळ्या १२ आकडी नंबर्सना आधार नंबर समजण्याची चूक करू नका.
एखाद्या व्यक्तीचे आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकारण्याआधी त्याच्या सत्यतेची पडताळणी करून पाहणे आवश्यक आहे अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
तसेच त्यांनी आधार नंबर पडताळून पाहण्याच्या काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. त्या आता आपण पाहूया.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले आहे की आधार नंबर व्हेरिफाय करण्यासाठी https://resident.uidai.gov.in/verify ह्या लिंकवर डायरेक्ट लॉग इन करणे आवश्यक आहे.
आपण आधारची सत्यता पडताळून पाहण्याच्या स्टेप्स जाणून घेऊया.
१. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची वेबसाइट https://resident.uidai.gov.in/verify वर लॉग इन करा.
२. १२ अंकी आधार नंबर लिहा.
३. कॅप्चा किंवा सुरक्षा कोड लिहा.
४. प्रोसिड टु व्हेरिफाय वर क्लिक करा.
५. आधार नंबर योग्य आहे की नकली हे ताबडतोब स्क्रीनवर दिसेल.
इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपण आधार नंबरची पडताळणी करू शकतो.
तसेच आधार कार्ड संबंधातील त्रुटी आणि शंका दूर करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १९४७ हा टोलफ्री नंबर दिला आहे.
ह्या हेल्पलाइन नंबरवर आपल्याला आधार नोंदणी केंद्र, नोंदणी नंतरचे स्टेट्स, आणि इतर आधार कार्ड संबंधी सेवांची माहिती मिळेल, अतिशय सोप्या पद्धतीने घरबसल्या आपण ही माहिती मिळवू शकतो.
तर मित्रांनो, बनावट आधार नंबरपासून सावध रहा. लेखात सांगितलेल्या सोप्या पद्धतीने पडताळणी करून आपली फसवणूक टाळा.
तसेच इतरांची फसवणूक टाळण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सतर्क रहा. सुरक्षित रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.