आयकर विवरणपत्र म्हणजे ‘IT Returns’ भरण्याचे ८ फायदे

करपात्र उत्पन्नगटात नसल्यामुळे तुम्ही आयकर विवरणपत्र (income tax return) भरत नाही का?,

थांबा, खालील लेखात जाणून घ्या विवरणपत्र भरण्याचे फायदे.

अनेक लोकांना कमी उत्पन्नगटात असल्यामुळे किंवा काही गुंतवणूक केल्यामुळे आयकर भरण्याची गरज पडत नाही.

त्यांना आयकरात सूट/सवलत मिळते.

पण त्यामुळे असे लोक आयकर विवरणपत्र (income tax return) देखील वर्षानुवर्षे भरत नाहीत.

त्यांना ते गरजेचे वाटत नाही, पण नंतर अचानक काही कारणामुळे जेव्हा मागील काही वर्षांच्या विवरणपत्राची गरज भासते तेव्हा ते घाईघाईने एखादा सीए गाठून जुनी विवरणपत्र भरतात.

बहुसंख्य लोकांना विवरणपत्र भरणे हे किचकट व कटकटीचे काम वाटते म्हणून ते भरणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो.

परंतु करपात्र उत्पन्नगटात नसूनही आणि कोणताही कर भरण्याची गरज नसतानाही आयकर विवरणपत्र ( IT Return) भरणे हे खूप फायद्याचे आहे.

कसे ते आपण जाणून घेऊया, त्याकरिता मुळात आयकर विवरणपत्र म्हणजे नक्की काय आणि ते कोणी भरायचे असते ते आपण बघूया…

आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न..

हा एक असा फॉर्म असतो जो प्रत्येक करदात्याने भरायचा असतो.

ह्या फॉर्म मध्ये करदात्याचे संपूर्ण उत्पन्न , त्याला लागणारा कर (टॅक्स), केलेल्या गुंतवणुकीच्या नोंदी व त्यायोगे मिळणारी करसवलत आणि सवलत वजाजाता करपात्र उत्पन्नावर लागणारा एकूण कर अशी नोंद करायची असते.

भारताचे जबाबदार नागरिक म्हणून स्वतःचे उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील सर्व माहिती भरून आपले विवरणपत्र दाखल केले पाहिजे.

ह्या विवरणपत्रामुळे आपण आपले सर्व उत्पन्न जाहीर करतो.

ते उत्पन्न करपात्र असो किंवा नसो. ते जाहीर करणे फायद्याचे असते.

आयकर खात्याने एका आर्थिक वर्षात रु. 250000/- पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आयकर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे.

आपले उत्पन्न करपात्र नसेल, ते अगदी कमी असेल किंवा अगदी शून्य उत्पन्न असेल तरीही आपण आयकर विवरणपत्र दाखल करू शकतो.

त्याला nil return असे म्हटले जाते.

असे रिटर्न (विवरणपत्र) भरण्याचे अनेक फायदे आहेत. ते खालीलप्रमाणे

१) अनेक वर्षात जमा झालेल्या उत्पन्नाचा पुरावा / प्रमाणपत्र 

काही लोकांचे वार्षिक उत्पन्न हे अगदी कमी प्रमाणात असते, परंतु काही वर्षे सातत्याने असे उत्पन्न मिळाले की मोठी रक्कम जमा होते.

अश्या वेळी जर विवरणपत्र दाखल केले नसेल तर दर वर्षीच्या सदर उत्पन्नाचा स्त्रोत दाखवणे किंवा त्याची स्वतः कडे माहिती असणे अवघड होऊन बसते पण तेच जर दरवर्षी व्यवस्थित आयकर विवरणपत्र भरले असेल तर ते अश्या करमुक्त उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाते.

२) व्हिसा प्रोसेसिंग

जर तुम्ही काही कारणाने परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हास त्या देशाचा व्हिसा मिळणे आवश्यक आहे.

आणि तो मिळवण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत दाखवणे आवश्यक असते.

जर एखादी व्यक्ति नोकरदार असेल तर दरमहा मिळणाऱ्या वेतनाचा पुरावा किंवा एम्प्लॉयएर सर्टिफिकेट दाखवता येते.

परंतु सदर व्यक्ति जर व्यावसायिक असेल तर अश्या वेळी योग्य रीतीने दरवर्षी भरलेले आयकर विवरणपत्र हे नियमित उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

३) व्यावसायिक लोकांकरता उत्पन्नाचा पुरावा

नोकरदार व्यक्ति ज्या प्रमाणे सॅलरी स्लिप अथवा एम्प्लॉयएर सर्टिफिकेट आणि फॉर्म 16 हे आपल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून दाखवू शकतात तसे स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती करू शकत नाहीत.

अश्या वेळी आयकर विवरणपत्र हे व्यवसायिकांस नियमित उत्पन्नाचा पुरावा म्हणून दाखवत येते.

म्हणून ते जर नियमितपणे दाखल केलेले असेल तर खूप फायदा होतो.

४) व्यवसायातील नुकसान दाखवता येते

जर तुम्हाला सातत्याने तुमच्या व्यवसायात नुकसान होत असेल तर नियमित आयकर विवरणपत्र भरून तुम्ही ते नुकसान सलग 8 वर्षे कॅरि फॉरवर्ड करू शकता आणि पुढे होणाऱ्या नफ्यावर आयकरात सवलत मागू शकता.

पण असे नुकसान कॅरि फॉरवर्ड होण्यासाठी आयकर विवरणपत्र दरवर्षी नियमित दाखल केलेले असावे लागते.

अन्यथा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशी मागणी ग्राह्य धरत नाही.

म्हणून देय तारखेच्या आत विवरणपत्र भरणे श्रेयस्कर.

५) अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना लाभदायक

काही लोकांचे उत्पन्न अतिशय कमी स्वरूपाचे असते जसे की,

१) बँक ठेवीवरील व्याज

२) फॅमिली पेन्शन

३) शेतीचे करमुक्त उत्पन्न

४) डिविडंड आणि बॉन्ड मधील उत्पन्न

अश्या वेळी सदर लोकांचे उत्पन्न हे करपात्र उत्पन्नाच्या बरेच खाली असते.

परंतु तरीही त्यांनी कंटाळा न करता आयकर विवरणपत्र जरूर भरावे कारण तेच त्यांच्या उत्पन्नाचा ग्राह्य पुरावा मानले जाते.

त्यामुळे जरी कर भरावा लागणार नसेल तरीही विवरणपत्र जरूर भरावे.

६) इनकम टॅक्स रिफन्ड मिळवण्यासाठी-

काही वेळा लोकांकडून देय रकमेपेक्षा जास्त कर भरला जातो, अश्या वेळी सदर जास्त भरलेला कर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून सदर व्यक्तीस परत केला जातो.

परंतु त्यासाठी नियमित आयकर विवरणपत्र मात्र व्यवस्थित भरून देय तारखेच्या आत दाखल केलेले हवे.

अन्यथा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिफंड ग्राह्य धरत नाही.

७) लोन/कर्ज मिळवण्याकरीता

जर तुम्हाला गृहकर्ज, कार घेण्यासाठी कर्ज असे कर्ज काढायचे असेल तर मागील 3 वर्षांचे आयकर विवरणपत्र कर्ज देणाऱ्या बँकेस दाखवावे लागते.

अन्यथा बँक कर्ज मंजूर करत नाही.

मागील 3 वर्षांचे विवरणपत्र हा तुमच्या नियमित उत्पन्नाचा पुरावा मानला जातो आणि त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकेस तुम्ही ते कर्ज नियमित हप्ते भरून फेडू शकाल असा विश्वास वाटतो.

त्यामुळे इथे विवरणपत्र महत्वाची कामगिरी बजावते.

८) मोठ्या रकमेचा विमा उतरवताना 

जर तुम्हास मोठ्या रकमेचा आयुर्विमा काढायचा असेल तर विमा देणाऱ्या कंपनीस तुमच्या उत्पन्नाचा पुरावा हवा असतो.

अश्या वेळी सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट हयाबरोबरच आयकर विवरणपत्र देखील एक उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

त्यामुळे नियमितपणे ते दाखल करणे आवश्यक ठरते.

तर वरील सर्व महितीमुळे आपल्या हे लक्षात आले आहे की स्वत:चे उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयकर विवरणपत्र जरूर दाखल केले पाहिजे.

उत्पन्न जरी करमुक्त गटात असेल तरीही nil रिटर्न दाखल करावे.

अनेक कुटुंबातील लहान स्वरूपाचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति विवरणपत्र भरत नाहीत.

पण अश्या सर्वांनी ते जरूर भरावे आणि वर उल्लेख केलेल्या सर्व फायद्यांचा लाभ घ्यावा.

आयकर विवरणपत्र भरणे हा अर्थसाक्षर होण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात घ्या.

चला तर मित्रांनो, आपण ह्यावर्षीपासून नियमित आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा संकल्प करूया आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळूया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।